300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Saturday, 20 February 2010

Tagged under:

Pidgin, the universal chat client !


चॅटिंग म्हणजे हल्ली काही नविन बाब राहिलेली  नाही. चॅटिंग हे फक्त आता करमणुकीचे माध्यम न राहता नेहमीच्या वापरातीलच एक मह्त्त्वाचे साधन बनले आहे. आपल्या पैकी बर्‍याच जणांचे Gmail, Yahoo, 
Windows Live (MSN), Myspace किंवा AIM चे ई - मेल आय डी असतात. तसेच काही व्यस्त मंडळींचे एकापेक्षा जास्त आय डी असतात आणि ते सुद्धा प्रामुख्याने Gmail, Yahoo यांसारख्या Domain वर; तर काहींना २४ तास ऑनलाईन रहावे लागते आणि ते सुद्धा सगळ्या ई मेल वर एकाच वेळी.अशा बिकट समयी १ पेक्षा जास्त ई मेल आय डी असलेल्यांची चांगलीच दमछाक होते.  कधी Gmail वरुन yahoo वर जावे लागते तर कधी AIM किंवा MSN वर login करावे लागते. समजा एकाच Messenger द्वारे जर हे सगळे शक्य होणार असेल तर !!! म्हणजे तुमचे मेसेज बघणं, चॅटिंग, फाईल ट्रान्स्फर आणखी खूप काही करु शकता फक्त संभाषण (व्हॉइस चॅट) सोडून कारण ती एकच सोय नाही यात तुम्ही आणि ते ही चकटफू.....आहे की नाही मस्त आयडिया !!!
 
अशाच प्रकारच्या एका सोफ्टवेअरचे नाव आहे Pidgin. हे सोफ्टवेअर  तुम्हाला १ नाही २ नाही तब्बल १६ प्रकारच्या Domain (थोडक्यात म्हणजे १६ प्रकारच्या वेबसाईटवरील ई मेल आयडींना) वर एकाच Login करुन चॅटिंग करणे शक्य करुन देते. म्हणजे जर तुमचे अकाऊंट खाली दिलेल्यापैकी कोणत्याही वेबसाईट वर असेल तर खुशाल एकाच वेळी १ पेक्षा जास्त Login करून चॅटिंग करता येईल.
Pidgin ज्या Domains ना सपोर्ट करते त्याची यादी खालीलप्रमाणे आहे
  • AIM
  • Bonjour
  • Gadu-Gadu
  • Google Talk
  • Groupwise
  • ICQ
  • IRC
  • MSN
  • MySpaceIM
  • QQ
  • SILC
  • SIMPLE
  • Sametime
  • XMPP
  • Yahoo!
  • Zephyr
शिवाय या व्यतिरिक्तही जर तुमचे अकाऊंट twitter, facebook यांसारख्या इतर काही साईट्स वर असेल आणि इतर काही तुम्हाला महत्त्वाचे वाटतील असे काही plugins (मुख्य सोफ्टवेअरमध्ये सहाय्यक म्हणून काम करणारे छोटे सोफ्टवेअर) तरी सुद्धा तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून हवे त्याप्रमाणे डाऊनलोड करू शकता.
Pidgin हाताळण्यास आतिशय सोपे आहे.  

  •  Pidgin ची २.६.६ ही विंडोज साठीची आधुनिक चकटफू आवृत्ती डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
 हे सोफ्टवेअर install कसे करावे याची प्रक्रिया आपण आता बघुया. वरील लिंकवर क्लिक केल्यावर. एक 
फाईल डाऊनलोड होईल



तुम्ही त्या डाऊनलोड केलेल्या फाईलवर डबल क्लिक करा. आता तुमची मुळ Installation ची प्रक्रिया सुरु होईल ती अनुक्रमे खालील प्रमाणे असेल.
१.


२.


३.


४.


५.


६.


७.


