मला संगणकातील नवनवीन गोष्टी शिकायला नेहमीच आवडतं. असच एकदा संगणकावर भ्रमंती करत असताना एक नवीन युक्ती सापडली. आपण आपल्या कुठल्याही सोहळ्याचे किंवा समारंभाचे photos नेहमी काढतो आणि ते संगणकावर साठवून सुद्धा ठेवतो, आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन हे तर आम्ही सगळेच करतो.पण हेच photos तुम्हाला photo album च्या स्वरूपात आणि ते ही तुमच्या आवडत्या गाण्यांच्या तालावर म्हणजेच आपण एखादी लग्नाची VCD बघतो की नाही अगदी तशाच प्रकारे बघायला नक्कीच आवडेल हो की नाही !!! थोडी कष्टाची पण अतिशय उपयोगाची अशी ही युक्ती xp ची एक अनोखी देणगी आहे यासाठी कुठलेही software install करण्याची गरज नाही.
चला तर मग मंडळी शिकूया आता कसा करायचा आपल्या photos चा audio/visual album.
सर्वात आधी तुम्ही Start या बटणावर क्लिक करून All Programms ----> Windows Movie maker हा पर्याय निवडा.
आता तुमच्या समोर एक विंडॉ ओपन होईल. डाव्या हाताला तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील ते आधी नीट समजावून घ्या तसे ते हाताळण्यास अगदी सोपे आहे.
वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे तुम्हाला आधी हवे ते photos, audio/ video files निवडाव्या लागतील. त्यानंतर या निवडलेल्या सर्व files हव्या त्या क्रमाने मांडा. ह्या file मांडणे अगदी सोपे आहे जी file तुम्हाला हवी आहे त्यावर क्लिक करून ठेवा आणि ती file वर दाखवल्याप्रमाणे drag करा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्या photos ना वेगवेगळे video Transitions आणि video effects देऊ शकता कसे ते आता खालील चित्रात बघुया.
आता तुम्हाला हवे तितके photos, videos क्रमाने लावून घ्या नंतर त्याला हवे तसे effects द्या. आणि आता तुम्ही photos साठी हव्या त्या audio/ music file हव्या त्या क्रमाने मांडू शकता तसेच त्या music file चा ठराविक भाग देखिल घेऊ शकता ( अर्थात त्यासाठी तुम्हाला audio cutter/ splitter software download करावे लागेल.जास्त् माहीतीसाठी तुम्ही internet वर भ्रमंती करा नक्कीच तुम्हाला अशा प्रकारची भरपूर softwarers सापडतील)
आता तुम्ही हवे असल्यास एखादे शीर्षक देखील देऊ शकता त्या साठी तुम्हाला डाव्या बाजूस दिसणारा make titles or credits हा पर्याय निवडावा लागेल त्यात तुम्हाला हवा तो पर्याय तुम्ही निवडू शकता. आता तुम्ही तयार केलेला Video, save to my computer ह्या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला ह्व्या त्या ठिकाणी store करा मग चला तुम्ही पण आता बना आता Movie Maker.....आणि बनवा स्वतःचे विविध photo albums. तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा.
Prathmesh Shirsat (prathmesh.shirsat@gmail.com)
Monday, 22 February 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment