अॅडसेन्स बद्दल बर्यापैकी माहिती आतापर्यंत आपण घेतली आहे. मला खात्री आहे की आतापर्यंत बर्याच मराठी ब्लॉगर्सनी अॅडसेन्स अकाउंट मिळवण्यासाठी तयारी सुरु देखिल केली असेल. ब्लॉगर्सना अॅडसेन्स अकाउंटसाठी पुर्वतयारी करण्यासाठी काही वेळ मिळायला हवा म्हणून या लेखमालिकेतील पाचवा लेख लिहिण्यासाठी मी मुद्दाम थोडा उशिर केला.
आता आपण अॅडसेन्समध्ये उपलब्ध असणार्या जाहिरातींचे प्रकार आणि त्यांच्या वापरासंबंधी माहिती मिळवुया.
अॅडसेन्स जाहिरातींचे मुख्य वर्गीकरंण आपण या पुर्वीच्या लेखामध्ये पाहिले आहेच. त्यापैकी Adsense for content हा प्रकार जास्त महत्वाचा आहे कारण सर्वाधिक अॅडसेन्स उत्पन्न याच प्रकारातून मिळत असते. Adsense for content मध्ये जाहिरातींचे दोन मुख्य प्रकार असतात.
- Ad unit
- Link Unit
Ad Unit म्हणजे शाब्दिक जाहिराती (Text ads), चित्रे असलेल्या जाहिराती (Image Ads) किंवा शब्द आणि चित्रे या दोनही गोष्टींचे मिश्रण असलेल्या जाहिराती. सोप्या शब्दात सांगायचे तर ज्या उत्पादनाची किंवा सेवेची जाहिरात केली जात आहे त्याबद्दलची थोडीबहुत माहिती जेव्हा जाहिरातीत समाविष्ट असते तेव्हा त्यास Ad Unit असे म्हणतात.
माझ्या अनुभवानुसार या प्रकारच्या जाहिरातींमध्ये (यापैकी Image Ads मध्ये सर्वाधिक) सर्वाधिक पैसे मिळु शकतात. मात्र काही Adsense गुरुंच्या मते Link units मध्ये जास्त पैसे मिळतात.
या प्रकारच्या जाहिरातींनाच Banner ads असे देखिल म्हणतात. बॅनर अॅड्सचे आकार ठरलेले असतात. Square/rectangle, Vertical, Horizontical असे तीन उपप्र्कार याप्रकारच्या जाहिरातींमध्ये असतात.
Square/rectangle
336 X 280 Large Rectangle
300 X 250 Medium rectangle
250 X 250 square
200 X 200 small square
180 X 150 small rectangle
125 X 125 button
Vertical
160 X 600 Wide skyscrapper
120 X 600 Skyscrapper
120 X 240 Vertical Banner
Horizontical
720 X 90 Leaderoard
460 X 60 Banner
234 X 60 Half Banner
Ad Units बद्दल काही टीप्स -
१. एका पानावर अॅडसेन्सच्या जास्तीत जास्त केवळ तीन Ad Units दाखविता येतात.
२. माझ्या अनुभवानुसार 336 X 280 Large Rectangle आणि 300 X 250 Medium rectangle या दोन आकारातील अॅड्स सर्वाधिक फायद्याच्या ठरतात.
३. वेबसाईट किंवा ब्लॉगच्या वरच्या भागात (प्रथमदर्शी भागात - Above the fold) या जाहिराती असाव्यात.
४. जर तुमच्या ब्लॉगचे पान अगदी सुटसुटीत असेल तर Image ads वापराव्यात परंतु वेबपानावर जास्तीत जास्त मजकुर असेल तर Text ads वापराव्यात. Text ads मजकुरामध्ये मिसळल्या जाउन त्यावर क्लिक्स मिळण्याची शक्यता जास्त असते.
२. Link Unit -
Link unit म्हणजे पुर्ण जाहिरात न देता जाहिरातीशी संबंधीत एका शब्दाची लिंक दाखविली जाते. या लिंकवर वाचकांनी क्लिक केल्यास ते मुळ जाहिरातीकडे किंवा जाहिरात केल्या जाणार्या उत्पादनाच्या वेबसाईटकडे वळवले जातात.
लिंक युनिट्समध्ये Horizontal आणि square असे दोन उपप्रकार असतात.
Horizontal
728 X 15
468 X 15
Square
200 X 90
180 X 90
160 X 90
120 X 90
Link Units बद्दल काही टीप्स -
१. एका पानावर अॅडसेन्सच्या जास्तीत जास्त केवळ तीन Link Units दाखविता येतात.
२. माझ्या अनुभवानुसार 728 X 15 आणि 468 X 15 या दोन आकारातील अॅड्स सर्वाधिक फायद्याच्या ठरतात.
३. वेबसाईट किंवा ब्लॉगमध्ये जेथे वाचकांनी क्लिक करण्याची शक्यता असते अशा भागात या जाहिराती असाव्यात. उदाहरणार्थ - मुख्य मेनु , साईडबार, कमेंटबॉक्स इत्यादी.
४. लिंक युनिट्स वरकरणी अगदीच निरुपयोगी वाटत असल्या तरी हुशारीने वापरल्या तर अतीशय फायद्याच्या ठरतात. नेटभेटला मिळणारे ४०% अॅडसेन्स उत्पन्न हे लिंक युनिट्समुळे मिळते. उदाहरणार्थ ebooks.netbhet.com मध्ये फिरत्या मासिकांच्या रांगेखाली गुगलच्या लिंक अॅड्स चिकटवल्या आहेत त्या पहा. वाचकांना त्या लिंक अॅड्स म्हणजे वेबसाईटचा मेनुबार आहे असा भास होतो आणि ते लिंक अॅड्सवर क्लिक करतात :-)
अॅडसेन्सच्या वरील प्रकारांची उदाहरणे पाहण्यासाठी https://www.google.com/adsense/static/en_US/AdFormats.html?hl=en_US&gsessionid=fL0lhFfniGeoHka-fR_oJA#linkunits या लिंकवर क्लिक करा.
0 comments:
Post a Comment