हल्ली आपण सगळेच फार व्यस्त झालो आहोत. आपण एक ना अनेक गोष्टी एकत्र करत असतो. एकाच वेळी अनेक चेंडू झेलणारया सर्कशीतल्या खेळाडूसारखं. अशी अनेक कामं लक्षात ठेवण हे महाकठीण काम. पण एक बरं आहे, या कामी तंत्रज्ञानाने आपली बरीच मदत केली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे apps आणि softwares याकामी आपली मदत करतात. मित्रहो, आज आपण अशाच एका app ची माहिती घेणार आहोत.
पण हे app म्हणजे आधीच उपलब्ध असलेल्या डझनभर to do list apps सारखे नाही आहे. माझ्या मते हे app आतापर्यंत असलेल्या सर्व to do list app पेक्षा खूपच वेगळे आणि नाविन्यपूर्ण आहे. साधेपणा आणि सहज वापर हे या app चे दोन अतीमहत्वाचे गुण. मित्रांनो या app चे नाव आहे workflowy.
workflowy.com या साईटवर लॉग इन करून हे वापरता येते. आणि हो, बेसिक वापरासाठी हे app पूर्णपणे मोफत आहे. आपल्या मेंदूची विचार करण्याची कार्यपद्धती लक्षात घेऊन अगदी त्याप्रमाणे हे app बनवण्यात आले आहे. मी जेव्हापासून हे app वापरायला सुरुवात केली तेव्हापासून याच्या प्रेमातच पडलोय. माझ्या वेब ब्राउजर मध्ये Workflowy चा tab नेहमीच चालू असतो. आणि workflowy वापरायला सुरुवात केल्यापासून माझी अनेक कामे निट वेळेवर पूर्णही करू शकलो मी. तेव्हा तुम्ही देखील workflowy वापरायला सुरुवात करा आणि बघा तुमची कामे पटापट पूर्ण होतात की नाही ते !
0 comments:
Post a Comment