300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Sunday, 21 February 2010

Tagged under:

Mozilla Firefox 3.6 आवृत्ती

आजचे युग हे E-Life आहे.आपल्यापैकी बर्‍याचशा मंडळींचे काम तासनतास इंटरनेट वर असते. प्रत्येकाला आपले इंटरनेट  जलदगतीने चालावे असे वाटंत असते आणि का नाही वाटणार ? पण दरवेळी आपले इंटरनेट ब्राउजर कुठे ना कुठे मागे राहते काही ठिकाणी तर अशी परिस्थिती असते की इंटरनेट सुलभरित्या चालू असताना आणि इंटरनेट कनेक्शन बरोबर असतानादेखील Web Pages किंवा Web sites उघडायला वेळ लागतो. कधी Links बरोबर क्लिक होत नाहीत तर कधी तुमचा इंटरनेट ब्राउजर आपोआप बंद पडतो या आणि यासारख्या अनेक समस्या आपल्या डोकेदुखीची बाब ठरतात आणि याचे मुख्य कारण तुमच्या ब्राउजर मधील काही त्रुटि किंवा किंवा तुमचा ब्राउजरच असू शकते.

अशा समस्यांवर तोडगा म्हणजे Mozilla  Firefox 3.6 आवृत्ती. ही आवृत्ती बाजारात येऊन अवघे ३० दिवस झाले असतील पण इतक्या कमी दिवसांत ही नवीन आवृत्ती वापरणार्‍यांची संख्या १ कोटींवर जाऊन पोहोचली आहे.या संख्येवरूनच तुमच्या लक्षात येईल की ही आवृत्ती किती प्रसिद्ध झाली आहे ते..... त्याचे कारणदेखील तसेच आहे इतर  ब्राउजरच्या तुलनेत Mozilla Firefox हे आतापर्यंत सर्वात उत्तम ब्राउजर म्हणून ओळखले गेलेले आहेच शिवाय याच्या 3.6 या प्रगत आवृत्तीत आणखी काही मुख्य बाबींवर भर देण्यात आला आहे तसेच यात काही 
नवी वैशिष्ट्ये सुद्धा आहेत आहेत, ती अशी  

१. Personas : याद्वारे तुम्ही तुमच्या Mozilla ब्राउजर चा Look एका क्लिकसरशी  बदलू शकता आणि ते ही तुमचे ब्राउजर Restart न करता.

२.Plugin Updater : तुमच्या ब्राऊजरमध्ये अनेक प्रकारचे Plugins असतात बर्‍याचवेळा ते कधी कालबाह्य (Out of date)होतात तेच कळत नाही. पण आता या सोयीमुळे   तुमचे  Plugin आपोआपच update होत राहतील आणि तुमचे Mozilla ब्राउजर अधिकच सुरक्षित होईल.

३.WOFF या प्रकारच्या फोंट ला सपोर्ट.

४.Javascript चा प्रगत आविष्कार तुमचे ब्राउजर अधिक जलद होण्यास मदत करतो.

या व्यतिरिक्त इतर काही तंत्रिक बाबी आहेत की ज्यामुळे Mozilla  3.6 हे सर्वांत प्रगत ब्राउजर म्हणून ओळखले जाते. म्हणुनच कदाचित हा ब्राउजर वापरणार्‍यांची संख्या अधिक वाढत चालली आहे. ह्या आवृत्तीमध्येदेखील काही प्रमाणात त्रूटी असण्यासाची शक्यता आहे नाही असे नाही पण त्यासाठी आपल्याला Mozilla Firefox 3.7 या आवृत्तीची वाट पाहावी लागेल. तूर्तास आपण ही Mozilla Firefox  3.6 ही आवृत्ती वापरून बघुया.

- Mozilla Firefox 3.6  डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना मला जरूर कळवा.

प्रथमेश शिरसाट



Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment