लाखो लोक रोज Facebook वर येत जात असतात. आपण जर उद्योजक किंवा व्यावसायिक असू तर आपला व्यवसाय या लोकांमधून नेमक्या आपल्याला मिळू शकणा-या आपल्या भावी ग्राहकांपर्यंत पोचवण्याकरता आपल्याला मदत करेल ’Facebook Business Page’. आपल्या Business / Brand चे Facebook Page आपल्याला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोचण्याकरता, त्यांच्या संपर्कात रहाण्याकरता आणि पर्यायी आपला उद्योगधंदा वाढवायला मदतच करते.
उपयोग
वेगवेगळे उद्योग आपापल्या Brand चे, संस्थांचे, उद्योगाचे facebook page तयार करून त्यावर नियमित माहिती देत रहातात आणि त्यामुळे सतत आपल्या ग्राहकांशी संपर्कात राहाण्याच्या प्रयत्नात असतात. या pages वर वेगवेगळी apps , events, polls इ. नियमित देत राहील्यास आपले ग्राहक वाढायला मोठी मदत होते. जे लोक आपल्या पेज ला Like करतात, त्यांना आणि त्यांच्या मित्रांना आपले facebook page त्यांच्या news feed मध्ये दिसते. त्यामुळे आपण page वर टाकत असलेली सगळी माहिती त्यांच्यापर्यंत विनासायास पोचते.
वैयक्तिक Timeline आणि facebook page
आपले स्वत:चे वैयक्तिक खाते वापरून देखील facebook page तयार करता येते. आपली स्वत:ची वैयक्तिक Timeline वेगळी असून त्याव्यतिरिक्त अनेक facebook pages सुद्धा तयार करता येतात. आपली personal Timeline ही फक्त व्यक्तींकरता असते आणि ती कोणत्याही उद्योगाकरता वापरता येत नाही. ती आपल्या नावानेच दिसते. आपण ज्या व्यक्तिंना ओळखत देखील नाही अश्या व्यक्तींच्या public posts वाचायच्या असतील तर आपण त्यांना follow करू शकतो.
Facebook Pages हे मात्र एक किंवा एका पेक्षा अधिक व्यक्तींतर्फे सांभाळले जाते. ह्या व्यक्तींना admins म्हणतात. त्यांची प्रत्येकाची स्वत:ची स्वतंत्र Timeline असतेच. त्याखेरीज हे admins एकत्रित पणे एखादे facebook page manage करतात. प्रत्येक admin आपल्या स्वत:च्या facebook account चे log in वापरूनच ह्या page ची हाताळणी सांभाळू शकतो. आपल्या page ला जे like करतात, त्यांच्या news feed मध्ये आपल्या page वरच्या ताज्या बातम्या दिसतात.
Facebook group आणि facebook page
Facebook group काही ठराविक लोकांकरता केलेला असतो, ग्रुप open, closed, secret असा तीन प्रकारचा असू शकतो. Open असो वा closed त्या त्या ग्रुपमध्ये असणा-या सदस्यांनाच group posts वाचता येतात. पण page कोणीही येऊन वाचू शकतो.
- Group मध्ये प्रवेश मिळण्याकरता group admin ची संमती लागते. तर page ला like केल्यावर पेजच्या ताज्या बातम्या आपल्या news feed मध्ये यायला लागतात.
- Group मधील सदस्यांची संख्या एका ठराविक संख्येच्या वर गेली की ग्रुपला मिळणा-या काही सोयी मिळेनाशा होतात. Page मात्र कितीही जणांनी like केले तरी मिळणा-या सोई कमी होत नाहीत. उलट जितके जास्त likes तितका त्या page चा भाव वधारतो.
- Group मध्ये एखाद्या सदस्याने पोस्ट टाकली की उरलेल्या सगळ्या सदस्यांना तसा निरोप मिळतो. Group चे सदस्य group chat मध्ये भाग घेऊ शकतात. आल्बम मध्ये photos upload करू शकतात, group मधल्या आपल्या मित्रांना Event करता invite करू शकतात.
फक्त Page admins पेज च्या नावाने पोस्ट शेअर करू शकतात. ज्यांनी त्या पेज ला like केले आहे, त्यांच्या आणि त्यांच्या मित्रमंडळींच्या new feeds मध्ये या पोस्ट्स दिसतात. Page admins आपल्या page करता काही खास apps पण तयार करू शकतात त्याचबरोबर page कसे चालते आहे याच्या प्रगतीचा आढावा देखील घेऊन शकतात.
फेसबुक बिझिनेस पेज कसे तयार कराल?
फेसबुक बिझिनेस पेज तयार करण्याकरता आपल्या फेसबुक खात्यात लॉगिन करून https://www.facebook.com/pages/create/ वर जा.
आकृती १ मध्ये १ ते ६ आकड्यांत असलेल्या कोणत्याही एका category ची निवड करून ७ या आकड्याच्या drop box मधील उप विषय(sub category) निवडावी.
