दिवसेंदिवस माझं गुगलावलंबन वाढत चाललंय. गुगल काकांच्या सर्वोकृष्ट आणि तरीही मोफत सेवांचा पुरेपुर वापर मी करत असतो. गुगल डॉक्स या सेवेसंबंधी थोडीफार माहिती मी यापुर्वीच एका लेखाद्वारे दिली होती तेव्हा जरी मला गुगल डॉक्स माहिती असले तरी ते मी पुर्णपणे वापरत नव्हतो. या गोष्टीला केवळ सहाच महिने झाले असतील परंतु आता मी गुगल डॉक्स मधील स्प्रेडशीट्स, डॉक्य्मेंट्स, प्रेझेंटेशन्स आणि फॉर्म्स इतके वापरतो की या कालावधीत एकही मायक्रोसॉफ्ट एक्सेल, वर्ड फाईल बनविली नाही. आणि बघता बघता मी संगणकावर केलेले सर्व काम कधी गुगल डॉक्स मध्ये सामावले गेले ते मला कळले देखिल नाही.
असो. आजचा आपला विषय गुगल डॉक्सविषयी असला तरी ही प्रस्तावना विषयाला धरुन नाही. मात्र गुगल डॉक्सची ताकद वाचकांना लक्षात यावी म्हणून हे सांगावंसं वाटलं.
आज आपण माहिती घेणार आहोत गुगल डॉक्स मधील Forms या सुविधेची.
ऑनलाईन सर्वे घेण्यासाठी, ब्लॉगच्या वाचकांकडून काही माहिती घेण्यासाठी, मित्रमंडळींमध्ये एखादा कार्यक्रम ठरवुन प्रत्येकाची उपस्थीती आणि कार्यक्रमासंबंधी काही प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी , ब्लॉग किंवा वेबसाईटवर संपर्काचे पान बनविण्यासाठी (Contact us) अशा अनेक गोष्टींसाठी गुगल डॉक्स वापरता येते.
उदाहरणार्थ ब्लॉगकट्टा (http://blogkatta.netbhet.com) या संकेतस्थळावर नोंदणी करणार्या ब्लॉगर्सची माहिती गोळा करण्यासाठी मी बनविलेला हा गुगल फॉर्म पहा.
गुगल डॉक्स मध्ये फॉर्म बनविण्याची पद्धत पाहण्याआधी आपण गुगल फॉर्मचे फायदे काय आहेत ते पाहुया -
१. गुगल डॉक्स मधील फॉर्म्स मध्ये भरलेली सर्व माहिती आपोआप स्प्रेडशीट (एक्सेलसारखे) मध्ये साठविली जाते. त्यामुळे ही माहिती एकत्रीतपणे हाताळणे सोपे जाते.
२. फॉर्म बनविल्यानंतर ब्लॉगपोस्ट मध्ये चिकटवता येतो (Embed) किंवा ईमेल द्वारे सर्वांना पाठविता येतो.
३. गुगल काकांनी उपलब्ध करुन दिलेल्या असंख्य टेम्प्लेट्स मधुन निरनिराळ्या टेम्प्लेट्स निवडून फॉर्म्स सजवता येतात.
४. CSS कोडचे ज्ञान असल्यास आपल्याला हवा तसा फॉर्म बनवता येतो.
५. कोणीही फॉर्म भरल्यानंतर त्याची माहिती (Alert) लगेचच ईमेलद्वारे मिळवता येण्याची सोय आहे.
६. दिलेल्या पर्यायातुन एक पर्याय निवडणे (Multiple choice), दिलेल्या पर्यायातुन एक किंवा अधिक पर्याय निवडणे (Checkbox) , प्रश्नांची सविस्तर उत्तरे देणे (Text) असे उत्तरांचे प्रकार गुगल फॉर्ममध्ये ठरवता येतात.
७. प्रश्नावलीमधून काही प्रश्न अनिवार्य करण्याची सोय देखिल यात आहे.
मी फक्त काही मोजके व उपयुक्त फायदेच येथे दिले आहेत. एकदा तुम्ही गुगल डॉक्सच्या दुनियेत शिरलात तर तुम्हाला खुप नविन गोष्टी कळून येतील.
गुगल डॉक्स मध्ये फॉर्म्स बनवायची पद्धत -
१. http://docs.google.com वर जाउन आपल्या जीमेल आयडीच्या सहाय्याने लॉग-इन करा.
२. आधी Create new आणि नंतर Form वर क्लिक करा. खालीलप्रमाणे फॉर्मचा साचा दिसेल.
३. या फॉर्ममध्ये वरच्या बाजुला असलेल्या बटणांच्या सहाय्याने फॉर्मची डिझाईन (Template) , मजकुर, प्रश्नांचे प्रकार इत्यादी ठरवता येतात. तसेच फॉर्म ईमेल किंवा embed करण्यासंबंधीचे पर्याय निवडता येतात.
गुगल डॉक्स मधील फॉर्म्सचा उपयोग करुन पहा. आणि आपले अभिप्राय येथे देण्यास विसरु नका.
Sunday, 4 April 2010
Tagged under: इंटरनेट (internet), ब्लॉग टीप्स (Blog Tips)
Create forms for blog, online survey forms with Google docs
Subscribe to:
Post Comments (Atom)


0 comments:
Post a Comment