[ MARATHI ].......
मागील आठवड्यात आपण प्रकाश मुंध्रा या युवकाने सुरु केलेल्या पुजा साहीत्याच्या अनोख्या व्यवसायाविषयी माहीती घेतली. अशाच एका जगावेगळ्या कल्पनेवर आधारीत एक आगळावेगळा बिझनेस मुंबईच्या एका तरुणाने सुरु केला. त्या तरुणाचे नाव आहे संदीप गजाकस. संदीपची ही अतीशय प्रेरणादायी कथा खास नेटभेटच्या वाचकांसाठी.काय आहे संदीपचा आगळावेगळा बिझनेस? संदीप गजाकस या तरुणाचा व्यवसाय आहे अगदी साधा आणि सोपा, लाँड्रीचा ! होय संदीपने चालु केली आहे एक लाँड्री, पण साधीसुधी कपडयांची लाँड्री नव्हे तर SHOE LAUNDRY म्हणजेच बुटांची लाँड्री. काय, चमकलात ना ऐकुन?
अगदी चाकोरीबाहेरचा असला तरी संदीपचा हा व्यवसाय अगदी साधा आणि सोपा आहे. कोणाचे शुज धुऊन आणि साफ करुन एखादा फायदेशीर व्यवसाय उभा करता येइल याची कोणालाच कल्पना नव्हती. मात्र तरीही स्वत:च्या सेवींग्जमधुन काही पैसे जमा करुन संदीपने भारतातील पहीली शु लाँड्री सुरु केली.
मुंबईच्या मिठीबाई कॉलेजात शिकत असताना संदीपला प्रथम शु लाँड्रीची कल्पना आली. संदीपच्या कॉलेजमधील श्रीमंत घरातील मुले त्यांच्या बुटांविषयी अतीशय बेफीकीर होती. एकदा वापरुन झाल्यानंतर जरा खराब झालेले बुट ते फेकुन देत असत. तेव्हा संदेपने एका मित्राबरोबर लावलेल्या पैजेमधुन या कल्पनेचा उदय झाला. संदीपने केवळ पैजेखातर त्याच्या मित्राचे बुट अगदी नव्यासारखे चांगले करुन आणले. इतके चांगले की त्याच्या मित्राला ते त्याचेच शूज आहेत यावरच विश्वास बसला नाही. तेव्हाच संदीपला शू लाँड्रीची कल्पना आली.
मात्र पुढे कॉलेज संपल्यावर संदीपने चारचौघांसारखा नोकरीचा मार्ग पत्करला. फॅशन कोरीओग्राफर, इव्हेंट मॅनेजर, क्लब लेव्हल फुटबॉल प्लेयर आणि कॉल सेंटर असे अनेक जॉब्ज त्याने केले. कॉल सेंटर मध्ये जॉब करताना संदीपने ग्राहकांबरोबर बोलण्याचा चांगला अनुभव मीळवला. त्यानंतर अचानक संदीपला त्याच्या जुन्या कल्पनेची आठवण झाली आणि त्याने शु लाँड्री सुरु करण्याचा निश्चय केला. मात्र त्याच्या या बिझनेस आयडीयाबद्दल वडीलांना समजावणे काही त्याला शक्य झाले नाही.
कुणाच्याही पाठींब्याशिवाय संदीपने त्याचा व्यवसाय सुरु केला. त्याच्या बेडरुममध्येच त्याने वर्कशॉप थाटले. मित्रांच्या मदतीने छोटेसे मार्केटींग कँपेन केले. सुरुवातीला संदीपने स्वतःच मार्केटींग, क्लिनींग, डीलीव्हरी आणि बिलिंग या सर्व बाजु हाताळल्या. संदीप त्याच्या ग्राहकांना सांगत असे की आज डीलीव्हरी बॉय दुसर्या ठीकाणी गेला आहे त्यामुळे मी स्वतःच डीलीव्हरी घ्यायसाठी आलोय. संदीप म्हणतो खरेतर मला स्वतःला डीलीव्हरी करणे आवडते कारण आपले शुज अगदी नवे झालेले पाहुन ग्राहकांच्या चेहर्यावर खुलणारा आनंद पाहणे मला आवडते.
मुंबई मध्ये बुटांना खुप धुळ आणि खराब वातावरणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे शु लाँड्रीची आवश्यकता आहेच. बुटांच्या एका जोडीच्या क्लीनींगचे संदीप १२० रुपये घेतो. यामध्ये ग्राहकाच्या घरुन बुट नेणे, त्यांची डागडुजी, साफसफाई, सुकवणे आणि परत ग्राहकांच्या घरी पोचवणे या सर्वांचा समावेश आहे. ऑफीसची जागा परवडत नाही म्हणुन संदीपने ग्राहकांच्या घरी पिक अप व डीलीव्हरी करण्यास सुरुवात केली.
शॉपर्स स्टॉपमधील एका कस्टमरने त्यांना संदीपच्या शु लाँड्रीबद्दल सांगीतल्यानंतर शॉपर्स स्टॉपने त्याला त्यांनी विकलेल्या बुटांची आफ्टर सेल्स सर्वीस म्हणजेच विक्री पश्चात सेवा पुरवण्याचे कंत्राट दीले. त्यानंतर संदीपने कधीच मागे वळून पाहीले नाही. आज अॅडीडास, रीबॉक, नायके अशा सर्व मोठ्या ब्रँड्सची मुंबईतील विक्री पश्चात सेवा संदीप सांभाळतो.
संदीपने सुरुवात केल्यानंतर या व्यवसायात आठ नविन स्पर्धक आले मात्र त्यांचा टीकाव लागु शकला नाही. या कमी मार्जीन बिझनेसमध्ये त्यांचा टीकाव लागणे कठीण होते. मात्र संदीपने खुप कौशल्याने त्याचा व्यवसाय वाढवत नेला. दररोज साधारण ५०-६० बुटांचे जोड संदीपकडे क्लीनींगसाठी येतात. आणि त्यांची क्लीनींग, दुरुस्ती व डीलीव्हरी करण्यासाठी संदीपकडे नऊ कामगार आहेत.
संदीपने त्याच्या डीलीव्हरी बॉयला एकाच गोष्टीकडे लक्ष द्यायला सांगीतले आहे, ते म्हणजे अगदी नविन दीसणारे बुट पाहुन ग्राहकाच्या चेहर्यावर खुलणारे आश्चर्यमिश्रीत हास्य !
Contact him at sandeep@ shoelaundry.com
Image source
0 comments:
Post a Comment