मराठी प्रेझेंटेशन्स !
मला प्रेझेंटेशन्स बनविणे खुप आवडते. पॉवरपॉईंट किंवा गुगल डॉक्स मध्ये प्रेझेंटेशन बनविणे मला अतिशय आवडते. मोजक्या शब्दात, कमी वेळेत विषयाची पुर्ण आणि अचूक मांडणी करणे ही एक कला आहे. उत्कॄष्ट प्रेझेंटेशन बनविण्यासाठी ही कला आत्मसात करणे आवश्यक असते. मी या कलेचा सराव करतो आहे आणि माझे प्रेझेंटेशन्स पाहता अजून बरीच मजल मारायची आहे असे दिसते !
सुरुवातीला एक छंद म्हणून मी प्रेझेंटेशन बनवित असे मात्र MBA च्या अभ्यासात वेगवेगळया विषयांवरील प्रेझेंटेशन्स अभ्यासायचा आणि बनविण्याचा व्यासंग जडला. Slideshare.com या संकेतस्थळाने तर मला अक्षरक्षः वेड लावले. तासनतास मी या साईटवर विविध प्रेझेंटेशन्स पाहण्यासाठी घालविली आहेत. मात्र slideshare.com पाहताना माझ्या असे लक्षात आले की मराठी भाषेतील प्रेझेंटेशन्स खुप कमी आहेत. आणि म्हणूनच मी मराठीतून विविध विषयांवरील प्रेझेंटेशन्स बनवायचा प्रयत्न सुरु केला. मी बनविलेली मराठी आणि इंग्लिश प्रेझेंटेशन्स सध्या http://marathipresentations.netbhet.com या संकेतस्थळावर मी एकत्र केली आहेत.
presentations बनविण्याचा माझा आनंद वाचकांबरोबर वाटून घेता यावा या उद्देशाने ही एक छोटीशी पोस्ट. Presentation आवडल्यास कमेंट्स आणि सूचना जरुर द्या आणि फेसबुक/ट्वीटर वर जरुर शेअर करा.
हे स्लाईड शो पाहून तुम्हालाही presentations बनविण्याचा आणि छंद जडला तर मला खुप आनंद होईल. माझ्यासोबत आपल्यालाही मराठी प्रेझेंटेशन्स बनविण्याची इच्छा असेल तर मला जरुर लिहा (salil@netbhet.com) .
(लवकरच http://marathipresentations.netbhet.com या साईटवरील प्रेझेंटेशन्स डाउनलोड करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येईल )
0 comments:
Post a Comment