आपण सगळेच हल्ली सर्रास जीमेल , याहू, हॉटमेल(एम एस एन ) यांसरखे ई मेल आयडिस वापरतो. सगळे मेल्स आपण जी मेल ला लॉगिन करून बघतो. आपले मेल खूप प्रमाणात असले की आपण पटापटा मेल बघतो आणि आवश्यक नाही वाटल्यास ते सरळ डिलीट करतो, तुम्ही म्हणाला हा आता काय नविन सांगतो आहे. पण गम्मत अशी आहे की जर इंटरनेट कनेक्शन नसेल तर तुम्हाला तुमचे मेल्स पुन्हा बघायला नाही मिळत ना !
समजा तुम्हाला आवडलेला एखादा मेल तुम्हाला निवांत बघायचा आहे पण नेमके त्यावेळी नेट काम नसेल करत तर मग गोची झाली की नाही. तसेच जर तुम्हाला सारखे ते साइट वर जाऊन लॉगिन करून मेल पाठवायचे काम कुरकुरीचे वाटत असेल तर ई मेल क्लाईंट हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो. आपल्या विंडोस एक्सपी मध्ये Outlook Express नावाची एक भन्नाट इ मेल क्लाईंट सुविधा आहे ज्याद्वारे आपण आपले मेल डाऊनलोड करून ठेवू शकतो आणि हवे तेव्हा इंटरनेट कनेक्शन नसतानाही बघू शकतो.या साठी कोणतेही सोफ्टवेअर तुम्हाला इंस्टॉल करण्याची गरज नाही ( ही सॉफ्टवेअर्स म्हणजेच ई मेल क्लाईंट्स होय).
ई मेल क्लाईंट्सचे कार्य सांगायचे झाले तर थोडक्यात असे सांगता येईल की आपल्या सर्व्हरवरचे (म्हणजे ऑनलाईन इन्बॉक्स मध्ये येणारे मेल्स आणि जाणारे सेन्ट मेल्स मेल्स ) सर्व मेल्स( ड्राफ्टस् सोडून ) आपल्या पी सी वर सेव्ह करता येतील आणि त ही फक्त एकदाच सेटींग करून. फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या ती म्हणाजे की जर तुम्ही पी सी फॉरमेट केला तर मात्र या Outlook मधील मेलचा बॅकअप तुम्हाला घ्यावा लागेलबर्याच ऑफिसेस मध्ये आऊटलूकच वापरले जाते. आपले ई मेल खाते आऊटलूक शी Configure करायचे असेल तर त्याच्याशी निगडीत असलेल्या २ मुख्य सेटींग समजणे गरजेचे आहे. मूळ सेटींग आणि सर्व्हर अॅण्ड पोर्ट सेटींग अशा दोन प्रकारच्या सेटींग असतात शक्यतो मूळ सेटींग म्हणजेच डिफॉल्ट सेटींग ही एकच असते पण सर्व्हर आणि पोर्ट सेटींग ही तुमच्या ई मेल आयडिच्या डोमेन नेमनुसार ठरत असते. उदा. माझे १८ ई मेल आयडी आहे त त्यातील काही जीमेल चे, काही याहू चे, काही हॉटमेलचे तर काही रेडीफमेल चे आहेत (रेडीफमेल आयडी धारकांना आऊटलूकची सेवा वापरता येणार नाही कारण या साठी सर्व्हर विकत घ्यावे लागते).
- आपण ह्या ई मेल क्लाईंटची सेटींग ची माहिती टप्प्या टप्प्याने घेऊया जेणे करून नक्की ई मेल क्लाईंट कसे काम करते हे ही आपल्या लक्षात येईल.
१. आपण जसे लॉगिन करतो तसे कोणत्याही ई मेल मध्ये सारखे करत बसावे लागत कारण आपण आधीच आपलं युसरनेम आणि पासवर्ड क्लाईंट मध्ये सेव्ह करत असला कराणाने सारखे लॉगीन व्हावे लागत नाही हा मात्र जर तुम्ही पासवर्ड बदललात तर मात्र पुन्हा सेटींगज्स मध्ये जाऊन पासवर्ड बदलावा लागेल म्हणजेच आपण जो पासवर्ड उदा. जीमेल ला लॉगिन करताना टाकतो तोच टाकावा लागेल.
