गुगल प्रेझेंटेशन ही एक ऑनलाइन प्रेझेंटेशन प्रणाली आहे. ऑनलाइन असल्यामुळे इंटरनेट च्या माध्यमातून केव्हाही आणि कुठुनही बघता येते. इतकेच नव्हे तर Email मार्फत प्रेझेंटेशन हव्या त्या व्यक्तिंना share करून एकाच वेळी एकत्रितपणे त्याच्यावर कुठुनही काम करता येते.
Microsoft Powerpoint आणि Google Docs मधील Presentation मध्ये प्रामुख्याने फरक आहे तो म्हणजे, समजा आपण केलेले presentation आपण कुणाला इमेल द्वारे पाठवले तर Microsoft Presentation पहाण्याकरता आपल्याला संगणकावर MS office हे software install करावे लागते आणि त्यातील powerpoint software च्या मदतीनेच आपल्या presentation पहाणे शक्य होते. मात्र Google Docs मधील presentation पहाण्याकरता कोणत्याही software ची गरज लागत नाही. ज्या व्यक्तिला पाठवायचे त्या व्यक्तिचा Email address देऊन share केले की झाले काम. इंटरनेट च्या मदतीने हवे तेव्हा ते presentation पहाता येते.
1. drive.google.com मध्ये आपल्या जीमेल पत्त्याचा वापर करून Log In करा. डावीकडच्या Create बॉक्स वर क्लिक करून त्यातला Presentation हा पर्याय निवडावा.
2. एक नवीन स्लाइड उघडेल, त्यात प्रेझेंटशन चे योग्य ते Title आणि Subtitle द्यावे.
3. आकृती १ पहा. मेन्यू बार वरील >>> Slide >>> या बटणावर क्लिक करून >>> “New Slide” पर्याय निवडावा. एकूण स्लाइडचे खालीलप्रमाणे ६ वेगवेगळे प्रकार निवडता येतील.
c. टायटल आणि दोन कॉलम असलेली स्लाइड
d. फक्त टायटल असलेली स्लाइड
e. नुसते कॅप्शन असलेली स्लाइड
f. रिकामी स्लाइड,
आकृती २
4. आकृती २ पहा. यातली कोणतीही स्लाइड निवडली आणि नंतर त्याचा प्रकार बदलावासा वाटला तरी मेन्यू बार वर >>> Slide >>> Change Layout वर जाऊन आपल्याला स्लाइड हव्या त्या प्रकारात बदलता येईल.
5. आकृती ३ पहा. त्याचप्रमाणे Slide बटणावरचे इतर पर्याय वापरून खालील बदल करता येतील.
* | A) नवीन (New) Slide तयार करणे, केलेल्या slide पैकीच एखादीची Duplicate करणे, slide delete करणे ही कामे होतात. B) Change Background मध्ये स्लाइड ची पार्श्वभूमी बदलता येते. प्रत्येक स्लाइड ला वेगवेगळी पार्श्वभूमी देता येते. नुसती रंगीत अथवा एखादी चित्राची पार्श्वभूमी देता येते. Change Layout वर जाऊन आपल्याला स्लाइड हव्या त्या प्रकारात बदलता येईल. Change Theme मध्ये प्रेझेंटेशन ची रंगसंगती बदलता येते. C) Change Transition मध्ये एक स्लाइड संपून दुसरी स्लाइड सुरू होताना कोणते परीणाम दिसावेत हे ठरवता येते. प्रत्येक स्लाइड ला वेगवेगळे ट्रान्झिशन देता येते. D) Move slide up / Down हा पर्याय वापरून स्लाइड ची जागा वर / खाली हवी तिथे बदलता येते. |
आकृती ३
6.त्याचप्रमाणे Insert या मेन्यू वर एखादे चित्र (picture) , टेक्स्ट बॉक्स, एखादा आकार (shape), Word Art, Table आणि Video इन्सर्ट करायचे देखील पर्याय उपलब्ध आहे.
Slide आणि Insert मेन्यू वरचे हे मुख्य पर्याय Main Menu बार च्या खाली थेट चित्र / लेबल स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. आकृती ४ पहा.
