300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Thursday, 31 December 2009

Tagged under:

Welcome 2010


मित्रहो, २००९ चा निरोप घेण्याची वेळ आली. २०१० चा हात धरुन पुढे वाटचाल सुरु करण्याआधी थोडे सिंहावलोकन करुया.

सरते वर्ष आमच्यासाठी खुपच छान गेले. नेटभेट ची सुरुवात याच वर्षी झाली त्यामुळे २००९ हे वर्ष कायम आमच्या लक्षात राहील. नेटभेटच्या माध्यमातुन अनेक लोकांशी नेट-भेट झाली. मुंबई, पुणे, लातुर, सातारा, कोल्हापुरमधल्या लोकांशी गप्पा तर झाल्याच त्याचसोबत सातासमुद्रापारच्या मराठी बांधवांशी देखील संपर्क झाला.

२००९ मधिल नेटभेटच्या वाटचालीचे काही मैलाचे दगड -

  • १० मार्च २००९ - netbhet.blogspot.com या नावाने नेटभेट ब्लॉगची सुरुवात
  • १० मार्च २००९ - फाईल एक्स्टेंशन वरुन फाईलचा प्रकार कसा ओळखाल? या पहिल्या लेखाचे प्रकाशन
  • २५ मार्च २००९ - netbhet.blogspot.com वरुन netbhet.com या डोमेनवर स्थलांतर
  • २९ मार्च २००९ - Planning to buy an Air-conditioner या लेखाला शेखर जोशी यांची नेटभेटला मिळालेली पहिली कमेंट
  • २७ मे २००९ - नेटभेटवरील १०० वा लेख. या निमीत्ताने इतर ब्लॉगर्सना आम्ही लोगो बनवुन दीले.
  • ३ जुलै २००९ - How to calculate EMI in excel या आतापर्यंत सर्वाधीक वाचल्या गेलेल्या लेखाचे प्रकाशन.
  • ७ जुलै २००९ - वाचकांच्या संगणक आणि ब्लॉगींगविषयक प्रश्नांसाठी नेटभेट फोरम ची सुरुवात.
  • २१ सप्टेंबर २००९ - मराठी पुस्तके नेटभेटच्या वाचकांना मिळवुन देणार्‍या "पुस्तकभेट" या योजनेची सुरुवात.
  • २१ ऑक्टोबर २००९ - उत्कृष्ठ मराठी ब्लॉगर्सच्या निवडक लेखांचा समावेश असलेल्या नेटभेट ई-मासिकाचा प्रारंभ. जगभरातील एक लाखाहुन अधिक मराठी बांधवाना ईमेल द्वारे हे मासिक दरमहा पाठविण्यात येते.
  • २० नोव्हेंबर २००९ - "स्टार माझा" वाहिनीतर्फे घेण्यात आलेल्या "माझा ब्लॉग" या स्पर्धेत नेटभेटची उल्लेखनीय मराठी ब्लॉग म्हणुन निवड.
  • २२ नोव्हेंबर २००९ - Born to win या ट्रेनींग कंपनीचे संचालक श्री. अतुल राजोळी यांचा अतिथी लेखक म्हणुन नेटभेट मध्ये सहभाग.
  • ३१ डीसेंबर २००९ पर्यंतचे page views - 98526 (काही दिवसांतच 100000 पुर्ण होतील.)
  • नेटभेटचे सभासद (Email Subscribers) - ७८4 सभासद
  • Average Daily pageviews (from last 1 month) - 900 - 1000
  • आजपर्यंत प्रकाशित झालेल्या एकुण लेखांची संख्या - 285

वाचकांच्या आशीर्वादानेच "नेटभेट" यापुढेही मराठी भाषेतील नविन उपक्रम राबवत राहील आणि यापुढेही वाचकांशी नेटभेटने जोडलेली ही नाळ अधिकाधिक घट्ट होत राहीलच या अपेक्षेने २०१० सालामध्ये आम्ही पदार्पण करत आहोत.

नविन वर्षाच्या नेटभेटच्या वाचकांना आणि सर्व बांधवाना खुप खुप शुभेच्छा !


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment