300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Tuesday, 26 January 2010

Tagged under:

How to add Static Pages to Blogger Blog?






ब्लॉगर इन ड्राफ्ट (draft.blogger.com) या ब्लॉगर.कॉमच्या ब्लॉग एडीटरमध्ये नुकताच एक नविन सुविधा जोडण्यात आली आहे. वर्डप्रेसमध्ये बनविलेल्या ब्लॉग्जप्रमाणेच आता ब्लॉगर मध्येही Static Pages लावता येतात.
Static Pages म्हणजे ब्लॉगपोस्ट व्यतीरीक्त स्थिर मजकुर दाखविणारी पाने. ब्लॉगरच्या मुख्य पानावर नविन ब्लॉगपोस्ट जुन्या पोस्टची जागा घेत असते आणि जुनी पोस्ट आपोआपच मुख्य पानावरुन नाहिशी होत असते. मात्र काही मजकुर असा असतो जो ब्लॉगवर नव्याने येणार्‍या वाचकांना सहजगत्या दिसणे आवश्यक असते. या साठी Static Pages चा वापर केला जातो. उदाहरणार्थ स्वतःबद्दल, ब्लॉगबद्दल माहिती, संपर्क, पत्ता इत्यादी पाने ब्लॉगला जोडण्यासाठी Static Pages  वापरतात.
आज आपण Static Page जोडण्यासाठीची पद्धत या लेखाद्वारे पाहुया. 
Static Page लावण्यासाठीची पद्धत दोन वेगवेगळ्या प्रकारात मोडता येते. जर तुम्ही ब्लॉगर.कॉमने उपलब्ध करुन दीलेली स्टँडर्ड टेम्प्लेट वापरत असाल तर पहिली पद्धत वापरता येईल. दुसरी पद्धत ही कस्टम टेम्प्लेट वापरणार्‍या ब्लॉग्जसाठी आहे.


स्टँडर्ड टेम्प्लेट मध्ये Static Page लावण्यासाठीची पद्धत -


१.  draft.blogger.com वर लॉग-ईन करा.
२. Postings वर क्लिक केल्यावर Edit pages हा नवा पर्याय दीसेल.
५. नविन स्टॅटीक पेज ब्लॉगवर उजव्या बाजुला साईडबारवर किंवा ब्लॉग हेडरमध्ये अशा दोन ठीकाणी दाखवता येते. खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे दोघापैकी एक पर्याय निवडा. (तुर्तास तिसरा पर्यायाकडे दुर्लक्ष करा)



६. खाली चित्रात मी दोन स्टॅटीक पेजेस बनवुन दाखविली आहेत. अशा प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त १० पाने ब्लॉगला जोडु शकता.

कस्टम  टेम्प्लेट मध्ये Static Page लावण्यासाठीची पद्धत -


Custom Template मध्ये स्टॅटीक पेज जोडणे थोडेसे अवघड आहे.


१. ही पद्धत वापरण्याआधी यापुर्वीच टेम्प्लेटमध्ये स्टॅटीक पेज विजेट नसल्याची खात्री करुन घ्या.
२. आधी Layout आणि त्यानंतर  Edit HTML वर क्लिक करा.
३. काहीही बदल करण्याआधी टेम्प्लेट डाउनलोड करुन घ्या. काही चुक झाल्यास टेम्प्लेट पुर्ववत करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.
४. Expand Widget Templates असे लिहिलेल्या चेकबॉक्समध्ये √ करा.
५. आता खाली दीलेला (किंवा तत्सम) कोड टेम्प्लेट मध्ये सर्च करा. जर हा कोड टेम्प्लेट मध्ये असेल तर त्यामध्ये showaddelement=’no’ च्या ऐवजी showaddelement=’yes’ असे लिहा.


<div id='crosscol-wrapper' style='text-align:center'>
<b:section class='crosscol' id='crosscol' showaddelement='no'/>
</div>

६. जर सर्च करुन वरील कोड टेम्प्लेट मध्ये मिळाला नाही तर <div id=’content-wrapper’>

असे सर्च करा.
७. <div id=’content-wrapper’> नंतर लगेचच खालील कोड चिकटवा. व टेम्प्लेट सेव्ह करा.


<div id='crosscol-wrapper' style='text-align:center'>          <b:section class='crosscol' id='crosscol' showaddelement='yes'/></div>

. आता Layout > Page Element मध्ये जाउन नविन Page Gadget जोडा. आणि पुन्हा Postings > Edit Pages मध्ये जाउन नविन पेजेस बनवा.


(टीप - ही युक्ती मी दोन वेगवेगळ्या टेम्प्लेट्सवर तपासुन पाहिली आहे. मात्र सर्वच टेम्प्लेट्ससाठी ही युक्ती उपयोगी ठरेलच असे नाही)
लगेचच स्टॅटीक पेजेस वापरुन पहा आणि आपल्या ब्लॉगर ब्लॉगला एक प्रोफेशनल लुक द्या. 



Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.


0 comments:

Post a Comment