300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Sunday, 10 August 2014

Tagged under: , , ,

इन्स्टाग्राम | सोशल नेटवर्किंगची नवी ओळख

इन्स्टाग्राम | सोशल नेटवर्किंगची नवी ओळख
तुम्ही फेसबुक वापरता? व्हाटस् एप वापरता? मग तुम्ही इन्स्टाग्राम हे नाव कदाचित ऐकले असेल. व्हाटस  एप प्रमाणेच अल्पावधीत लोकप्रिय झालेले एक नाव म्हणजे इन्स्टाग्राम. हे एप म्हणजे सोशल नेटवर्किंगचाच एक प्रकार आहे ज्यात आपण फोटो, व्हिडियो अधिकाधिक आकर्षक करून ते मित्र-मैत्रिणी किंवा इंटरनेटवर इतरांसाठीही प्रसिध्द करू शकतो. इन्स्टाग्रामचा एक मुख्य फायदा म्हणजे फोटो काढल्यावर त्यात काही प्रमाणात बदल करण्यासाठी वेगळे एप सुरु करावे लागत नाही, ह्याच एप मध्ये वेगवेगळ्या आकर्षक छटा, रंगसंगती, चौकटी यासारख्या सुविधांचा वापर करून फोटो आकर्षक करता येतो आणी लगेच इन्स्टाग्रामवर किंवा त्याद्वारे फेसबुक, ट्विटर, फ्लिकर सारख्या संकेतस्थळांवर प्रसिध्द करता येतो. आपण याच इन्स्टाग्रामबद्दल जाणून घेऊ ज्याचा वापर आज २०० दशलक्षांहून लोक करत आहेत..

फेसबुकने तब्बल १ अब्ज अमेरिकन डॉलर्स (म्हणजे जवळपास ६००० कोटी रुपये) खर्चून विकत घेतलेले इन्स्टाग्राम इतके लोकप्रिय असण्याची अनेक कारणे आहेत, इतक्या प्रचंड लोकप्रियतेमुळेच आज याची किंमत ५ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या घरात गेली आहे. लोकप्रियतेची काही महत्वाची, खालीलप्रमाणे

१) सामाजिक संवाद – मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. एकमेकांचा सहवास, संवाद अशा अनेक पैलूंमुळे मानवाचा क्रमिक विकास झाला आहे. साहजिकच तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला संवादासाठी अनेक माध्यम उपलब्ध आहेत (त्यातून संवाद होतो की नाही, हा कदाचित वादाचा मुद्दा असेल). आज फेसबुक, व्हाटसा एप सारखेच इन्स्टाग्राम सुद्धा संवाद (तोही फोटो, व्हिडियोंसह) साधण्यासाठी एक सोशल व्यासपीठ असल्यामुळे इन्स्टाग्राम लोकप्रिय आहे. शंभर ओळींच्या लेखापेक्षा एका चित्राचा परिणाम जास्त होतो.

२) कल्पकतेला प्रोत्साहन – फेसबुक किंवा व्हाटसा एप वापरताना आपण प्रसिध्द करत असलेले फोटो नेहेमीच सजवतो असे नाही पण इन्स्टाग्राम मध्ये फोटो सजवण्यासाठी किंवा त्यातील छटा बदलण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत (ज्या फेसबुक किंवा व्हाटसम एप मध्ये नाहीत) ज्यामुळे एखादा सर्वसाधारण फोटो कल्पकतेने सजवल्यावर तो फोटो अतिशय आकर्षक दिसतो. इन्स्टाग्राम लोकप्रिय होण्यासाठी हेही एक कारण आहे.

३) विनामुल्य एप – आपल्याकडे एक म्हण आहे “फुकट ते पौष्टिक” आणी बहुतांश लोकांना केवळ पौष्टिकता महत्वाची असते. ओर्कुटची लोकप्रियता मोडीत काढत सोशल नेटवर्कींगची नव्याने ओळख करून देणाऱ्या फेसबुकचा (“फेसबुक ईज फ्री, एंड ऑलवेज विल बी”) कित्ता इन्स्टाग्रामने गिरवल्याने याकडे अधिकाधिक लोक आकर्षित झाले. ब्लॅकबेरीनेही मग उशिरा का होईना ह्या मार्गाने जायचे ठरवले.

