
ईंटरनेट म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर आहे. तुम्ही फक्त विषय निवडा, त्या विषयाबद्दल माहीती देणार्या कित्येक वेबसाईट्स इंटरनेटवर अस्तीत्वात असतील. गरज आहे ते फक्त शोधण्याची.
ईंटरनेटवर शोधण्याची वेळ आली की गुगल काकांना पर्याय नाही. मात्र गुगलवर सर्च केल्यानंतर प्रत्येक वेळेस आलेले सर्व रीझल्ट्स त्या विषयावर आधरीत असतीलच असे नाही. फार फार तर पहिले २-३ रीझल्ट्स आपल्या शोधविषयाशी संबंधीत असतात. अशा वेळेस गुगल सर्च मधुन मिळालेल्या सर्वात योग्य साईटसारख्या साइट्स शोधाव्यात.
यालाच असोसीएटीव्ह ब्राउजिंग (associative browsing) असे म्हणतात. असोसिएटीव्ह ब्राउजिंगची सेवा देणार्या अनेक उत्तम वेबसाईट्स ईंटरनेट जगतात उपलब्ध आहेत. आज यापैकीच एका वेबसाईट्ची आपण माहीती करुन घेउ.
या साईटच्या नावावरुन आपण ओळखले असेलच की दीलेल्या वेबसाईटशी संबंधीत किंवा त्या वेबसाईटसारख्याच इतर वेबसाईट्स similarsites.com वर शोधता येतात.
उदाहरणार्थ जर तुम्ही युट्युब वरील व्हीडीओज पाहुन कंटाळला असाल (याची शक्यता खुपच कमी आहे!) तर similarsites.com वर जाउन युट्युब.कॉम सर्च करा. या विषयाशी संबंधीत युट्युब सारख्या १९ वेबसाईट्सची एक छान यादीच तुमच्यासमोर तयार होइल.
similarsites च्या अल्गोरीदम मधील काही दोषामुळे आलेले सर्वच रीझल्ट्स बरोबर असतातच असे नव्हे. मात्र साधरण ८०-९०% रीझल्ट्स हे दीलेल्या साईटसारखेच असतात. एवढेच नव्हे तर similarsites.com चे मॉझीला फायरफॉक्स ब्राउजरचे अॅड-ऑन देखील डाउनलोड करता येते. हे अॅड-ऑन ईंस्टॉल केल्यानंतर फायरफॉक्स ब्राउजरमध्ये एक बटण दाखवते. या बटणावर क्लिक करुन आपण पाहत असलेल्या वेबसाइटसारख्या इतर साइट्सची यादी पाहता येते.
http://www.netbhet.com/ असे similarsites.com वर सर्च केल्यानंतर मात्र नेटभेट्सारखी एकही वेबसाईट मिळाली नाही. म्हणजेच नेटभेटसारखी एकही साइट अस्तीत्वात नाही असे म्हणण्यास हरकत नाही :-)
similarsites.com चे अनेक फायदे आहेत. जर एखादी छान वेबसाईट तुम्हाला मिळाली परंतु ती साईट वापरण्यासाठी पैसे (PAID SITE) द्यावे लागत असतील तर लगेच similarsites वर जाउन त्या वेबसाईटसारख्या इतर साईट शोधाव्यात. कदाचीत तुम्ही पाहत असलेल्या विषयावर उपलब्ध असलेली मोफत वेबसाईट तुम्हाला मिळेल.
किंवा तुमचा ईंटरनेट बिझनेस असेल तर similarsites वर जाउन आपल्या वेबसाईटसारख्या साईट्सचा शोध घ्यावा. यावरुन तुम्हाला तुमच्या स्पर्धकांच्या साइट्सची माहीती मिळेल.
मग आजच भेट द्या similarsites.com ला आणि गुगलला थोडे बाजुला ठेऊन असोसीएटीव्ह ब्राउजिंगच्या (associative browsing) विश्वात प्रवेश करा.
0 comments:
Post a Comment