महाराष्ट्राच्या किल्ल्यांपासून ते ग्रीसच्या पुराणांपर्यंत वास्तव्य असणार्या गणेशाला ना काळाची क्षिती ना स्थळाची मिती. भक्तीमार्गी संतांना जशी त्याने भुरळ घातली तशी कर्मयोगी टिळकांनाही. पंचमहाभूतांच्या अक्षय्य निरंतरतेचं सगुण स्वरूप अशा या गणेशाची महती सांगावी तरी किती. वेदकाळातील गणपती पासून ते
आजच्या अशुद्ध पर्यावरणाच्या काळातील संकटमोचन गणेश पूजनापर्यंतचा हा प्रवास मांडला आहे एक मराठी विदुषी सौ वैशाली कुलकर्णी आणि एक मराठी चित्रकर्ती कु. अमृता ढगे यांनी.
या एका पुस्तकात नुसतं ट्रेलरच आहे समजा. या गजाननावर पुस्तकांची एक महामालिकाच बनू शकेल. आणि आज वेलीच्या स्वरूपात दिसणारं हे ई पुस्तक एक महाग्रंथही बनू शकेल.

0 comments:
Post a Comment