300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Thursday, 7 August 2014

Tagged under: , , ,

मायक्रोसॉफ्ट आउटलूक मध्ये ईमेल उशिरा किंवा ठराविक वेळेला कशी पाठवाल (Part 1) ?

मित्रांनो, बऱ्याचदा ईमेल पाठवून झाल्यानंतर "अरेरे, उगाच पाठविली. यात थोडा बदल करता आला असता तर बरे झाले असते" असा विचार आपल्याला नक्की आला असेल. रागाच्या भरात ईमेल पाठविली असेल तर हमखास असा अनुभव येतो. मायक्रोसॉफ्ट आउटलूक मध्ये यावर एक उपाय आहे. आपण पाठविलेली ईमेल त्वरीत न पाठवता काही वेळ आउटबॉक्स मध्ये ठेवता येते. त्यादरम्यान काही बदल करायचा असेल किंवा ईमेल पाठवण्याचे रद्द करायचे असेल तर तसे करता येते.

Microsoft outlook 2007, 2010 आणि 2013 मध्ये असे करण्याची सोय आहे. याला Delayed Delivery असे म्हणतात. Delayed Delivery दोन प्रकारे वापरता येते.
  • एकाच ईमेलला उशिरा पाठविणे
  • सर्व ईमेल्स उशिरा पाठविणे
एकाच ईमेलला उशिरा पाठविण्याची पद्धत - 
    १. नवीन इमेल लिहून झाल्यानंतर OPTIONS मध्ये जाऊन Delay Delivery ला क्लिक करा.








    २. खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे ईमेल कधी पाठवायची त्याची तारीख आणि वेळ निवडा आणि SEND करा. तुम्ही निवडलेल्या वेळेला किंवा त्यानंतर जेव्हापण संगणक इंटरनेटला जोडला जाईल तेव्हा ईमेल आपोआप पाठविली जाईल.


























    आपण अगदी उशिरा पर्यंत काम करतो असे दाखविण्यासाठी बरेच लोक हा उपाय वापरतात. तुम्हीही वापरून पहा. बॉस खुश होईल कदाचित !

    ही झाली एक इमेल उशिराने पाठवण्याची पद्धत ! सर्व इमेल्स उशिराने पाठविण्याची पद्धत आपण पाहुया उद्याच्या लेखात !
     तोपर्यंत राम राम !

    Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
    Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

    0 comments:

    Post a Comment