८ आकड्याच्या जागी आपल्या पेज चे हवे असलेले नाव द्यावे, ९ आकड्याच्या जागी असलेला check box वर P ची खूण करून facebook page terms ला संमती देऊन पुढे १० आकड्याच्या जागी असलेल्या get started बटणावर क्लिक करून आपले पेज तयार करावे.
एकदा आपल्या बिझिनेसचे पेज तयार झाल्यावर; जर आपला एखादा विशेष ब्रॅंड असेल तर त्याचे विशिष्ट username तयार करावे, ज्यामुळे आपले पेज शोधणे लोकांना सोयीने जाते. उदा. समजा माझा कपडे, एक्सेसरीज इ. बनवून निर्यात करण्याचा व्यवसाय आहे. या वस्तू जर Shreya या नावाने ओळखल्या जात असतील पण माझ्या व्यवसायाचे नाव Shreya Cloths and Accessories Mfg & Exports असेल तर फेसबुक पेज करता Shreya हे username घेणेच सोयीस्कर ठरेल. कारण ग्राहक आधीपासूनच माझ्या वस्तूंना Shreya ब्रॅड ने ओळखत आहेत, सहाजिकच ते फेसबुकवर त्याच नावाचा शोध घेणार.
Username ठरवण्याकरता https://www.facebook.com/username वर जा. आकृती २ मध्ये page name समोरच्या drop box मधून ज्या पेज चे username ठरवायचे (एकापेक्षा अधिक पेजेस असल्यास) त्याचे नाव निवडल्यावर त्याच्या समोर लगेच रिकामा चौकोन येईल, त्यात हवे ते username लिहून check availability वर जाऊन आपल्याला हवे ते username मिळते आहे की नाही हे तपासून घ्यावे आणि त्याप्रमाणे username* निश्चित करावे.
*हे username फक्त आणि फक्त एकदाच बदलता येते. एकापेक्षा जास्त वेळा username बदलता येत नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. त्याचप्रमाणे एकाच पेज ला एकापेक्षा जास्त username देखील घेता येत नाहीत.
1. आपल्या व्यवसायाची category आणि page name निवडावे.
2. Profile pic म्हणून शक्यतो आपला लोगो निवडावा.
3. व्यवसायाची थोडक्यात माहिती द्यावी.
4. आपल्या व्यवसायाची इतरत्र जाहिरात करताना facebook page चा नामोनिर्देश करणे सोपे जावे म्हणून पेज ला सुटसुटीत brand name द्यावे.
5. पेजवर आल्यावर लोकांना सर्वप्रथम ही जागा दृष्टीस पडणार असल्याने इथे आपल्या व्यवसायाशी संबंधित फोटॊज cover page म्हणून लावावे
.
पेजवरच्या activities track करण्याकरता, पेजला आलेल्या पर्सनल मेसेजेसना उत्तर देण्याकरता, एकूण कितीजणांपर्यंत पेज पोचले आहे इ. आढावा घेण्याकरता तसेच पेजच्या कंटेंट मध्ये काही बदल करण्याकरता admin panel चा वापर करावा. Admin panel मधील Edit Page button वर जाऊन update info हा पर्याय निवडल्यावर आपल्या व्यवसायासंबंधीची माहिती तिथे देता येते.
बिझिनेस पेज हे आपल्या timeline सारखेच पेज असते, त्यावर आपण पेज चे statua update, फोटोज, व्हिडियोज , एखादा इव्हेंट, व्यवसायातला एखादा महत्वाचा टप्पा असे शेअर करू शकतो.
१०० ते २५० अक्षरांच्या छोटेखानी पोस्ट्सना इतर पोस्ट्सपेक्षा ६०% जास्त likes, comments, आणि share मिळतात. फोटो आल्बम्स, फोटो, व्हिडियो यांनाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. आपल्या पेजवरचे कोणते updates आपल्या ग्राहकांकडून जास्तीत जास्त पाहिले जात आहेत याचा अंदाज आपल्याला page insights च्या माध्यमातून घेता येतो.
आपल्या व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा या हेतूने आपण आपल्या प्रेंड लिस्ट मधील मित्र-मैत्रिणी, कुटुंबिय, ग्राहक, आपले कर्मचारी यांना आपण Admin panel मधील Build Audience मार्फत invite करू शकतो. जे आप्त आपल्या फेसबुक फ्रेंड लिस्ट मध्ये नाहीत त्यंना invite email contacts करून ही बोलावू शकतो. आपले बिझिनेस पेज जास्तीत जास्त लोकांपर्यत पोचावे म्हणून आपल्या दुकानाच्या पाटीवर, बिलावर, व्हिझीटींग कार्डवर अश्या ठिकाणी त्याचा उल्लेख करू शकतो.
श्रेया देवेंद्र रत्नपारखी
0 comments:
Post a Comment