या फाईल्सना पासवर्ड देऊन जसे सुरक्षित करता येते तसेच जर एखाद्या फोल्डरला देखील पासवर्ड देऊन सुरक्षित करता आले तर आणि ते सुद्धा कुठल्याही सॉफ्टवेअरच्या मदतीशिवाय !!! ??? मग काय शोधमोहीम सुरू केली आणि मला उपाय पण सापडला. या सरळ सोप्या युक्तीमुळे तुम्हाला इंटरनेटवर फॉल्डर लॉक करण्यासाठीची सॉफ्टवेअर्स नाही शोधवी लागणार.
यासाठी फक्त एकच गोष्ट गरजेची आहे आणि ती म्हणजे की तुम्हाला ज्या फोल्डरला पासवर्ड देऊन सुरक्षित करायचे आहे त्याची size छोटी असावी. म्हणजेच जर तुम्ही अवाढव्य आकाराचे फोल्डर जर लॉक करायला ही युक्ती वापराल तर मग तुमचा काँम्प्युटर हा कासवासरखा हळूहळू चालेल म्हणुन खबरदारीचा पर्याय म्हणून मला हे आधी नमूद करावेसे वाटले.
चला तर मग शिकूया ही मजेदार युक्ती काय आहे ते !
सर्वात आधी तुम्हाला जे फोल्डर लॉक करायचे आहे त्यावर डबल क्लिक करून ते फोल्डर ओपन करा त्यात तुम्हाला हव्या असलेल्या सर्व महत्त्वाच्या फाईल्स आणि फोल्डर्स कॉपी करून घ्या. आता ओपन केलेले फोल्डर बंद करा.. हवे असल्यास त्या फोल्डरला तुम्ही वेगळे नाव देखील देऊ शकता. त्यासाठी त्या फोल्डरवर Righrt click करून Rename हा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल मग हवे ते नाव तुम्ही त्या फोल्डर्ला द्या आणि Enter बटण दाबा त्या फोल्डरचे नाव बदललेले तुम्हाला दिसेल.
आता त्या फोल्डरवर पुन्हा Right Click करून Send To > Compressed (Zipped) Folder हा पर्याय निवडा.
तुम्हाला Compressed (Zipped) Folder नावाची एक छोटी विंडो ओपन झालेली दिसेल त्यातील Yes या बटणावर क्लिक करा.
आता तुम्हाला तुमच्याच फोल्डरच्या नावचे एक Zipped फोल्डर तयार झालेले दिसेल.
त्या फोल्डरवर पुन्हा Right Click करून Open With > Compressed (Zipped) Folders हा पर्याय निवडा.
तुम्हाला Add Password ची छोटी विंडो दिसेल त्यात हवा तो पासवर्ड टाका आणि तोच पासवर्ड पुन्हा एकदा टाकून Confirm करा. आता OK या बटणावर क्लिक करा की झाले तुमचे फोल्डर पासवर्डने सुरक्षित.
अशाच प्रकारे तुम्ही दिलेला पासवर्ड Remove Password हा पर्याय निवदून तुम्हाला काढून टाकता येईल पण त्यासाठी तुम्ही दिलेला पासवर्ड तुमच्या लक्षात असणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्ही पासवर्ड काढू शकणार नाही !!!.
आहे कि नाही भन्नाट युक्ती फोल्डरला पासवर्ड देऊन सुरक्षित करण्याची आणि ते सुद्धा कुठल्याही सोफ्टवेअरशिवाय.....
ही युक्ती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच जर काही प्रतिक्रिया किंवा सूचना करायच्या असतील तर त्यादेखील मला कळवा.
(मोफत फोल्डर लॉक सॉफ्टवेअरची माहिती नेटभेटवरील या लेखामध्ये मिळेल.)
प्रथमेश शिरसाट prathmesh.shirsat@gmail.com
0 comments:
Post a Comment