300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Sunday, 3 January 2010

Tagged under:

ज्ञानी व्यक्ती - गतीमान प्रगती

नमस्कार मित्रांनो! नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा! नेटभेट वरील माझ्या पुर्वीच्या दोन्ही लेखांना (हमखास यशाचा फॉर्मुलाउत्कृष्ट बनण्याचा ध्यास ) चांगल्या प्रतिक्रीया दिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद!
या लेखाद्वारे मी आपणासमोर काही नवीन विचार मांडत आहे. या लेखा बाबत देखिल आपल्या प्रामाणिक प्रतिक्रीया अपेक्षित आहेत.

आपण ज्या कालखंडात सध्या जगत आहोत तो भविष्यामध्ये नक्कीच निर्णायक ठरणार आहे. भविष्यात जेव्हा इतिहासातील प्रमुख घटनांबद्दल चर्चा होईल तेव्हा आपण वावरत असलेल्या काळाला अनन्य साधारण महत्त्व दिले जाईल यात काहीच वाद नाही. आपल्या देशातच नव्हे, तर संपुर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये खुप मोठ्याप्रमाणावर झपाट्याने बदल होत आहेत. लोकांच्या रहाणीमानामध्ये बदल होत आहेत. तंत्रज्ञान अतीवेगात जगाच्या कानाकोपर्‍यात फोफावत आहे. आज आपल्यासमोर भविष्याबद्दल, आपल्या रहाणीमानाबद्दल, शिक्षणाबद्दल, व्यवसायाबद्दल व इतर अनेक गोष्टींबद्दल असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. ह्या बदलादरम्यान आपणासमोर अनेक संध्यादेखिल येतील परंतु त्या बाबत जागरुक असणे अत्यंत गरजेचे आहे. जर आपण जागरुक नाही राहीलो तर भविष्यातील या अतीजलद बदलाला आपण तोंड देउ शकणार नाही. 

भविष्यातील होणार्‍या बदलांना समजुन घेण्याआधी, आपण जगाच्या इतिहासात झालेल्या प्रमुख बदलांबद्दल एकदा जाणुन घेउया.

सर्वात प्रथम ज्या युगात आपण जगत होतो ते म्हणजे 'अश्म युग'. अश्म युगामध्ये माणसाची दिनचर्या अन्न मिळवणे व खाणे एवढीच असायची. आजच्या अन्नाचा बंदोबस्त केला की झालं, उद्याचं उद्या! अश्म युगानंतर एका खुप मोठं सकारात्मक परिवर्तन माणसाच्या आयुष्यात झालं आणि माणुस एका परिणामकारक युगात येउन ठेपला ते म्हणजे 'कृषि युग' म्हणजेच शेती. जो माणुस रोज अन्न गोळा करण्यासाठी भटकत असे, तोच आता शेतीच्या माध्यमातुन पुढील सहा महीन्यांच्या किंवा वर्षाच्या अन्नाची साठवण करु लागला. युग बदलले व कार्यक्षमता कित्येक पटिने वाढली. परंतु पुर्वीच्या युगातुन नवीन युगामध्ये स्थलांतर करणे हे सोपे नव्हते. काही पिढ्यांनंतर पुन्हा एकदा युग परिवर्तन झाले. नवीन युग उदयाला आले ते म्हणजे 'औद्योगिक युग'. औद्योगिक युगामध्ये यंत्रांचा प्रमुख समावेश होता. जी कामे करण्यासाठी पुर्वी मनुष्यबळाची गरज असायची ती कामे आता यंत्रांच्या सहाय्याने होउ लागली. पुन्हा एकदा कार्यक्षमता वाढली. परंतु माणसाचे महत्त्व कमी झाले कारण तो करत असलेले काम आता यंत्र करु लागले. माणसाला या परिवर्तनातुन जाताना सुध्दा प्रचंड त्रास सहन करावा लागला. ह्या युग परिवर्तनानंतर, आपण ज्या कालखंडातुन सध्या जात आहोत ते सुध्दा एक प्रकारचे युग परिवर्तन आहे. आपण ज्या युगात प्रवेश केला आहे ते अतीप्रगत तंत्रज्ञान समृध्द युग आहे, या युगाला आपण म्हणू 'माहीती तंत्रज्ञान युग'. कंप्युटर, इंटरनेट व अतीप्रगत तंत्रज्ञान आज आपली कार्यक्षमता हजारो पटीने वाढवित आहेत. जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचे बदल होत आहेत. आपले राहणीमान आधीपेक्षा नक्कीच बदलले आहे. नवीन अडचणी, तसेच संध्यासुध्दा आपल्यासमोर येत आहेत. या बदलाला आपण आता सामोरे जात आहोत. ह्या बदलाला सामोरे जाणे जेवढे कठीण आहे तेवढेच महत्त्वाचे देखिल आहे. या बदलाला यशस्वीपणे तोंड द्यायचे असेल तर आपल्याला आपल्या दृष्टीकोनात बदल करावा लागेल. आपण ज्या युगात वावरत आहोत, त्या युगामध्ये नवीन ज्ञान, नवीन कल्पना, नवीन घडामोडी, जगामध्ये प्रत्येक दिवसाला, दिवसाच्या प्रत्येक तासाला, तासाच्या प्रत्येक मिनीटाला, मिनीटाच्या प्रत्येक सेकंदाला नवीन माहीती सुसाट वेगाने वेगवेगळ्या माध्यमांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचत असते. मग ते माध्यम पुस्तक असो, इंटरनेट असो, टिवी असो अथवा काहीही असो. ज्या माणसांकडे ह्या प्रचंड माहीतीचा भंडार असेल व ती माहीती प्रभावीपणे मांडण्याचा व वापरण्याचे कौशल्य असेल ती व्यक्ती आजच्या युगामध्ये जलद गतीने प्रगती करु शकते. आजच्या या माहीती तंत्रज्ञान युगात, सर्वात महत्त्वाचे भांडवल जे प्रगतीसाठी आवश्यक आहे ते म्हणजे 'ज्ञान'. आजच्या घडीला भविष्यात प्रगती करण्यासाठी जी ताकद लागेल ती पैसा नाही, इंफ्रास्ट्रक्चर नाही तर ती ताकद म्हणजे ज्ञान. आणि ही ताकद आज आपणा सर्वांना उपलब्ध आहे. आज कॉलेजमध्ये जाणार्‍या मुलांपासुन, गृहिणींपर्यंत कोणीही एखाद्या विषयाचे ज्ञान मिळवून व त्याचा वापर करुन उद्योजक बनू शकतो व स्वतःचेच नव्हे तर इतरांचेसुध्दा आयुष्य बदलु शकतो. आज इंटरनेटमुळे आपण जगातील कोणत्याही विषयाबद्दलची माहीती शोधू शकतो. www.google.com वर आपण हवी असलेली कोणतीही माहीती शोधू शकतो. www.wikipedia.com हि देखिल जगातील कोणत्याही गोष्टीची माहीती मिळवून देणारी उत्तम वेबसाईट आहे. त्याच प्रमाणे आज सोशल नेटवर्कींग वेबसाईट्ची देखिल कमतरता नाही. www.orkut.com,www.facebook.com, www.twitter.com, www.linkedin.com या सारख्या वेबसाईटच्या माध्यमातुन आपण जगातील कोणत्याही व्यक्तीबरोबर आपणास आवश्यक असलेल्या माहीतीची देवाण-घेवाण करु शकतो. आज वेगवेगळ्या विषयावरची लाखो पुस्तके (E- Book) एका क्लिकने आपण डाउनलोड करुन वाचु शकतो. निरनिराळ्या क्षेत्रातील तज्ञ माणसांचे विचार आपण इंटरनेटच्या माध्यमातुन वाचु, बघु व ऐकु देखिल शकतो. मला तरुणांना विशेष सांगावेसे वाटते, कि आपण इंटरनेट्चा वापर टाईम-पास म्हणुन न करता आपल्या विषयाला अनुसरुन जास्तीतजास्त रिसर्च साठी करावा.

