300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Thursday, 20 May 2010

Tagged under: ,

ऑर्कुटवर गिरवुया प प पब्लिसिटीचा.......

शीर्षक वाचून धक्का बसला असेल ना ! तुम्ही विचार कराल की हा काय बडबड करतोय.
अ आ इ... ही बाराखडी तर आपण बालपणीच शिकलोय आता हा काय नवीन सांगतोय ! तुमचं म्हणणं खरं आहे मंडळी. पण मला या लेखासाठी हेच शीर्षक योग्य वाटलं (अर्थात ते योग्य की अयोग्य तुम्हीच ठरवा). आपल्यापैकी बर्‍याच जणांना आपण केलेले कार्य (उदाहरण द्यायचंच झालं तर आपला ब्लॉग/ किंवा एखादी साईट/ एखादा फोटो किंवा Youtube वर आवडलेला एखादा व्हिडीयो इत्यादि), मग तुम्ही तयार केलेले चित्र म्हणा किंवा कविता, लेख तुम्हाला आवडलेले असेही काही, इत्यादी तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत पोहोचावे आणि त्यांनीही आपली दखल घ्यावी किंवा त्यांनीही त्याचा प्रचार आणि प्रसार करावा असं नक्कीच वाटेल असेल हो की नाही.
आता तुम्ही म्हणाल त्यात काय आम्ही ई मेल करू मित्र मैत्रिणींना ती माहिति देण्यासाठी बरोबर. पण असे किती जणांचे आयडीज तुम्ही पत्ता वही ( Address Book ) मध्ये साठवणार बरं  आणि किती जणांना तोच मेल पुन्हा पुन्हा फोरवर्ड करत राहणार. या आणि अशाच अनेक प्रकरच्या समस्या आपल्याला भेडसावतात.
या प्रश्नांना कायमचे उत्तर मिळाले आहे मला. आपल्यालाही ते माहित असेल कदाचित तरी पण माहिती म्हणून मला ते येथे नमूद करावेस वाटते. आपल्यापैकी बरीच मंडळी ऑर्कुट वापरतात. हल्ली ही सोशियल साईट वापरणे हे काही नविन नाही. पण याच सोशियल साईटद्वारे आपल्याला जाहिराती करता येतात.
आपण बघुया की ऑर्कुटद्वारे आपण कशी जाहिरात करु शकतो ! ते ही अगदी चकटफू पद्धतीने आणि तुम्ही एकदा orkut promote केले की तुमचे काम संपले. पुढचे काम तुमच्या ऑर्कुट परिवारातल्या  व्यक्तिंना (Friends) तुम्ही केलेला प्रचार आवडला तर
मी आपल्या साईटचा म्हणजेच Netbhet.com चा प्रचार आणि प्रसार कसा केला ते दाखवणार. तुम्ही जेव्हा ऑर्कुट अकाऊंटमध्ये लॉगिन होता त्या वेळी तुमच्या डाव्या हाताला खाली म्हणजे  profile,Scrapbook,photos असे लिहिलेले असते. तिथे promote या नावाचा एक पर्याय दिसेल. त्याच्यावर क्लिक करा.

promote या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचे orkut चे मुख्यपान (Home Page ) काहीसे असे दिसेल. आपोआपच तुम्ही create promotion च्या पानावर येऊन पोहोचाल. लेख जास्त लांबू नये या साठी मी ते पान कसे भरायचे आणि भरून झाल्यावर कसे दिसेल हे एकाच चित्रात दाखवले आहे. तुम्ही तुमची कल्पकता वापरून तुम्हाला जसे सुचेल त्याप्रमाणे शीर्षक( title), प्रतिक्रिया (comments) आणि मसुदा/ मथळा (contents) लिहू शकता. मी माझ्या कल्पकतेने प्रमाणे नेटभेट. कॉम ची जाहिरात आणि माहिती संक्षिप्त स्वरुपात लिहीली आहे. यात text, image आणि Youtube वरील व्हिडीओ/ ऑडिओ या प्रकारांत मोडणारे काहीही तुम्ही Advertise करु शकता.
तुमची Ad म्हणजेच निवडणूकीच्या भाषेत सांगायचे झाले तर प्रचारफलक कसा दिसेल ते बाजूलाच दिसेल. सगळी माहिती भरून झाल्यावर तुम्ही create promotion या बटणावर क्लिक करा, की झाली तुमची जाहिरात तयार !!! आता ही तयार झालेली जाहिरात तुमच्या प्रोफाईलमधील मंडळींना दिसू लागेल.

त्या advertisement चा नक्की प्रचार कसा होईल आणि आपल्या जहिरात किती जणांपर्यंत पोहोचली हे कसे बघायचे ते बघुया. त्यासाठी तुम्हाला My promotion हा पर्याय निवडावा लागेल. हा पर्याय Create Promotion च्या बाजूलाच असतो. My promotion या पर्यायाचा उपयोग तुमच्या आधी तयार केलेल्या जाहिरातींमध्ये काही फेरबदल करु शकता किंवा एखादी आधीची जहिरात काढूनदेखील टाकू शकता म्हणजेच Delete करु शकता.

 तुमच्या प्रोफाईलमधील किती  व्यक्तींना ही जाहिरात दिसली, किती मंडळींनी त्यावर क्लिक केले, किती जणांनी ती प्रोमोट केली आणि किती जणांना ती आवडली नाही याचा आराखडा देखील तुम्हाला पाहता येईल. आता माझ्या प्रोफाईलमधील एका सभासदाने आपल्या साइटची मी तयार केलेली जाहिरात प्रोमोट केली आहे म्हणूनच तिचे नाव आणि promotion या भागात तिचा सहभाग झालेला दिसतंच असेल तुम्हाला.  तिला आपल्या साईटचा हा उपक्रम आवडला आणि तिने वर दाखवल्याप्रमाणे cool, promote it! या बटणावर क्लिक केले.( हे बटण आता तुम्हाला जरी inactive दिसत असले तरी तुमच्या प्रोफाईलव्यतिरिक्त, तुमच्या प्रोफाईलमधील सदस्यांना ते जेव्हा जाहिरात स्वरुपात दिसते तेव्हा हे बटण एक्टीव असते बरं का !).


चला तर मित्रहो आजच आपल्या कार्याची माहिती द्या ऑर्कुटवर आणि फुकट पब्लिसिटी मिळवा :).
आणि हो हा लेख कसा वाटला त्याबद्दल आपल्या प्रतिक्रियादेखील मला नक्की कळवा बरं का !!!
काही सूचना असतील तर त्या देखील आमच्यापर्यंत पोहोचू द्या...

प्रथमेश शिरसाट       www.lekhaankan.co.cc/prathmesh.shirsat@gmail.com

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment