आपण इंटरनेट वापरताना सतत वेगवेगळ्या संकेस्थळांवर भेटी देत असतो पण बर्याचशा संकेतस्थळांवर एक अशी यंत्रणा कार्यान्वीत केलेली असते जी येणाऱ्या प्रत्येक वापरकर्त्याची माहिती गोळा करते. आपण कोणता ब्राऊजर वापरत आहोत, आपल्या संगणकावर कोणती संगणक प्रणाली (Oprating System) प्रस्थापित केलेली आहे याशिवाय आपण जगातल्या कुठल्या देशातून, शहरातून भेट देत आहोत याची खडानखडा माहिती गोळा करणे हे संकेतस्थळावरील त्या यंत्रणेचे काम असते. आपली खासगी माहिती, संकेतस्थळ अधिकाधिक उपयुक्त आणी वापरण्यासाठी सोपे करावे म्हणून घेतली जाते. गुगलकाकांनी इथेसुद्धा पहिला क्रमांक पटकावलाय, आपली खासगी माहिती वापरून आपल्यालाच सर्वाधिक उपयुक्त ठरणाऱ्या जाहिराती दाखवल्या जातात, ज्यामुळे आपण बघत असलेल्या जाहिराती आपल्याला आवडण्याची किंवा उपयुक्त ठरण्याची दाट शक्यता असते. इतर संकेतस्थळे देखील अशा प्रकारे माहिती गोळा करून आपापल्या आवश्यकतेनुसार त्या माहितीचा वापर करतात.
थोडक्यात काय तर बंद खोलीमधुन जरी कोणतेही संकेतस्थळ बघितले तरी तुमची माहिती ही लपवता येत नाही. आज आपण गुप्तपणे इंटरनेटवर मुशाफिरी (web surfing) कशी करता येईल हे बघुयात.
वेब ब्राऊजरच्या मदतीने आपण आपली ओळख न उघड करता इंटरनेटवर संकेतस्थळे पाहू शकतो. गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर अशा तिन्ही वेब ब्राऊजर्समध्ये ती सोय दिली आहे. या पर्यायाला Private Browsing असे म्हणतात. प्रायवेट ब्राउझिंगचा मुख्य फायदा म्हणजे त्याच्या कुठल्याही खुणा संगणकावर रहात नाहीत (हिस्ट्री किंवा इतर टेम्प फाईल्स) याशिवाय शुद्ध इंटरनेटचा आस्वादही यामुळे मिळतो (इतर वेळी पर्सनलायझेशन ह्या गोंडस नावाखाली जवळपास ३० ते ५०% माहिती वेगळ्या स्वरुपात दाखवण्यात येते, जी बहुतेकदा तुमची आवड,वेळ,स्थळ हे पाहून ठरवली जाते). इथे तिन्ही लोकप्रिय वेब ब्राऊझर्स मध्ये Private Browsing कसे वापरावे हे चित्रासह दिले आहे.
१) गुगल क्रोम – सर्वात सोपे आणी जलद प्रायवेट ब्राउझिंग क्रोमचा वापर करून करता येते, यासाठी प्रथम गुगल क्रोम सुरु करा, तुम्हाला क्रोम बंद करायच्या फुलीखाली तीन आडव्या पट्ट्या दिसतील (जुन्या क्रोममध्ये पाना दिसेल) त्यावर टिचकी देऊन “New Incognito Window” वर टिचकी द्या.
एक नवीन खिडकी उघडेल, त्यात जर वर डाव्या कोपऱ्यामध्ये गुप्तहेराची आकृती दिसली की समजा तुमचे प्रायवेट ब्राउझिंग सुरु झाले आहे, आता इथे हवे ते संकेतस्थळ टाका आणी मनमुरादपणे मुशाफिरी करा.
गुगल क्रोम प्रायवेट ब्राउझिंग साठी शॉर्टकटकंट्रोल + शिफ्ट + एन = (Ctrl + Shift + N)
२) मोझीला फायरफॉक्स – सर्वप्रथम मोझीला फायरफॉक्स सुरु करा, त्यात तुम्हाला टूलबारवरील पर्यायांमध्ये Tools हा पर्याय दिसेल, त्यावर टिचकी देऊन Start Private Browsing निवडा
आणी तुम्ही जर पहिल्यांदाच हे वापरत असाल तर तुम्हाला पुन्हा याबाबत विचारले जाईल (Confirmation) तिथे Do not show this message again वर टिक करून Start Private Browsing वर टिचकी द्या.
आता नवीन खिडकी उघडेल ज्यात इथे दिलेल्या चित्राप्रमाणे एका मास्कचे चिन्ह दिसेल, इथून तुम्ही Private Browsing सुरु करू शकता.
मोझीला फायरफॉक्स प्रायवेट ब्राउझिंग साठी शॉर्टकटकंट्रोल + शिफ्ट + पी = (Ctrl + Shift + P)
3) इंटरनेट एक्सप्लोरर – सर्वप्रथम तुमच्या इंटरनेट इंटरनेट एक्सप्लोररची आवृत्ती ८ किंवा त्यापेक्षा पुढची असल्याची खात्री करा. (यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर सुरु केल्यावर Help निवडून About Internet Explorer) वर टिचकी द्या. नवीनतम आवृत्ती या दुव्यावर मिळेल. इंटरनेट एक्सप्लोरर सुरु केल्यावर वरील उजव्या कोपर्यात फुलीच्या खाली एक निळे चक्र दिसेल त्यावर टिचकी द्या, Safety या पर्यायावर तुमचा माउस न्या,
आणी In Private Browsing वर क्लिक करा.
नवीन खिडकीतून तुम्ही Private Browsing सुरु करू शकता.
इंटरनेट एक्सप्लोरर प्रायवेट ब्राउझिंग साठी शॉर्टकटकंट्रोल + शिफ्ट + पी = (Ctrl + Shift + P)
आता आवश्यक असेल तेव्हा प्रायवेट ब्राउझिंगचा नक्की वापर करा आणी इंटरनेटच्या दुनियेत गुप्तपणे मुशाफिरी करा, आणी काही अडचण उद्भवली तर इथे मांडा, आम्ही मदतीसाठी आहोतच..!!
0 comments:
Post a Comment