आकृती ४
7.Format Menu मध्ये जाऊन टाईप केलेल्या मजकूराची (Text) सजावट करता येते.
8. Arrange Menu मध्ये जाऊन चित्रांची (Picture) सजावट करता येते.
9. आकृती ५ पहा. Slide menu मधील Change Theme चा वापर करून slides ची रंगसंगती निश्चित करता येते. २० वेगवेगळ्या रंगसंगतीच्या स्लाइड्स इथे तयार आहेत, त्याचा वापर करून आपल्याला एखादी थीम निश्चित करता येईल. जी Theme निवडली जाईल, ती संपूर्ण प्रेझेंटेशनकरता एकच असेल. फार फार तर मागची Background बदलून किंवा काही shapes add करून एका किंवा अनेक स्लाइडस मध्ये बदल करता येतील.
आकृती ५
10. Slide menu मधील Transition चा वापर करून Interactive Presentations करता येतात.
आकृती ६
आकृती ६ मधील A हा भाग एखादी विशिष्ट slide चे Transition कसे असेल हे दर्शवितो.
- कोणतीही स्लाइड Fade , slide from right, slide from left, Flip, Cube आणि Gallry हे सहा पर्याय वापरून सरकवता येते. त्याचप्रमाणे हा बदल slow, medium की fast हवा हे ठरवता येते. प्रेझेंटेशन मधल्या सगळ्या slides ना एकच पर्याय लागू होतो की प्रत्येक slide वेगळ्या प्रकाराने सरकवता येईल हे देखील इथेच निश्चित करता येत.
- आणि C. असे दोन Text box वरच्या चित्रात दिसत आहेत. ही दोन स्वतंत्र objects आहेत हे त्यांच्या भोवती असलेल्या चौकटीवरून लक्षात येईल. ही दोन्ही objects animate करण्याचा पर्याय आपल्याला मिळतो. B किंवा C यापैकी एखादे object निवडून Select an object to animate वर गेल्यावर…..
आकृती ७
आकृती ७ व ८ पहा
उदा. 10 व्या अनुक्रमांकात जी दोन B आणि C objects आहेत, त्यापैकी C चे animation होताना….ते माऊस क्लिक नंतर होईल की B च्या animation सोबतच होईल की B च्या animation नंतर होईल ही क्रिया ठरवता येते.
| * आकृती ८ D. हे animation कोणत्या स्पीड(slow, medium, high) ने व्हावे हे इथे ठरवता येते. |
11. गुगल ड्राइव्ह वर काम करत असताना, प्रत्येक बदल आपोआप सेव्ह होत असतो. त्यामुळे केलेले काम सेव्ह केले गेले नाही असा प्रश्नच उपस्थित होत नाही. अर्थात् अश्या आपोआप डेटा सेव्ह होण्याने कधीकधी डोकेदुखी होऊ शकते. उदा. एखाद्या प्रेझेंटेशन मध्ये समजा आत्ता केलेल्या कामापेक्षा तासाभरापूर्वी केलेले काम जास्त योग्य वाटेल. अश्या वेळी गुगल ड्राइव्ह हे क्लाऊड स्टोअरेज असल्याचा फायदा मिळतो आणि केलेला प्रत्येक बदल आपल्याला File मेन्यू मधील >>> See Revision History वर जाऊन तपासून पहाता येतो. तो बदल पुन्हा प्रत्यक्षात देखील आणता येतो.
* | * |
आकृती ९
12. आपण तयार केलेल्या Google Docs Presentation मध्ये इतरांकडून आपल्याला काही मदत हवी असेल तर आपण त्यांच्याबरोबर ते share करून, त्यांनाच त्यात बदल करायची मुभा देऊ शकतो. त्यामुळे एकाच वेळी एकाच Presentation वर अनेक जण काम करून त्यात योग्य ते बदल करु शकतात हा Google Docs Presentation चा सगळ्यात मोठ्ठा फायदा आहे.