माहीती तंत्रज्ञान युगात माहीतीला काही अंत नाही व ज्ञानाला काही सिमा नाही. परंतु त्याही पेक्षामहत्त्वाचे म्हणजे आत्मसात केलेल्या ज्ञानाचा वापर करुन कृती करणे. ज्ञान ग्रहण करुन, ते आचरणात आणणे. कृतीमुळेच अपेक्षित परिणाम साध्य होतात. ज्ञानामुळे आपली क्षमता व शक्ती नक्कीच वाढते पण त्या शक्तीचा वापर तेव्हाच होउ शकतो जेव्हा आपण त्याचा वापर करु. कारण शक्तीची व्याख्याच आहे - एखादी कृती करण्याची क्षमता. आपण जास्त भर दिला पाहीजे.

आपले कार्यक्षेत्र व त्याला अनुसरुन असलेले आपले ध्येय इतरांपेक्षा जलद गतीने साध्य करायचे असेल तर आपल्याकडे त्या क्षेत्राचे जास्तीतजास्त व आधुनिक ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे. व त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे ते आचरणात आणणे. माझ्या लक्ष्यवेध या प्रोफेशलन व्यक्तिंसाठी राबविण्यात येणार्‍या प्रशिक्षणक्रमामध्ये जे प्रशिक्षणार्थी येतात, त्यांना त्यांच्या ध्येयांशी संबंधीत तर्कशुध्द पध्दतीने रिसर्च करायला लावणे हा एक आमचा प्रमुख उद्देश असतो. आता पर्यंतचा अनुभवावरुन मला सांगण्यास आनंद वाटतो की आमचे प्रशिक्षणार्थी या तर्कशुध्द पध्द्तीने केलेल्या रिसर्चच्या मदतीने आपल्या प्रोफेशनमध्ये उत्तुंग झेप घेतात व यशस्वी होतात.

आगामी काळामध्ये दुनियाच्या पाठी न पडता सतत व वेगाने प्रगती करायची असल्यास, आपले ज्ञान वृध्दींगत करण्यावर भर द्या. मी असं म्हणेन त्यालाच सर्वात जास्तं प्राधान्य द्या, बदलत्या काळाकडे सकारात्मक दृष्टीकोनाने पहा व समोरुन आलेल्या संध्यांचं सोनं करा. यश तुमचेच असेल. थोडक्यात - ज्ञानी व्यक्ती बना व गतीमान प्रगती करा!
 All the Best...

 धन्यवाद!
  अतुल अरुण राजोळी 



Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.


0 comments:

Post a Comment