300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Friday, 2 April 2010

Tagged under: , ,

मराठी डोमेन नाव बनवायचंय ?


मित्रहो, यापुर्वी आपण co.cc या चकटफु वेबसाईटच्या सहाय्याने ब्लॉगसाठी मोफत डोमेन नाव आणि स्वतःसाठी पर्सनलाईज्ड ईमेल पत्ता  कसा बनवायचा हे पाहिले. हे लेख आणि Co.cc ही सेवा तुम्हाला आवडली असेल याची मला खात्री आहे.

Co.cc वरुन जेवढे काही मोफत मिळवणे शक्य आहे ते मिळविले आहे असे समजून मी Co.cc वर लॉग-इन करण्याचे बंद करणारच होतो इतक्यात मला या वेबसाईटच्या आणखी एका सुविधेची  माहिती झाली. ती सुविधा म्हणजे मराठीत , हो हो चक्क मराठीत डोमेन नाव बनविण्याची सुविधा.


चला तर मग बनवुया आपल्या ब्लॉगसाठी किंवा संकेतस्थळासाठी एक मराठमोळे डोमेन नाव.

सर्वात आधी www.co.cc ला भेट देऊन लॉग-इन करा.

"Getting a new domain" या बटणावर क्लिक करा.

खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे तुम्हाला हवे असलेले मराठी डोमेन नाव लिहा (डोमेन नाव युनिकोड मध्ये लिहावे Baraha/ gamabhana वापरुन तसे लिहिता येईल ).


डोमेन नाव उपलब्ध आहे का ते पहा आणि उपलब्ध आसल्यास नोंदवा.

नाव नोंदवताना मराठी सोबतच xn या अक्षरांनी सुरु होणारे आणखीन एक डोमेन नाव दिसेल. या नावाला पनिकोड (Punnycode) असे म्हणतात. डोमेन नाव ओळखणार्‍या प्रणालीला आंतरराष्ट्रीय भाषांमधील डोमेन नाव ओळखता यावे यासाठी a-z, 0-9 या अक्षरांचा समावेश असलेला एक कोड दिला जातो यालाच पनिकोड म्हणतात.


अभिनंदन ! आता तुमचे मराठी डोमेन नाव तयार झाले आहे.

डोमेन नाव ब्लॉगशी जोडण्यासाठी दोन पद्धती वापरता येतात.

पहिली व सोपी पद्धत म्हणजे URL Forwarding - (अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा)
दुसरी व जरा कठीण पद्धत म्हणजे CNAME Settings - (अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा)


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment