प्रियेला देवतेच्या पातळीवर नेऊन ठेवलं रमेशभाईंनी. प्रत्येक अभंग म्हणजे अगदी मोत्याचा दाणा. वाजवून घ्यावं असं खणखणीत नाणं. एक संगीतच. म्हणजे या अभंगांचा एक अभंगवाणी गायनाचा कार्यक्रम व्हावा आणि सगळे श्रोते प्रेमरंगी बुडून जावेत.
वाहून जावेत पुरात प्रेमाच्या. या अभंगांत काय नाही ? प्रेम, भक्ती तर आहेच , पण विनोदाची खुसखुशीत पेरणीही आहे. चिमटे आहेत. गुदगुल्ल्या आहेत. आणि आर्ट
वर्ल्ड डिझाईननी केलेली सर्वांगसुंदर परफ़ेक्ट मांडणी. एखाद्या सुंदर सिनेमासारखं सगळं छानपैकी जुळून आलंय.

0 comments:
Post a Comment