300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Saturday, 2 January 2010

Tagged under:

How to password protect MS office (word, excel, powerpoint) documents?


मित्रांनो आपण संगणकावर प्रामुख्याने वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉइंट या ऑफीस अप्लिकेशन्समध्ये काम करत असतो. संगणकावरील आपल्या एकुण कागदपत्रांपैकी जवळपास ५०-६०% किंवा त्याहुन जास्त डॉक्युमेंट्स हे वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉइंट या फॉर्मॅट्स मध्ये असतात.

आज मी तुम्हाला या तीनही फॉर्मॅट्समधील आपल्या फाईल्स पासवर्ड देउन सुरक्षीत कशा ठेवता येतील हे सांगणार आहे. पासवर्डने सुरक्षीत केलेल्या या फाईल्स  उघडताना प्रत्येक वेळेस पासवर्ड द्यावा लागतो त्यामुळे संगणकावरील महत्त्वाची कागदपत्रे अतिशय सुरक्षीत ठेवता येतात.

मायक्रोसॉफ्ट वर्ड फाईलला पासवर्ड कसा द्यावा -

मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील आपल्या डॉक्युमेंटला नाव देउन सेव्ह केल्यानंतर पुन्हा ती फाईल उघडुन Tools → Options → Save येथे जाउन पासवर्ड देता येइल.

येथे खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे पासवर्डसाठी दोन वेगवेगळे रकाने दीसतील.



Password to open -  वर्ड फाईल उघडण्यासाठी हा पासवर्ड द्यावा लागतो.
password to modify - वर्ड फाईल उघडता आली तरी त्यात दुसर्‍या कोणालाही बदल करता येउ नयेत यासाठी हा पासवर्ड द्यावा लागतो.
(उदाहरणार्थ - जर ही फाईल कोणाला इ-मेलद्वारे पाठवायची असेल तर फाईलसोबत फक्त password to open हा पासवर्ड द्यावा. त्यामुळे ज्याला ईमेलद्वारे फाईल मिळेल त्या व्यक्तीला फक्त फाईल वाचता येईल परंतु त्यात काहीही बदल करता येणार नाहीत.
दोनही पासवर्डस देउन OK वर क्लिक करा.

आता पासवर्ड बरोबर टाईप झाला आहे याची खात्री करुन घेण्याकरीता पुन्हा पासवर्ड विचारला जाईल, पुन्हा
पासवर्ड देउन OK वर क्लिक करा.

आणि आता फाईल सेव्ह करा.

पुन्हा जेव्हा ही फाईल ओपन कराल तेव्हा पासवर्ड दील्यावरच फाईल उघडेल.


मायक्रोसॉफ्ट एक्सेल फाईलला पासवर्ड कसा द्यावा -

एक्सेल फाईलला पासवर्डने सुरक्षीत करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे.

एक्सेल फाईल सेव्ह करताना File → Save As येथे गेल्यावर उजव्या बाजुला कोपर्‍यात Tools चा पर्याय दीसेल
Tools मध्ये General Options चा पर्याय निवडा.



येथे आधी सांगीतल्याप्रमाणे password to protect आणि Password to modify या रकान्यांमध्ये पासवर्ड द्या.

आता पासवर्ड बरोबर टाईप झाला आहे याची खात्री करुन घेण्याकरीता पुन्हा पासवर्ड विचारला जाईल, पुन्हा पासवर्ड देउन OK वर क्लिक करा.

आणि आता फाईल सेव्ह करा.

पुन्हा जेव्हा ही फाईल ओपन कराल तेव्हा पासवर्ड दील्यावरच फाईल उघडेल.


मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट (ppt) फाईलला पासवर्ड कसा द्यावा -

पॉवरपॉइंट फाईल्सला पासवर्ड देण्याची पद्धती वर दीलेल्या मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या पद्धतीसारखीच आहे.

आता संगणकावरील आपले महत्त्वाचे डॉक्युमेंट्स त्वरीत पासवर्ड प्रोटेक्ट करा आणि निश्चींत व्हा !

Article contributed by - PRATHMESH SHIRSAT



Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.


0 comments:

Post a Comment