२. माझा आय डी जर XXXXXXXXXXXXX@gmail.com असेल तर तर Gmail.com हे माझे डोमेन आहे त्या मुळे सर्व्हर ची सेटिंग करताना gmail.com हेच आपले डोमेन नेम असावे लागेल.
३. Incoming mail server द्वारे आपल्याला येणारे मेल्स ई मेल क्लाईंटमध्ये घेता येतात Incoming mail साठी Server port setting ही वेगळी असते शक्यतो Incoming mail server हे mail , POP कींवा POP3 असते आणि Outgoing mail server द्वारे आपल्याला ई मेल क्लाईंटमधून मेल पाठवता येतात, आऊटगोईंग सर्व्हर हे शक्यतो नेहमीच SMTP असते.
४. कोणतेही ई मेल क्लाईंट हे आपल्या आयडी ला स्वतःच लॉगीन करते आणि मग आपण ई मेल क्लाईंट मधून मेल पाठवू किंवा मिळवू शकतो, नीट निरिक्षण केल्यास तुमच्या लक्षात येईल की आपण या ईमेल क्लाईंटमधून पाठविलेले मेल्स हे आपल्या सर्व्हरच्या sent mail मध्ये दिसतील आणि ई मेल क्लाईंटमध्ये आलेले मेल्स Inbox मध्ये दिसतील.
५. आपल्याकडे जर ई मेल स्कॅन करणारा अँटीव्हायरस असेल तर आपले ई मेल्स आणि त्याच्या अटेचमेण्ट्स सुरक्षितरित्या आणि व्हायरस फ्री रित्या डाऊनलोड होऊ शकतात.
६. तसेच कोणत्याही ई मेल क्लाईंतवर ऑनलाईन किंवा ऑफलाईन काम करण्याची सोय असते म्हणजे तुम्हला हवे तेव्हा तुम्ही मेल डाऊनलोड किम्वा पाठवू शकता, ही सोय खरं तर व्यस्त मंडळींसाठी किंवा ज्यांचे इंटरनेटचे पॅकेज हे काही तासांचे असते अशांसाठी फारच उपयुक्त ठरेल. कारण तुम्ही हवे तसे मेल्स बनवून यात सेव करू शकता आणि नेट कनेक्शन जोडले किंवा ऑफलाईन मोड वरून ऑनलाईन मोड वर गेलात की मेल सेण्ट करायचे फक्त. की झाले तुमचे काम याला म्हणतात काम पे काम आणि गुठलियों के दाम.
वर जी सगळी माहिती आहे ती आपले खाते जर या ई मेल क्लाईंट मध्ये configure करायचे असेल तर कसे करायचे याची माहिती मी आपल्याला आऊटलूक या ई मेल क्लाईंटच्या मदतीने समजवनार आहे तुम्ही जर दुसरा कुठला ई मेल क्लाईंट वापरणार असाल तरीही हीच युक्ती आहे.आऊटलूक मध्ये मेल्स येण्यासाठी कींवा आऊटलूक मधून मेल करण्यासाठी कराव्या लागणर्या काही मुख्य सेटींग्स मी खाली दाखवत आहे. तुम्ही जर दुसरे एखादे मेल क्लाइंट वापरू इच्छीत असाल तर त्याची सेटींग जास्त वेगळी नसते, चिंता करू नका तुम्हाला काही अडचण आल्यास ती मला विचारा मी नक्कीच सांगेन. तूर्तास आपण आऊटलूकमध्ये आपल्या ई मेल खात्याची सेटींग कशी करायची ते बघुया.
सर्वप्रथम आपण आऊटलूक उघडले ( म्हणजे आधी जर तुम्हे कोणतेही इ मेल खाते Configure केले नसेल तर !) की आपल्याला आपले नाव टाकायला प्रवृत्त करनारी एक विंडो दिसेल. त्यात आपले नाव टाका आणि खाली असलेल्या Next या बटणावर क्लिक करा.
पुढील विंडोत तुमचा ई मेल आयडी टाका आणि Next या बटणावर क्लिक करा.
