300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Tuesday, 26 January 2010

Tagged under:

विमा पॉलिसी व्यतीरीक्त कर वाचवण्याचे आणखी उपाय तुम्हाला माहित आहेत का? भाग 2


मित्रांनो कालच्या लेखात आपण विम्याव्यतीरीक्त करबचतीसाठी उपयोगी ठरणार्‍या काही योजनांची माहिती घेतली. त्या सर्व योजना या सरकारद्वारे नियंत्रीत असणार्‍या होत्या आणि त्यामुळेच त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जोखिम नसते. आज या लेखात आपण आणखी काही योजना पाहुयात. आज आपण ज्या योजना पाहणार आहोत त्या योजना गुंतविलेल्या रक्कमेवर अधिक परतावा देतात मात्र या योजनामंध्ये जोखीम देखिल जास्त असते.


1. Equity linked savings scheme - (ELSS)


जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर जास्त फायदा मिळवायचा असेल तर थोडी जोखीम घ्यावी लागतेच. म्हणतात ना, No pain No gain.
ELSS या योजनेअंतर्गत गुंतवलेले पैसे हे म्युच्युअल फंडांद्वारे शेअर बाजारात गुंतवले जातात. एकदा पैसे गुंतवल्यानंतर तीन वर्षांसाठी यामध्ये पैसे गुंतुन राहतात यालाच Locking period असे म्हणतात. तीन वर्षे पैसे अडकुन पडत असले तरीही दीर्घ मुदतीनंतर मिळालेल्या नफ्यावर अतीरीक्त कर बसत नसल्याने या योजना फायदेशीरच ठरतात.
ELSS मध्ये पैसे एकत्र एकरकमी गुंतवता येतात किंवा दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवता येते. यालाच Systematic Investment Plan म्हणजे SIP असे म्हणतात.
ELSS योजनांनी गेल्या तीन वर्षांमध्ये सरासरी ८% व गेल्या पाच वर्षांमध्ये सरासरी २२% इतका परतावा दीलेला आहे. ज्यांची रीस्क घेण्याची व तीन वर्षांहुन अधिक काळ थांबण्याची तयारी आहे अशा गुंतवणुकदारांसाठी ही एक आदर्श योजना आहे.


2. Unit linked Insurance Plan (ULIP) -


जीवनवीमा आणि शेअरबाजारात गुंतवणुक या दोघांचे मिश्रण म्हणजे ULIP योजना असे म्हणता येईल. ULIP मध्ये आपण विम्याचा हप्ता (Premium) भरतो तशाच प्रकारे दरमहा एक ठराविक रक्कम पाच वर्षांपर्यंत भरावी लागते. आपण भरलेल्या रकमेपैकी काही भाग हा जीवन विमा संरक्षणासाठी वापरला जातो आणि काही भाग आपल्यावतीने शेअरबाजारात गुंतवला जातो. शेअरबाजारातुन मिळणार्‍या नफ्यापैकी काही भाग ULIP विकणार्‍या कंपन्या स्वतःकडे ठेवतात आणि उरलेला भाग गुंतवणुकदाराला परत देतात.
दीर्घ मुदतीकरता म्हणजे साधारण ९-१० वर्षांकरीता ULIP योजना फायदेशीर ठरतात.
मात्र किती पैसे विम्यासाठी वापरले जातात आणि कीती शेअरबाजारात तसेच शेअरबाजारात गुंतवलेल्या रकमेचा वापर कसा केला जातो, फायदा झाला की तोटा आणि किती? ही माहिती अजुनही फारशा पारदर्शकपणे गुंतवणुकदारांसमोर मांडली जात नाही. यामुळेच मी ULIP खरेदी करण्याचा सल्ला वाचकांना देणार नाही.
ULIP विकणार्‍या एजंट्सना मात्र सर्वाधिक कमीशन ULIP मधुनच मिळत असते त्यामुळे ते जास्तीत जास्त ULIP विकण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणुनच कोणत्याही एजंटवर विष्वासुन ULIP योजना घेण्याआधी स्वतः सखोल अभ्यास करुन नंतरच योग्य तो पर्याय निवडा.


3. New Pension Scheme (NPS) -


NPS ही एक नविन योजना आहे. ज्यांना EPF (Employee Provident Fund) ची सुविधा नसेल म्हणजेच नोकरी न करणार्‍या (स्वतःचा व्यवसाय असणार्‍या) व्यक्तींसाठी ही योजना उपयोगी ठरते. व्यवसयीकांनी आपल्या भविष्यासाठी आताच निवृत्तीवेतनाची सोय करण्यासाठी या योजनेचा वापर करावा.
जास्तीत जास्त १००००० पर्यंतची गुंतवणुक NPS मध्ये करता येते.


4. मुलांच्या शाळेची फी -


आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी केलेल्या खर्चावर सरकारतर्फे करसवलत देण्यात येते. जास्तीत जास्त दोन मुलांसाठी भरण्यात आलेल्या शाळेच्या फी वर करसवलत मिळते. मात्र सदर फी धनादेशाद्वारे भरणे आणि पावती जपुन ठेवणे गरजेचे आहे.


5. गृहकर्जामधील मुद्द्ल -


स्वतःचे घर विकत घेताना जर गृहकर्ज घेतले असेल तर त्यापैकी मुद्दल (जास्तीत जास्त १००००० पर्यंत) करपात्र उत्पन्नातुन वजा केली जाते. गृहकर्ज पती किंवा पत्नीसोबत भागीदारीत घेतले असेल तर दोघेही प्रत्येकी रुपये १००००० पर्यंत करसवलत प्राप्त करु शकतात.


Image Credits

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.


0 comments:

Post a Comment