डास आणि घरमाश्यांचा त्रास नाही असे बहुदा एकही घर सापडणार नाही. मुंबईमध्ये तरी असे घर सापडणे कठीणच. डास मारण्यासाठी मिळणारी औषधे विकत घावी लागतात आणि ती देखील विषारी असतात. (त्यामुळे आजारापेक्षा ईलाजच महाग पडतो :-))
डास आणि घरमाश्यांवर एक सोपा आणि मोफत इलाज मी आज वाचकांना सांगणार आहे. मित्रांनो मी काही तुम्हाला एखादे केमीकल किंवा झाडपाल्याचे औषध सुचविणार नाही तर एका अशा सॉफ्टवेअरची माहिती देणार आहे जे चक्क डासांना पळवुन लावते. काय ! झालात ना अचंबीत !
डासांना दुर पळविण्यासाठी SEA Anti-Mosquitoes XP v2.0 आणि KP Anti-mosquitoes V1.0 अशी दोन सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत आणि मुख्य म्हणजे दोनही सॉफ्टवेअर्स मोफत उपलब्ध आहेत.
SEA Anti-Mosquitoes XP v2.0
KP Anti-mosquitoes V1.0
आता पाहुया या सॉफ्टवेअर्सचे काम कसे चालते ते.
हे सॉफ्टवेअर एकदा चालु केले की १६००० Hz (हर्ट्झ) ते २०००० Hz इतक्या वारंवारतेचा (Audio frequency) आवाज उत्पन्न करतात. मानवी कर्णेंद्रीयांना जरी हा आवाज ऐकु येत नसला तरी डास, घरमाश्या, कीटक आणि अन्य प्राण्यांना हा आवाज ऐकु येतो. हा जास्त frequency चा आवाज डासांना सहन होत नाही आणि ते आवाजाच्या स्त्रोतापासुन दुर जातात.
फक्त हे सॉफ्टवेअर व स्पीकर्स सुरु करा आणि निश्चींतपणे झोपी जा.
येथे क्लिक करुन ही दोनही सॉफ्टवेअर्स डाउनलोड करा.
(टीप - मी स्वतः ही दोनही सॉफ्टवेअर्स तपासुन पाहिली नाही आहेत याची कृपया नोंद घ्या.)
0 comments:
Post a Comment