आता तुमचे मुख्य काम सुरु होईल, ते म्हणजे Incoming आणि Outgoing server टाकण्याचे तुमचा ई मेल आयडी जर जी मेल चा असेल तर मी टाकत आहे तीच सर्व्हर्स तुम्हाला देखील टाकावी लागतील. अन्य कुठला मेल आयडी असेल तर चिंता करू नका मला माहित असलेल्या शक्य तितक्या डोमेन नेमचे Incoming आणि outgoing servers ची माहिती तुम्हाला या लेखाच्या शेवटी देणार आहे. Gmail चे incoming आणि outgoing server नक्की काय आहे आणि ते कसे लिहायचे हे खालील चित्रात दिसेल.
incoming आणि Outgoing server टाकून झाली की तुम्ही Next या बटणावर क्लिक करा.
Next बटणावर क्लिक केले की तुम्हाला नविन विंडो दिसेल त्यात तुमचा इ मेल आयडी आणि पासवर्ड टाका. Remember password ह्या पर्यायाला टिक करा आणि Next या बटणावर क्लिक करा.
तुम्हाला नवीन विंडो दिसेल त्यातील Finish या बटणावर क्लिक करा.
इतके झाले की तुमचे निम्मे काम तर झाल्यातच जमा आहे पुढचे काम फक्त काही सेकंदाचेच आहे. तुम्हाला टूलबार मधील Tools मधून Accounts हा पर्याय निवडा.
Interenet Accounts नावाची नवीन विंडो तुम्हाला दिसेल. त्यातून properties या बटणावर क्लिक करा. तुमच्या Incoming server च्या नावाची विंडो तुम्हाला दिसेल. त्यातून Server या अंतर्गत असणार्या, Outgoing Mail Server च्या खाली असलेल्या My server requires Authentication या पर्यायासमोरील चेकबॉक्स वर क्लिक करा की तुम्हाला बरोबरची खूण दिसू लागेल.
पुढचा टप्पा म्हणजे अगदी शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. आपण वर जी विंडो पाहिली त्यातून्च Advanced या टॅबवर जाऊन Outgoing mail (SMTP) चा पोर्ट क्रमांक465 ठेवा तसेच Incoming mail (POP3) चा पोर्ट क्रमांक 995 हा ठेवा तसेच, This server requires a secure connection (SSL) ह्या दोन्ही पर्यायांवर टिक करा. Server timeout कालावधी ५ मिनिटे ईतका ठेवा, आणि आता OK या बटणावर क्लिक करा.
की झाली तुमची Outlook सेटींग आता फक्त Send and Receive वर क्लिक केले की तुमच्या ईनबॉक्समधील सगळे मेल्स डाऊनलोड होताना दिसतील.
मी वर नमूद केल्याप्रमाणे जास्त प्रमाणात वापरल्या जाणार्या ई मेल आयडी साठीच्या डोमेन पोर्ट सेटींग आणि सर्व्हर सेटींग खालीलप्रमाणे देत आहे.
- Hotmail Settings :
- Hotmail Incoming Mail Server (POP3) - pop3.live.com (logon using Secure Password Authentification - SPA, mail server port: 995),Hotmail Outgoing Mail Server (SMTP) - smtp.live.com (SSL enabled, port 25)
- Yahoo! Mail Settings :
- Yahoo Incoming Mail Server (POP3) - pop.mail.yahoo.com (port 110), Yahoo Outgoing Mail Server (SMTP) - smtp.mail.yahoo.com (port 25)
- Google GMail Settings :
- Google Gmail Incoming Mail Server (POP3) - pop.gmail.com (SSL enabled, port 995),Outgoing Mail Server - use the SMTP mail server address provided by your local ISP or smtp.gmail.com (SSL enabled, port 465)
- आपले ई मेल आऊटलूक मध्ये किंवा अन्य कोणत्याही चकटफू ई मेल क्लाईंटमध्ये डाऊनलोड करण्याची ही युक्ती तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा.
- तसेच आपल्या काही प्रतिक्रिया आणि सूचना असल्यास त्याही आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू द्या.
- प्रथमेश शिरसाट
0 comments:
Post a Comment