इन्स्टाग्राम कसे वापरावे?
इन्स्टाग्राम दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेले एप आहे. तुम्हीही जर इन्स्टाग्राम वापरण्याचा विचार करत असाल तर शुभस्य शीघ्रं.. आपण इन्स्टाग्राम कसे वापरावे हे बघुयात.

१)  इन्स्टाग्राम हे केवळ स्मार्टफोनसाठी तयार करण्यात आले आहे (ते संगणकावरुनही थोडेफार वापरता येते) त्यामुळे सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये ते  ईनस्टॉल करून घ्या. आज इन्स्टाग्राम एड्रोंईड, एपल फोन आणी विंडोज फोनसाठी उपलब्ध आहे.


२)  एप सुरु करा. तुम्हाला तीन पर्याय दिसतील
*  Register with Facebook – जर अधिक कष्ट न घेता तुम्हाला इन्स्टाग्राम वापरायचे असेल तर हा पर्याय निवडा. तुमची माहिती फेसबुक वरून घेऊन इथे आपोआप नोंदवली जाईल पर्याय निवडल्यावर यासाठी फेसबुक तुम्हाला परवानगी मागेल तिथे Allow निवडा.

*  Register with Email – एखाद्या संकेस्थळावर खाते उघडताना ज्याप्रमाणे ई-मेल, पासवर्ड, युजरनेम लिहून खाते उघडतो तसेच इथेही ही माहिती भरा. माहिती भरतानाच ती तपासली जाते.

* Log In – तुम्ही आधी जर इन्स्टाग्राम वापरले असेल तर हा पर्याय निवडा, आणी तुमची माहिती भरून प्रवेश करा.

३)  लॉग ईन झाल्यावर तुम्हाला ५ वेगवेगळे पर्याय दिसतील.


इन्स्टाग्राम | सोशल नेटवर्किंगची नवी ओळख




होम – हा पर्याय तुम्हाला तुमचे प्रसिद्ध केलेले फोटो आणी तुम्ही ज्या व्यक्तींना फॉलो करत आहात त्या व्यक्तींनी प्रसिद्ध केलेले फोटो दाखवेल.

एक्स्प्लोर – हा पर्याय तुम्हाला इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध झालेले फोटो लॉटरी पद्धतीने दाखवेल (म्हणजे तुम्ही त्या फोटो प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीला ओळखत नसलात तरीही)

कॅमेरा – हा पर्याय अर्थात तुम्हाला कॅमेराने नवीन फोटो काढून ते प्रसिद्ध करण्याची सुविधा देतो. प्रसिद्ध करण्यापूर्वी तुम्ही ते फोटो अधिक आकर्षक बनवू शकता. प्रसिद्ध करताना ते त्याच वेळी कॅमेरामधुन काढलेले हवेत असा नियम नाही त्यामुळे तुम्ही आधी काढलेले फोटो देखील प्रसिद्ध करू शकता.

न्युज – हा पर्याय तुम्हाला तुमच्या खात्याशी सलग्न असणारी माहिती (फेसबुकवर ज्याप्रमाणे नोटिफिकेशन दिसतात त्याप्रमाणे) उदाहरणार्थ फ्रेंड रिक्वेस्ट वैगेरे

प्रोफाइल – या पर्यायावर अर्थात तुम्हाला तुमच्या खात्याविषयी माहिती मिळेल आणी तुम्ही इथून ती बदलूही शकता. खात्यावर असलेला फोटो, ई-मेल पत्ता, युजरनेम तुम्ही इथून बदलू शकता.

आता भारतात एड्रोंईड वापरकर्त्यांची संख्या वाढल्यामुळे भारतदेखील इन्स्टाग्रामच्या लोकप्रियतेला अपवाद नाही. इन्स्टाग्रामनेने महानायक अमिताभ बच्चन यांच्या पासून सर्वसाधारण वापरकर्त्यापर्यंत सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. तुम्हीही हे एप वापरून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. इन्स्टाग्राम सुरु केल्यावर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. (Mr_Walimbe, )

+ यशोधन वाळिंबे

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.\


0 comments:

Post a Comment