300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Wednesday, 24 February 2010

Tagged under: ,

Mouth Art - Pencil Drawings by Doug Landis


दुर्दम्य ईच्छाशक्ती आणि प्रचंड जिद्द हे दोन गुण अंगी असतील तर माणसाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. कीतीही कठीण प्रसंग आणि विपरीत परीस्थीती ओढवीली तरी देखील या दोन गुणांच्या सहाय्याने त्यावर मात करुन अंतीमतः यशस्वी होता येते हे आपल्या कर्तुत्वाने सिद्ध करणार्‍या एका व्यक्ती बद्द्ल आज मी वाचकांना माहिती देणार आहे.

डाउग लँडीस असे नाव असलेली ही व्यक्ती एक चित्रकार आहे. डाउग रेखाचित्रे काढतो म्हणजे Pencil sketching  करतो. मात्र पेन्सील हातात न धरता डाउग तोंडाने चित्रे काढतो.

लहानपणी शाळेमध्ये कुस्ती खेळत असताना आलेला अर्धांगवायुच्या झटक्यामुळे डाउगचे मानेपासुन खालचे पुर्ण शरीर लुळे झाले आहे. त्यामुळे त्याला ईतर सामान्य माणसांप्रमाणे हात, बोटे, पाय वापरता येत नाहीत. या अपघातानंतर डाउगला टीव्ही पाहण्याखेरीज काहीच शक्य नव्हते. सतत टीव्ही पाहण्याच्या त्याच्या सवयीमुळे चिंतीत झालेल्या डाउगच्या भावाने त्याला पेन्सील तोंडात धरुन चित्रे काढण्यास सांगीतले.

यापुर्वी कधीच चित्रे काढलेली नसल्याने आणि मुळातच चित्रकलेची आवड नसल्याने डाउगला सुरुवातीला खुप अडचणी आल्या. मात्र अतीशय प्रयत्नपुर्वक सतत केलेल्या सरावामुळे डाउगला हळुहळु चित्रकला जमत गेली. एवढ्यावरच डाउग थांबला नाही तर त्याने स्वतःची अशी एक शैली निर्माण केली.
चित्रकलेमध्ये प्रगती करणार्‍या डाउगने सोबतीने आपले शिक्षणही पुर्ण केले. त्याने ग्राफीक आर्टस मध्ये B.A. आणि मोशन ग्राफिक्समध्ये M.F.A (Masters in Fine Arts) ही पदवी मिळवीली आहे.

"नाहीश्या होणार्‍या प्राण्यांच्या जाती" या विषयावर काढलेली त्याची चित्रे  विशेष गाजली. या चित्रांमध्ये डाउगने प्राण्यांच्या शरीराचा काही भाग विरळ होताना दाखवीला आहे. यामुळे या प्राण्यांच्या प्रजातींना लोप होण्याचा धोका आहे हा विचार प्रभावीपणे पाहणार्‍यांच्या मनावर नोंदला जातो.

Mouth Art - Pencil Drawings by Doug Landis


डाउग लँडीसबद्दल अधिक माहीती मिळवीण्यासाठी आणि त्याची चित्रे पाहण्यासाठी त्याच्या www.mouthart.com या वेबसाईटला भेट द्या.

मित्रांनो, डाउग लँडीस सारखीच इतर अनेक उदाहरणे देता येतील. त्यापैकी काही जगप्रसीद्ध व्यक्ती असतील तर काही तुमच्याच आजुबाजुला वावरणार्‍या मंडळींपैकी असतील. देवाने सर्वांनाच काही न काही अडचणी, आव्हाने दीलेली असतात. या अडचणी मुळातच आपली जडणघडण होण्यासाठी, अनुभवाच्या मुशीत तावुनसुलाखुन बाहेर पडण्यासाठी दीलेल्या असतात. म्हणुनच समोर आलेल्या अडचणींचा जितका फायदा घेता येईल तितका घ्या. आपल्यापेक्षाही कठीण परीस्थीतीत जगणार्‍या आणि तरीही हसत जगणार्‍या आसपासच्या अनेक लोकांना  शोधा, त्यांना आपले गुरु बनवा आणि त्यांच्याप्रमाणेच जगण्याचा प्रयत्न करा.

जाता जाता मला मिळालेल्या एका SMS मधील ही एक ओळ सांगतो,

"मला माझ्या मनासारखे बुट मिळाले नाहीत म्हणुन मी भर रस्त्यात रडत होतो. तेव्हा मला एक मुलगा दीसला ज्याला मुळात पायच नव्हते आणि तरीही तो हसत होता".

0 comments:

Post a Comment