300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Friday, 11 October 2013

Tagged under: , , ,

जुन्या Android फोनला द्या नवा चेहरा


तुमच्या जुन्या Android फोनला द्या नवा चेहरा

गुगलप्रणीत Android हि ऑपरेटिंग सिस्टम बाजारपेठेत आली आणी इतर गुगल उत्पादनांप्रमाणे Android च्या माध्यमातून बाजारपेठेवर अधिराज्य गाजवण्याचा जणू गुगलने चंगच बांधलाय.

मनीकंट्रोल या वेबसाईटच्या अभ्यासानुसार असे आढळले आहे कि गुगलप्रणीत Android हि ऑपरेटिंग सिस्टम २०१५ पर्यंत भारतातील ८०% बाजारपेठ काबीज करेल, जागतिक स्तरावरील आकडेवारी देखील फारशी वेगळी नाही, म्हणूनच जगभरातील प्रोग्रामर्सनी कंबर कसून कामाला सुरुवात केलीय.

सध्या Android ची जेली-बिन (४.१) आवृत्ती सगळ्यात अद्ययावत आहे पण नुकतेच गुगलने पुढील किट-कॅट आवृत्तीची घोषणा केलीय. कोणतीही आवृत्ती आणताना Android मधील डिफॉल्ट आयकॉन्स आणी पडद्यामागच्या गोष्टी अद्ययावत केल्या जातात पण अशा प्रकारे व्हर्जन अपडेट न करता आणी Android सेटींग्स मध्ये थीम्स बदलण्याची सोय नसली तरीही तुम्ही तुमच्या जुन्या Android फोनला नवा चेहरा देऊ शकता आणी त्याचबरोबर काही नवीन सुविधा देखील वापरू शकता आणी तेही चकटफू.

गुगल प्ले स्टोअर्समध्ये उपलब्ध असलेल्या विविध लॉन्चर्स (Launchers) मुळे आपण हे करू शकतो. चला वेगवेगळ्या Launchers ची माहिती घेऊयात.


गो लॉन्चर ई.एक्स (Go Launcher EX)


सध्या प्ले स्टोअर्समध्ये उपलब्ध सर्व लॉन्चर्समध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्यांपैकी एक असलेल्या गो लॉन्चरमध्ये एकापेक्षा-एक सोयी देण्यात आल्या आहेत, सर्व विखुरलेले Apps एकत्र करून विभागणी करणे, Gestures चा वापर करून लगेच एखादे App किंवा शॉर्टकट सुरु करणे, वेगवेगळ्या थीम्स ठेवणे हि गो लॉन्चरची प्रमुख वैशिष्ट्य आहेत. Gestures म्हणजे एखाद्या App किंवा शॉर्टकटसाठी होमस्क्रीनवर एखादे अक्षर लिहिले कि App किंवा शॉर्टकट सुरु होतो (उदा – किबोर्डशिवाय बोटाने स्क्रीनवर C लिहिले कि कॅमरा सुरु होतो) तसेच अॅनिमेशन यामधील सर्वोत्तम सुविधा आहे.


गो लॉन्चर ई.एक्स (Go Launcher EX)



लॉन्चर ८ (Launcher 8)


तुम्ही विंडोजच्या नवीन आवृत्तीचे म्हणजेच विंडोज ८ चे चाहते असाल तर लॉन्चर ८ नक्की वापरून पहा. वेगवेगळ्या आकारातील ठेवणीतले रंगीबेरंगी चौकोन तुम्हाला दरवेळी विंडोज ८ ची आठवण करून देतील.
तुम्ही जर नोकिया ल्युमिया पहिला असेल तर तुम्हाला याची कल्पना येईल. आकर्षक आयकॉन्स, कमी पण तरीही उपयुक्त अशा सुविधा, आकर्षक थीम्स आणी होमस्क्रीनवर उठुन दिसणारा एक वेगळाच थाट हि  लॉन्चर ८ ची प्रमुख वैशिष्ट्य आहेत. विंडोज ८ हे नाव मायक्रोसॉफ्टचे ट्रेडमार्क असल्यामुळे या लॉन्चरला लॉन्चर ८ हे नाव दिले गेले अन्यथा मायक्रोसॉफ्टच्या गुडविलमुळे लॉन्चर ८ नक्कीच सर्वाधिक लोकप्रिय लॉन्चर असते.

लॉन्चर ८ (Launcher 8)


होलो लॉन्चर एच.डी (Holo Launcher HD)


तुमची Android आवृत्ती जर आयस्क्रीम सॅडविचच्या आधीची म्हणजेच हि असेल आणी तुम्ही फक्त फोन नवीन आवृतींसाठी घेत  असाल तर थांबा, कारण होलो लॉन्चर तुम्हाला आयस्क्रीम सॅडविच आणी जेली बिन या आवृतींचे दर्शन घडवून आणेल आणी तसेही थोडा संयम तुम्हाला पुढील अद्ययावत किट-कॅट आवृत्ती मिळवून देऊ शकतो.
होलो लॉन्चर इतर लॉन्चर्सच्या तुलनेत अधिक वेगवान आहे आणी यात तुम्ही फोल्डर्सचे आयकॉन्स आणी लेबल्स देखील कस्टमाईज करू शकता. यामध्ये गो लॉन्चरप्रमाणेच Gestures च्या सुविधेबरोबरच इतरही उपयुक्त सुविधा देण्यात आल्या आहेत.

होलो लॉन्चर एच.डी (Holo Launcher HD)


बझ लॉन्चर (Buzz Launcher) 


बझ लॉन्चर हे कामाच्या दृष्टीने पहिले तर साधारण लॉन्चर आहे पण जर कलात्मक दृष्टिकोनातून पहिले तर थीम्सचे भांडार आहे असेच म्हटले पाहिजे. या लॉन्चरसाठी इंटरनेटवर ८०,००० पेक्षा जास्त थीम्स उपलब्ध आहेत आणी तुम्ही जर एखादी थीम तयार केलीत तर एका क्लिक मध्ये तुम्ही या भांडारात उपलब्ध करून देऊ शकता.

बझ लॉन्चर (Buzz Launcher)


९१ लॉन्चर (91 Launcher


याच्या नावाप्रमाणेच यात वेगवेगळ्या प्रकारच्या ९१ थीम्स देण्यात आल्या आहेत. थीम्सबरोबरच यात वॉलपेपर, ट्रांझिशनस (एका स्क्रीनवरून दुसऱ्या स्क्रीनवर जाणाना दिसणारे अॅनिमेशन) डेक्सटॉप क्लीनर प्रमाणे गार्बेज क्लीनर, आणी फ्लॅशलाईट (फोनमध्ये फ्लॅश आवश्यक) सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. थोडक्यात ९१ लॉन्चर म्हणजे उपयुक्ततेपेक्षाही जास्त कलात्मक पद्धतीने Android वापरण्यासाठी तयार केलेले लॉन्चर आहे.

९१ लॉन्चर (91 Launcher)

तुम्हाला हे लॉन्चर्स कसे वाटले आणी तुम्हाला अधिक लॉन्चर्सबद्दल माहिती असेल तर जरूर सांगा आम्ही त्याबद्दलही माहिती देण्याचा प्रयत्न करू.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment