ईमेलचा IP address आणि त्यावरुन ईमेल पाठवीणार्या व्यक्तीच्या मुळस्थानाची माहिती कशी मिळवावी याबद्द्ल एका वाचकाने माझ्याकडे विचारणा केली होती. नेटभेटच्या इतर वाचकांच्या माहितीसाठी मी येथे एका लेखाच्या स्वरुपात याचे उत्तर देत आहे.
१. Gmail मध्ये आलेल्या ईमेलला ओपन करुन डाव्या बाजुला असलेल्या पर्यांयापैकी Show original हा पर्याय निवडा आणि आलेल्या स्क्रीप्ट मध्ये
Recevied : from हा मजकुर सर्च करा.
२. खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे एक IP Address दीसेल. हा IP Address ज्या संगणकावरुन ईमेल पाठविला गेला त्या संगणकाचा असतो.
३. http://www.ip2location.com/free.asp या साईटवर जाउन सदर IP Address बद्दल अधिक माहिती मिळवता येते.
0 comments:
Post a Comment