कंप्युटरवरील वॉलपेपर्स सतत बदलणे आणि वेगवेगळ्या थीम्स आणि वॉलपेपर्सने कंप्युटरला सजवणे तुम्हाला आवडत असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला एका अशा साइटबद्दल सांगणार आहे जिथे हजारो वॉलपेपर्स मोफत उपलब्ध आहेत.
या साईटचे नाव आहे Interfacelift.com (ईंटरफेसलिफ्ट.कॉम). या साईटवर विंडोज, मॅक आणि लिनक्ससाठी भरपुर थीम्स आणि वॉलपेपर्स उपलब्ध आहेत. इम्टरफेसलिफ्ट.कॉम वर २०२५ वॉलपेपर्स आहेत आणि या साईटवर दररोज नविन वॉलपेपर्स अपलोड होत असतात. इम्टरफेसलिफ्ट मधील वॉलपेपर्स रंग, रीजोल्युशन, आर्टीस्ट, टग आणि थीम अनुसार सर्च करता येतात.
तसेच वरील सर्व प्रकारांनुसार सॉर्ट करुन पाहता येतात. iphone आणि iPod touch साठी Interfacelift.com मोबाइल स्वरुपात देखिल उपलब्ध आहे.
नक्कीच बुकमार्क करुन ठेवण्यासारखी आणि परत परत भेट देण्यासारखी ही वेबसाईट आहे.
Visit - www.interfacelift.com
0 comments:
Post a Comment