इंटरनेटवर मराठी टायपिंग शिकायला लागतात पाच मिनिटं. पंधरा मिनिटांत तुम्ही मराठी अगदी सहजपणे टाईप करू शकता.
पण तरीही असंख्य मराठी लोकांना आपल्या सख्ख्या भावाला सुद्धा मेल पाठवताना इंग्लीशमध्येच पाठवावी लागते. का ? लाज वाटते ? नाही. कारण त्यांना या
softwares चा पत्ताच नसतो. जगात आता लाखों मराठी लोक कॉंप्युटर वापरतात. पण त्यांना त्यावर मराठी लिहीता येत नाही. लाज वाटते असं नाही. त्यांना ठाऊकच नसतं कसं लिहायचं ते. किंवा ते इतकं सोप्पं आहे याचा पत्ता नसतो.
अशा लोकांसाठी ही ई शाळा. पहिला धडा मराठी गुगलचा दिला आहे. अशाच आणखी अनेक प्रकारांची माहिती घेऊन ही ई शाळा येत आहे. एकदा फ़क्त प्रयत्न करून बघा. मग म्हणाल की “हात्तेच्या ! इतकं सोप्पंय होय ?”

0 comments:
Post a Comment