नेटभेटच्या वाचकांना मराठी ऑनलाईन साहित्याशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करत असतो. नेटभेट ई-पुस्तक लायब्ररी मध्ये जास्तीत जास्तीत मराठी ई-पुस्तके आणण्याच्या आमच्या प्रयत्नांतर्गत आज आम्ही सात नविन पुस्तके आपल्या भेटीला आणत आहोत. ही ई-पुस्तके आपल्या पसंतीस उतरतील याची आम्हांला खात्री आहे.
यापैकी पहिले पुस्तक आहे सुनिल लिमये आणि क्यू.एस्.खान यांनी लिहिलेले "यशाची गुरुकिल्ली" हे Motivational पुस्तक. ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध असलेले हे बहुदा पहिलेच मराठी मोटीव्हेशनल पुस्तक असावे आणि त्यामुळेच नेटभेटच्या वाचकांना हे पुस्तक उपलब्ध करुन देण्यात आम्हाला विशेष आनंद आहे. "Law of success for both the worlds" या इंग्रजी पुस्तकाचा हा स्वैर अनुवाद करून ते वाचकांसाठी मोफत ऑनलाईन ई-पुस्तकाच्या स्वरुपात उपलब्ध करुन दिल्याबद्दल सुनिल लिमये आणि क्यू.एस्.खान यांचे नेटभेट तर्फे खास आभार.
नेटभेट ई-पुस्तक लायब्ररी मधील नविन पाच पुस्तके सुप्रसिद्ध लेखक/नाटककार राम गणेश गडकरी यांनी लिहिलेली पाच नाटके आहेत.
मराठी रंगभूमीवरील सर्वाधिक गाजलेले "एकच प्याला" हे नाटक आणि त्याचसोबत भावबंधन, पुण्यप्रभाव, प्रेमसंन्यास, वेड्यांचा बाजार ही गडकर्यांची इतर नाटकेही आता नेटभेटवर ई-पुस्तकांच्या स्वरुपात वाचता येणार आहेत.



राम गणेश गडकर्यांनी "मासिक मनोरंजन" मध्ये "बाळकराम" या टोपणनावाने विपुल लेखन केले. पुढे यातील काही लेखांचा संग्रह "रिकामपणाची कामगिरी" ह्या नावाने पुस्तकरुपात प्रसिद्ध झाला. रिकामपणाची कामगिरीसह इतर सर्व लेख 'संपुर्ण बाळकराम आणि श्रीगणेशा" येथे अंतर्भूत केला आहे.
http://ebooks.netbhet.com
0 comments:
Post a Comment