300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Wednesday, 7 April 2010

Tagged under: , ,

"गुगल अ‍ॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन" (लेखमालिका - भाग एक.)


वाचक आणि ब्लॉगर मित्रांनी मला बर्‍याच वेळा Google adsense बद्दल माहिती विचारली होती. Adsense बद्दल मी लवकरच विस्तृत लेख लिहेन असे मी वाचकांना सांगत होतो, मात्र इतरांना सांगावे इतके गुगल अ‍ॅडसेन्सचे ज्ञान मला नाही हे मला माहित असल्याने या विषयावर लिहिण्याचे मी टाळतच होतो. पण गेल्याच आठवड्यात नेटभेट.कॉमने  १०० डॉलर्सचा टप्पा दुसर्‍यांदा पार केला आणि आता मराठी वाचकांना Google Adsense  बद्दल माहिती आणि युक्त्या मी देऊ शकतो असा विश्वास वाटु लागल्याने मी या विषयावर लेख लिहिण्याचे ठरविले.

Google Adsense  हा विषय आणि गेल्या एक-दिड वर्षात मी अ‍ॅडसेन्स बद्दल जितका अभ्यास केला तो सर्व एका लेखामध्ये सामावणे निव्वळ अशक्य आहे. आणि म्हणूनच Google Adsense  बद्दलची एक लेखमालिकाच मी नेटभेटच्या वाचकांकरीता देणार आहे. वाचकांना आणि ब्लॉगींग कडे एक छंद म्हणून न पाहता ऑनलाईन पैसे कमावण्याचा एक मार्ग या दृष्टीने पाहणार्‍या सर्व ब्लॉगर्सना ही माहिती उपयुक्त ठरेल  तसेच या नव्या लेखमालिकेचे माझ्या ब्लॉगर मित्रांकडून स्वागत होइल अशी मी आशा करतो.


या लेखमालिकेची सुरुवात करण्याआधी मी अ‍ॅडसेन्सबद्दल काही गोष्टी येथे नमूद करु इच्छीतो 

१. Google Adsense  हा सध्या इंटरनेटवर (Online) पैसे कमावण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र अ‍ॅडसेन्सद्वारे लक्षाधीश होण्याची स्वप्ने पाहु नका. Google Adsense  द्वारे मिळणारे उत्पन्न हे पुरक उत्पन्न या प्रकारात मोडणारे आहे हे लक्षात ठेवा (आणि नोकरी सोडून पुर्णवेळ ब्लॉगींग करण्याचा विचार सध्यातरी सोडून द्या !)

२. अ‍ॅडसेन्सद्वारे पैसे मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे (Traffic) ब्लॉगची वाचकसंख्या. जेवढी जास्त वाचकसंख्या तेवढे जाहिरातींद्वारा मिळणारे पैसे अधिक. पण वेब ट्रॅफिक येण्यासाठी आणि ब्लॉग/वेबसाईटला जास्तीत जास्त Visits मिळण्यासाठी चांगले व सातत्यपुर्ण लेखन करणे आवश्यक आहे. आणि चांगले, अभ्यासपुर्ण आणि उपयोगी लेखन करून पैसे कमावण्यासाठी कमालीचा संयम असणे आवश्यक आहे.

३. Google Adsense  सध्या जगभरातील ३२ भाषांमधील संकेतस्थळांना अ‍ॅडसेन्ससाठी मंजुरी देतात. दुर्दैवाने या यादीत "मराठी" भाषेचा समावेश नाही आहे. (कोणत्याच भारतीय भाषेचा यात समावेश नाही आहे.) त्यामुळे मराठी भाषेतील वेबसाईट्स आणि ब्लॉग्जना Google Adsense  च्या जाहिराती मिळत नाहीत.
(वाचकहो हे वाचुन निराश होऊ नका. ब्लॉग मराठी भाषेत असला तरी Google Adsense  जाहिराती दाखवता येतात आणि त्यापासून पैसे देखिल कमावता येतात हे नेटभेट.कॉमने दाखवून दिले आहेच ! या लेखमालिकेच्या शेवटापर्यंत, हे वाचणार्‍या सर्व मराठी ब्लॉगर्सचे अ‍ॅडसेन्सद्वारे उत्पन्न सुरु झालेले असेल याची मी खात्री देतो. अर्थात उत्पन्न किती असेल ते तुमच्या ब्लॉग ट्रॅफीकवर अवलंबुन आहे.)

४. अ‍ॅडसेन्स आणि SEO हे दोनही वेगवेगळे आणि अथांग विषय आहेत. मात्र हे दोनही विषय एकमेकाला पूरक असल्याने त्यांची सखोल माहिती करुन घेणे खुपच चांगले. या लेखमालिकेमध्ये SEO बद्दल दोन स्वतंत्र प्रकरणे असणार आहेत.

५. अ‍ॅडसेन्स कसे काम करते किंवा Google Adsense  पासून मिळणारे उत्पन्न कसे ठरवले जाते याबद्दल खुप कमी माहिती गुगलने उपलब्ध करून दिली आहे. जगभरच्या वेब-गुरूंनी याच गोष्टीचा फायदा उचलुन Adsense व SEO बद्दल बरेच काही लिहिलं आहे. मात्र याची सत्यासत्यता स्वतः पडताळून पाहणे गरजेचे आहे.

६. मी स्वतःदेखिल या लेखमालिकेत फक्त स्वतःच्या अनुभवावरून मिळविलेली माहिती येथे देणार आहे. या लेखांमध्ये मी मांडलेले तर्क अगदी १००% खरी आहेत असा दावा मी करणार नाही. परंतु ती सर्व मराठी ब्लॉगर मित्रांना उपयुक्त ठरतील हे मी निश्चीतपणे सांगु शकतो.

७. Google Adsense  ची शास्त्रशुद्ध माहिती देण्यापेक्षा गुगल अ‍ॅडसेन्स मराठी ब्लॉग्जकरीता कसे वापरावे? या गोष्टीवर मी या लेखमालिकेत भर देणार आहे. या संबंधी मी केलेले प्रयोग आणि वापरलेल्या युक्त्या आपण येथे पाहणार आहोत.

मित्रहो, हा फक्त प्रास्ताविकाचा लेखच इतका लांबला यावरुन Google Adsense  चा आवाका आपल्या लक्षात येईल. मी माझ्या ब्लॉगर मित्रांना आणि वाचकांना आवाहन करु इच्छीतो की या लेखमालिकेपासून आपल्या काही अपेक्षा असतील, काही अडचणी असतील किंवा मी मांडलेली माहिती कळायला खुप अवघड असली तर लेखाच्या कमेंट्समध्ये किंवा यापुढील लेखांच्या कमेंट्समध्ये  मला जरुर लिहा.

हा महत्त्वाचा भाग मराठी ब्लॉगींग व्यापक स्वरुपात वाढण्यास मदत करु शकतो आणि म्हणूनच हा प्रास्ताविकाचा लेखप्रपंच !

(या लेखमालिकेतील पुढील लेख लवकरच येत आहे................So....Stay Tuned !)

Image Credit


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment