मायक्रोसोफ्ट ऑफीसमध्ये युनिकोड फाँट्स मधील मराठी दिसत नाही म्हणून बरेच जणांनी मला शंका विचारली होती. त्यांचे म्हणणे होते की ते ग म भ न, क्विलपॅड किंवा बरह वर लिहीलेले त्यांनी जेव्हा कॉपी मायक्रोसोफ्ट वर्डमध्ये किंवा ओपनऑफिसमध्ये पेस्ट केले तर चौकोन चौकोन दिसतात कारण त्या फॉण्ट्स Unicode म्हणजेच UTF8 किंवा Open type या प्रकारातल्या असतात. मग मी सुद्धा माझ्या संगणकावर हे आजमावून पाहिले आणि मलासुद्धा तसाच अनुभव आला. कदाचित तुम्हालाही तो आला असेल. काहीसे खाली दाखवल्याप्रमाणेच चित्र तुम्ही कधीतरी नक्कीच पाहिले असेल.
या समस्येवर तोडगा अतिशय साधा, सरळ आणि सोपा आहे. आधी आपण फाँट या प्रकाराबद्दल थोडी तांत्रिक माहिती घेऊया. मुख्यत्वे फॉण्ट्स या ३ प्रकारात मोडतात.
एक म्हणजे Open Type, True Tupe आणि तिसरी All res. Open type या प्रकारतल्या फॉण्ट्स तुम्हाला जगातल्या कोणत्याही संगणकावर गेलात तरी तशाच दिसतील ( कारण प्रत्येक Operating system मध्ये त्या मुळतः म्हणजेच by default installed असतात) आणि म्हणूनच आपल्याला Arial, Times of Roman, Monotype या आणि यांसारख्या अनेक फॉण्ट्स मायक्रोसोफ्ट ऑफीसमध्ये दिसतात. खरं तर त्या फॉण्ट्स या आपल्या Operating system च्याच असतात( by default). या ऊलट Shivaji, Kruti, Simplified arabic या आणि यांसारख्या इतर काही फॉण्ट्स दिसतील त्या आपल्याला बाहेरून Download करुन Install कराव्या लागतात आणि महत्त्वाची बाब म्हणजे सम्जा तुम्ही जर एखादी फाईल Shivaji फॉण्ट वापरून तुमच्या काँप्युटरवर बनवली आणि दुसर्या एखाद्या काँप्युटरवर (ज्यात shivaji फॉण्ट नाही अशा कॉप्युटरवर) उघडली तर काही चिन्ह दिसतील तुम्हाला.
आता या फॉण्टस असतात कूठे ते बघुया. Start ----------> Control Panel (कंट्रोल पेनेलला आल्यावर तुम्हाला Switch to classic view हा डाव्या बाजूला उपलब्ध असलेला पर्याय निवडावा लागेल) ----------> Fonts नावाचे फोल्डर उघडा त्यात तुम्हाला फॉण्ट्स दिसतील.
यातील O चिन्ह असलेल्या फाईल्स या Open type fonts आहेत (लिहिताना जरी तुम्हाला तिकडे True type असे दिसले तरी त्या open type च्याच फॉण्ट्स आहेत, तुम्ही जर त्या फाईल उघडून बघीतल्या तर तुम्हाला Open type असे स्पष्ट लिहीलेले दिसेल), T चिन्ह असलेल्या फाईल्स या True type fonts आहेत आणि उरलेल्या A चिन्ह असलेल्या फाईल्स या All Res या आहेत.
असो तर हे झाले फॉण्टपुराण. आता आपण आपल्या मुळ मुद्द्यावर येऊया. Open type फॉण्ट या सर्व Operating system मध्ये मूळतःच installed असतात पण दुखा:ची गोष्ट अशी की आशिया खंडातील तसेच इंडोनेशियातील भाषा XP या ऑपरेटींग सिस्टम by defualt इंस्टॉल करत नाही. त्या आपल्याला customize करून Install कराव्या लागतात . आपण या आशिया खंडातील तसेच इंडोनेशियातील भाषा कशा install करायच्या ते क्रमाक्रमाने बघुया.
सर्वांत आधी तुम्हाला Start या बटणावर क्लिक करुन Control Panel मध्ये जावे लागेल.
त्या नंतर Control Panel ची विंडो उघडेल तुमच्यासमोर.
त्या नंतर Control Panel ची विंडो उघडेल तुमच्यासमोर.
त्यातून तुम्हाला Date, Time, Language, and Regional Options हा पर्याय निवडा, तुम्ही पुन्हा नवीन विंडोमध्ये याल
Regional and Language options हा पर्याय निवडा. तुमच्या समोर एक विंडो उघडेल. त्यातून Languages या टॅबवर क्लिक करा. नंतर खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे आधी पहिल्या चेकबॉक्समध्ये टीक करा , लगेचच तुम्हाला दुसरी एक छोटी विंडो दिसेल तिकडे OK या बटणावर क्लिक करा.
अशाच प्रकारे तुम्हाला दुसर्या चेकबॉक्समध्ये सुद्धा बरोबरची खूण करायची आहे बरं का ! मग पुन्हा वर जशी एक विंडो उघडली तशीच दुसरी विंडो उघडेल तिकडे सुद्धा OK या बटणावर क्लिक करा आणि नंतर मुख्य विंडोतील Apply या बटणावर क्लिक करा.
तुमच्या समोर आता एक नविन छोटी विंडो उघडेल त्यात तुम्हाला सांगितले जाईल की तुमच्या संगणकावर इंस्टॉल्ड असलेल्या XP ची CD टाका म्हणून (आता तुम्ही XP चि नक्की कोणती आवृत्ती Install केली आहे त्याच आवृत्तीची CD तुम्हाला CD ROM मध्ये टाकावी लागेल) तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेली XP ची CD संगणकाच्या CD ROM मध्ये टाका आणि OK या बटणावर क्लिक करा.
OK या बटणावर क्लिक केल्यावर, तुम्हाला विविध प्रकारच्या फाईल्स CD तून संगणकामध्ये कॉपी होताना स्पष्टपणे दिसतील.
आपोआपच सगळ्या फाईल्स कॉपी होतील आणि संगणक Restart करायला सांगणारी एक छोटी नविन खिडकी दिसेल तुम्हाला, मग तुम्ही तुमचा PC Restart करा.
आणि आता बिनधास्त होऊन गमभन, बरह किंवा क्विलपॅड वर लिहा आणि तो मजकूर वर्ड काय कुठल्याही Offiec Suite मध्ये कॉपी केलात तरी तो तुम्हाला अगदी ठसठशीत दिसेल.
तुम्ही या मराठी युनिकोड फॉण्ट्सने तयार केलेली कुठलिही Office suite मधील फाईल जर दुसर्या कोणत्याही संगणकावर उघडायला जाल तर त्या संगणकावार आधी अशा प्रकारे मराठी फॉण्ट्स install आहेत की नाही हे पडताळून पहा बरं का....
फॉण्ट डिस्प्लेयींगचा प्रोब्लेम कसा सोडवावा या बाबतची माहिती देणारा हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा, तसेच आपल्या प्रतिक्रिया, सुचना, इत्यादी देखील आमच्यापर्यंत पोहोचू द्या मंडळी....
0 comments:
Post a Comment