300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Friday, 29 October 2010

Tagged under: , , , ,

मीरा

प्राजक्त देशमुख यांनी अनुवादित केलेल्या मीराबाईच्या प्रेम आणि भक्तीरसपूर्ण दोह्यांचं ई बुक आपणासमोर सादर करीत आहोत. इंटरनेटच्या या युगातही मीराबाईच्या दोह्यांचं सौंदर्य मनाला भुरळ पाडतं. कारण प्रेम आणि भक्ती या कालातीत भावना आहेत. प्रेम आणि भक्तीचं मीरेइतकं सुंदर उदाहरण जगात नसेल.

मीराबाईची भक्ती जशी एकमेवाद्वितीय आणि त्या भक्तीचं तितक्याच सुंदर शब्दांत अनुवाद सुचण्याचं हे हे ई बुक एक तितकंच युनिक उदाहरण असेल. ग्रेव्ह यार्डलिटरेचरच्या रुपाने contemporary poetry चं अत्यंत वेगवान आणि तीव्र (intense)रूप सादर करणारे प्राजक्त देशमुख मीरेसारख्या नाजुक कवयित्रीला तितक्याच कोमल शब्दांतून सामोरे जाताना पाहून आश्चर्य वाटेल. या पुस्तकाची , त्यातल्या प्रत्येक कवितेची किंबहुना प्रत्येक शब्दाची नजाकत थक्क करून सोडते आणि एका वेगळ्याच विश्वात नेऊन सोडते. मीरेच्या गिरिधर गोपालाच्या प्रेममय भक्तीमार्गावर जाण्याचा रस्ताच जणू या पुस्तकावाटे प्राजक्त देशमुखांनी आपणासमोर शब्दांतून उलगडून दाखवला आहे.


0 comments:

Post a Comment