आता तुमच्या काँप्युटरवर Pidgin ची installation प्रक्रिया पूर्ण होईल आणि आपोआपच ते सोफ्टवेअर सुरू होईल.
आणि तुम्हाला तुमचे वेगवेगळे ई मेल आयडी टाकण्याबद्दलची माहिती देणारी एक विंडो दिसेल. त्यातील Add या बटणावर क्लिक करा.



आता तुम्हाला जी विंडो दिसेल त्या प्रमाणे तुम्ही तुमच्या ई मेल आयडीचा Domain निवडा.



आता मला फक्त २ ई मेल आयडी निवडायचे आहे म्हणून मी आधी या यादितून Google Talk निवडले. आणि सर्व आवश्यक माहीती त्याच्यात भरली.


आता तुम्ही Add या बटणावर क्लिक केले की मी Gmail (Google Mail) ला जोडला जाईन म्हणजे Connect होईन आणि माझी सगळी Gmail ची मंडळी मला ऑनलाईन दिसतील (अर्थात ती त्यावेळी ऑनलईन असली तर).

आता मला ज्या माझ्या मित्राशी चॅटिंग करायचे त्यच्या नावावर फक्त मी डबल क्लिक केले की एक नविन विंडो उघडेल त्यात तुम्ही चॅटिंग करू शकता हवे तअसे Text किंवा Emotions देखील निवडू शकता.आता मी एकाच वेळी ३ जणांशी चॅटींग करत आहे मला हवे असेल त्याच्या Tab वर क्लिक करून मी त्याच्याशी बोलू शकतो. आणि ते सुद्धा एअकाच खिडकीमध्ये (विंडमध्ये) आता मी माझ्या एका मित्राशी बोलतो आहे. मुख्य chat खिडकीत मी namaskar असे लिहीले आणि Enter दाबले की ते वरच्या खिडकीत दिसते अगदी आपल्या Gtalk किंवा Yahoo Messenger सारखे. तसेच तुम्हाला हव्या तशा आकाराचे अक्षर आणि भावना ( बोलके आणि हावभाव संगणारे चेहरे ऊर्फ Emotions) निवडता येतील.



आता काही इतर पर्याय बघुया. आता मी माझ्या एका मित्राशी बोलत असताना माझ्या चॅट विंडोच्या Coversation या मेन्यूतून त्याला एक फाइल पाठवण्यासाठी Send File हा पर्याय निवडला. तसेच तिकडे तुम्हाला इतर पर्याय सुद्धा दिसतील जसे की New Insatant Message, Join Chat, Find, View Log, Block, Remove आणखी बरेच पर्याय दिसतील. तुम्ही ते तुमच्या गरजेप्रमाणे वापरू शकता.


आता मला आणखी एक अकाऊंट द्वारे चॅट करायचे आहे आणि ते म्हणजे yahoo द्वारे. यासाठी मी Buddy List या विंडोतून Accounts या मेन्यूतून Manage Accounts हा पर्याय निवडला.


तुमच्या समोर एक accounts ची विंडो उघडेल त्यातून Add या बटणावर क्लिक करा.


आता आपण जसे Gmail चे अकाऊंट Add केले त्याप्रमाणेच Yahoo चे सुद्धा Add करुया.


आता माझ्या Buddy List मध्ये yahoo वाले माझे मित्र देखील आपोआप Add होतील आणि माझे mails सुद्धा !


आणि मला एकाच वेळी दोन्ही म्हणजे याहू आणि गुगल च्या माझ्या मित्र मंडळींशी चॅट करता येईल.

अशाच प्रकारे तुम्हाला हवे तेवढे ई मेल आय डी तुम्ही यात Add किंवा Remove करु शकता. आणि एकाच वेळी सगळ्या किंवा तुम्हाला हव्या असलेल्या accounts मधून ऑफलाईन जाऊ शकता.
तुम्हाला हे भन्नाट चकटफू  सोफ्टवेअर कसे वाटले मला जरूर कळवा.काही प्रतिक्रिया आणि सुचना असल्यास त्याही माझ्या पर्यंत पोहचू द्या.
 
प्रथमेश शिरसाट prathmesh.shirsat@gmail.com  

0 comments:

Post a Comment