यासाठी तुमचे गुगल किंवा युट्युब खाते हवे हे महत्त्वाचे !
करारानुसार गुगल कडे २ वर्षापर्यंत IPL चे सगळे exclusive ऑनलाईन अधिकार असतील. IPL आणि गुगल हे संयुक्तरित्या आयोजकांकडून मिळणार्या रकमेचे आणि YouTube.com/IPL व IPLT20.com या दोन संकेतस्थळांवरील वरील जाहिरातींचे भागीदार असतील.
संपूर्णतः IPL साठी देण्यात आलेले युट्युबवरील चॅनल DLF IPL 2010 च्या सामन्यांचे highlights, खेळाडूंच्या मुलाखती, सामन्यातील बळी (wickets), धावपट्टी अहवाल (Pitch Report ), सामन्यातील सर्वांत जास्त (मोठे) षटकार( top sixes) , पारितोषिक वितरण सोहळा (award ceremony), इत्यादि दाखवणार आहे. प्रेक्षकांसाठी सामन्याच्या highlights च्या छोट्या व्हिडिओ क्लिप्स तसेच आणखीही बरेचशे संबंधित व्हिडीओ मोबाईल धारकांना YouTube.com/Mobile या संकेत स्थळावर बघायला मिळतील त्यामुळे आपल्या सारख्या कामगार मंडळींना चालता फिरता सामन्यांचा अहवाल मिळेल म्हणजे ही एक पर्वणीच नाही आहे का !!!
युट्युबवरील थेट प्रक्षेपणाव्यतिरिक्त गुगल एक IPL ची Orkut community तयार करणार आहे की ज्याद्वारे ऑर्कुट खातेधारकांना मॅन ऑफ द मॅच, संघाचे मालक यांच्याशी थेट चॅटींग करता येणार आहे. तसेच ह्या कम्युनिटीद्वारे विविध स्पर्धांचेही आयोजन IPL च्या कालावधीत करण्यात येणार आहे.
गुगलने दिलेल्या माहीतीनुसार, एका मोठ्या जागतिक स्पर्धेचे युट्युबवरील ऑनलाईन प्रकाशनाची ही पहिलीच वेळ असेल. DLF IPL या भव्यदिव्य स्पर्धेचे १२ मार्च २०१० रोजी हैद्राबाद येथे उद्घाटन होत आहे. गतवर्षी झालेला डेक्क्न चार्जर्सचा कोलकता नाईट राईडर्स विरुद्धचा रोमांचक विजय आजही सर्वांच्याच लक्षात आहे !!!
"आमच्यासाठी IPL बरोबर केलेली जगतिक भागीदारी तसेच युट्युबद्वारे सर्व जगांत होणारा IPL चा प्रसार तसेच जगात चेंडूफळी (अर्थात cricket) बद्दल जागरूकता पसरवणे हा सगळाच एक निरळा अनुभव आहे" असे शैलेंद्र राव, मेनेजिंग डायरेक्टर, गुगल इंडिया एण्ड मिडिया एण्ड प्लॅटफोर्म्स, एशिया पॅसिफिक यांचे म्हणणे आहे.
ललित मोदी, चेअरमन आणि कमिशनर, इंडियन प्रिमियर लीग (IPL) यांच्या म्हणण्यानुसार या IPL च्या पुढाकारामुळे गुगल इंडिया च्या माध्यमातून लीग ला एक जागतिक स्तरावर मंचतर मिळेलच तसेच जगभरातील तमाम IPL खवैयांना कुठेही आणि कोणत्याही क्षणी क्रिकेटच्या रोमांचक क्षणांचा मनमुराद आस्वाद घेता येईल. एक संपूर्ण IPL साठी बहाल केलेली युट्युबवरील वाहिनी म्हणून भलामोठा जागतिक मंच उपलब्ध होईल.
प्रथमेश शिरसाट prathmesh.shirsat@
0 comments:
Post a Comment