आकृती १०
आकृती १० मध्ये उजव्या कोप-यात दिसत असलेल्या एक निळ्या रंगाच्या share बटणावर क्लिक केल्यावर किंवा File menu मधील Email Collaborators वर क्लिक केल्यावर ही विन्डो उघडेल.
- या आकड्याखाली एक link दिसते आहे, पण त्या link वर उठसूठ कोणालाही जाऊन Presentation बघता/ बदलता येणार नाही. कारण..
- हे presentation अजून Private आहे आणि Owner व्यतिरिक्त ते कोणालाही share केलेले नाही.
- invite people च्या खाली एक रिकामा आयत दिसतो आहे तिथे ज्या व्यक्तींना ह्या Presentation मध्ये बदल करायची मुभा द्यायची आहे त्यांचे इमेल आयडी टाकावेत.
- त्या शेजारी असलेला can edit चा पर्याय तसाच राहू द्यावा. एखाद्या व्यक्तिला बदल करायची मुभा द्यायची नसेल त्या वेळी हा पर्याय can view असा बदलावा.
- इतके झाल्यावर share & save करावे.
- सगळ्यात खाली “Editors will be allowed to add people and change the permission” अशी सूचना आणि त्याच्या पुढे change असा पर्याय दिसेल. या वाक्याचा अर्थ असा की ज्या व्यक्तिला आपण हे presentation edit करायची मुभा दिली आहे; ती व्यक्ती आणखी काही व्यक्तींना ही मुभा देऊ शकते किंवा दिलेल्या परवानग्यांमध्ये बदल करू शकते. हा धोका आपल्याला पत्कारायचा नसेल तर change वर क्लिक करून खाली दिल्याप्रमाणे “only owner can change the permission” हा पर्याय निवडावा. पहा आकृती ११.
आकृती ११
अश्या त-हेने एकाच presentation वर अनेक जण आपापल्या सोईने वेगवेगळ्या ठिकाणाहून काम करू शकतात.
13. आता हे तयार झालेले Presentation जर आपल्याला कुठे Embed करायचे झाल्यास File Menu मध्ये जाऊन Publish to the web हा पर्याय निवडावा. पुढे आकृती १२ प्रमाणे एक dialouge box उघडेल.
आकृती १२
1. Presentation Publish करणे थांबवण्यासाठी
2. एकदा presentation Publish झाले की ही जी link दिसते आहे, ती ज्यांना माहीत असेल त्या व्यक्ती हे Presentation बघू शकतात.
3. स्क्रिनवर दिसणारे presentation, त्याच्या player सकट कुठेही embed करण्याकरता हा कोड वापरता येईल.
4. Google+, Gmail, Facebook किंवा Twitter वर हे Presentation पोस्ट करायचे झाल्यास त्या त्या ऍप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर, त्या त्या ऍप्लिकेशन चा Dialouge Box उघडेल आणि आपल्या त्यावर असलेल्या खात्यामार्फत ते संबंधित ठिकाणी पोस्ट केले जाईल.
5. Presentation कोणत्या साईज मध्ये दिसावे याचा पर्याय इथे निवडता येईल.
6. Presentation मधल्या slides किती सेकंदांच्या अंतराने उघडाव्यात हा पर्याय इथे निवडता येईल.
7. Player load झाल्यावर लगेचच slideshow सुरू होऊ द्यायचा की नाही हा पर्याय इथे निवडता येईल.
8. शेवटची slide संपल्यावर पुन्हा slideshow सुरू करावा की नाही हा पर्याय इथे निवडता येईल.
ही माहिती होती गुगल ड्राइव्ह वर तयार करायच्या प्रेझेंटेशनची. पण आपल्याकडे आधीपासूनच असलेले एखादे प्रेझेंटेशन गुगल ड्राइव्ह वर अपलोड कसे करावे आणि अपलोड केल्यावर ते इतरांना शेअर कसे करावे याबद्दलची माहिती इथे (http://www.netbhet.com/2013/09/how-to-use-google-drive.html) मिळेल.
श्रेया देवेंद्र रत्नपारखी
0 comments:
Post a Comment