300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Saturday, 8 August 2015

Tagged under: , , , , ,

गुगल ट्रान्सलेट अप्लिकेशन - व्हीज्युअल ट्रान्सलेशन आता हिंदीमध्येही !

गुगल ने नुकताच त्यांच्या गुगल ट्रान्सलेट या अप्लिकेशनला अपडेट केलं आहे. या अपडेट मध्ये गुगलने २७ भाषांमध्ये visual translation उपलब्ध करून दिले आहे. आणि मुख्य म्हणजे जगभरातील २६ इतर भाषांसोबत हिंदीचा देखील समावेश करण्यात आला आहे.

व्हीज्युअल ट्रान्सलेशन ही एक  अफलातून सुविधा आहे. यासाठी फक्त अँप उघडून कॅमेरा सुरु करायचा आणि ज्या मजकुराचा अनुवाद करायचा आहे त्याकडे फक्त कॅमेरा न्यायचा…बस एवढंच करायचंय ! रस्त्यावरील एखादा फलक , खाद्यपदार्थाच्या पाकिटावरील साहित्याची यादी , ट्रेनचा फलक, किंवा पुस्तकातील मजकूर असुदे गुगल ट्रान्सलेट अँप आपल्याला त्वरीत हव्या त्या भाषेमध्ये अनुवाद करून देते. 



गुगल ट्रान्सलेट अँप मध्ये हिंदी भाषा वापरण्यापुर्वी सुरुवातीला एकदाच फक्त 2MB चा Hindi Language Pack डाउनलोड करून घ्यावा लागतो. एकदा तो डाउनलोड झाला की मग विनासायास अगदी कमी स्पीडच्या इंटरनेट कनेक्शन मध्ये देखील हे अँप वापरता येते.  सध्या फक्त इंग्रजी ते हिंदी असे एकतर्फी भाषांतर उपलब्ध आहे परंतु लवकरच हिंदी ते इंग्रजी असे भाषांतर देखील उपलब्ध होईल. 


सध्या जरी हे अँप फक्त हिंदी या एकाच भारतीय भाषेसाठी उपलब्ध असले तरी भारतातील मोबाईल्सचा वाढता प्रसार लक्षात घेता इतर भारतीय भाषांचा देखील यात लवकरच समावेश होईल हे नक्की ! यात मराठीचा नंबर कधी लागतो ते महत्वाचे ! तोपर्यंत हिंदी अनुवादाचा आनंद घ्यायला काय हरकत आहे !!
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment