युनिकोड वापरुन संगणकावर मराठीत लिहिण्याची सोय झाल्यामुळे ईंटरनेटवर बर्याच मराठी साईट्स, ब्लॉग्ज तयार झाले. अधिकाधिक ज्ञान व माहिती वाचकांसाठी उपलब्ध होऊ लागली आणि आता हा मराठी ज्ञानस्त्रोत अखंड वाढतच आहे. जगातील सर्वात मोठे सोशल नेटवर्क असलेल्या फेसबुकने मराठी मनांना भुरळ घातली आणि सारे मराठी पक्षी फेसबुकच्या कट्ट्यावर जमा होऊ लागले. फेसबुकवर मराठी गप्पा रंगु लागल्या मात्र युनिकोड वापरुन मराठीत लिहिण्याची थेट सोय नसल्याने कधी देवनागरी लिपीत, कधी इंग्रजीत तर कधी इंग्रजी लिपीत लिहिलेल्या मराठीत :-)
मित्रहो, यापुढे फेसबुक (किंवा कोणत्याही साईटवर !) मराठीत लिहिण्याची एक उत्तम सोय उपलब्ध झाली आहे. आणि ही सेवा आपल्यासाठी आणली आहे गमभन (gamabhana) च्या ओंकार जोशी यांनी. यापुर्वीच बराहा आणि गुगल ने (Google IME) ने अशी सेवा पुरविलेली आहे मात्र मला गमभन ची मराठी लेखन सेवा जास्त आवडली. गमभन च्या या सेवेचं नाव आहे Fontfreedom gamabhana Toolkit. चला तर मग पाहुया Fontfreedom gamabhana Toolkit च्या सहाय्याने फेसबुक आणि इतर वेबसाईट्सवर मराठीतुन कसे लिहायचे ते.
- Fontfreedom gamabhana Toolkit हे वेब ब्राउजर मध्ये टुलबार च्या स्वरुपात ईंस्टॉल करता येते. फायरफॉक्स (Firefox), ईंटरनेट एक्सप्लोरर (internet explorer) , गुगल क्रोम (Chrome) , सफारी (safari) या सर्व आघाडीच्या वेब ब्राउजर्स मध्ये Fontfreedom gamabhana Toolkit उत्तमरीत्या काम करते. (मी गुगल क्रोमवर वापरुन पाहिले आहे) त्यासाठी Fontfreedom gamabhana Toolkit येथे क्लिक करा.
- Free install या बटणावर क्लिक करा.
- एका छोट्याश्या फॉर्ममध्ये आपली माहिती विचारण्यात येईल. (नाव, ईमेल पत्ता, शहर आणि मोबाईल नंबर - यापैकी फक्त नाव आणि ईमेल पत्ता देणे सक्तीचे आहे.) . माहिती पुर्ण भरुन Download या बटणावर क्लिक करा.
- Free Download असे बटण दिसु लागेल. त्यावर क्लिक करा.
- Browser extension डाउनलोड झाल्यानंतर install करा.
- आता खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे ब्राउजर टुलबार इन्स्टॉल झालेला असेल. मराठीत लिहायचे असल्यास चित्रात बाणाने दाखविलेल्या Enable Toolkit या बटणावर क्लिक करा.
- Fontfreedom gamabhana Toolkit Loaded असे एका गुलाबी रंगाच्या बॉक्स मध्ये दिसेल आणि त्यानंतर संकेतस्थळावर (जे कोणते संकेतस्थळ उघडले असेल त्यावर उदा. फेसबुक, गुगल, ऑर्कुट, जीमेल इत्यादी) लिहिण्याच्या जागेवर गुलाबी रंगांची एक चौकट दिसेल. त्यामध्ये फोनेटीक कीबोर्ड च्या सहाय्याने मराठी लिहिता येईल. उदाहरणार्थ - मराठी लिहायचे असेल maraThee असे लिहावे, सलिल लिहायचे असेल तर salil असे लिहावे.
तर मग आता हे टुल वापरुन मराठीत लिहिण्याचा आनंद मिळवा. मात्र ही अप्रतिम सेवा आपल्यापर्यंत मोफत पोहोचवणार्या गमभन ला आणि ओंकार जोशींना धन्यवाद द्यायला विसरु नका.
0 comments:
Post a Comment