300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Sunday, 6 December 2009

Tagged under: , ,

How to make good presentations.


बिझनेस प्रेझेंटेशन्स हा आजच्या कॉर्पोरेट जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मीटींग्ज, कॉन्फरन्सेस, सेल्स कॉल्स यासाठी प्रेझेंटेशनची आवश्यकता भासते. एक चांगलं प्रेझेंटेशन (मी याला गमतीने प्रेझेंटेंशन (Presentention) म्हणतो :-) करण्यासाठी फक्त एक चांगला वक्ता असणे इतकेच आवश्यक नसते तर प्रेझेंटेशनचा मजकुर आणि मांडणी देखिल तितकीच आवश्यक असते.

आजच्या या लेखामध्ये मी चांगले पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन कसे असावे याबद्दल काही टीप्स देणार आहे. वाचकांना या टीप्स आवडतील आणि उपयुक्त ठरतील अशी आशा वाटते.

यशस्वी प्रेझेंटेशनसाठी काही टीप्स -

१. प्रेझेंटेशन बनवण्याआधी योजनाबद्धरीत्या पुर्ण flow म्हणजेच सुरुवात कशी असावा, मजकुर कसा व किती असावा आणि शेवट कसा असावा याचा आराखडा मनात तयार करुन घ्या.
२. प्रेझेंटेशनच्या विषयाबद्दल जास्तीत जास्त माहीती मिळवा. प्रेझेंटेशन देताना वक्त्यास विषयाचे अद्ययावत ज्ञान असणे आवश्यक असते.
३. प्रेझेंटेशन देताना श्रोत्यांबद्दल जास्तीत जास्त माहीती करुन घ्या. श्रोत्यांचे किंवा त्यांमधील जास्तीत जास्त लोकांचे कामाचे स्वरुप आणि प्रेझेंटेशनच्या विषयाशी असणारा संबंध लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
४. सावकाश पण विश्वासाने बोला.
५. जास्तीत जास्त मजकुर श्रोत्यांपुढे ठेवण्यासाठी घाईघाईने बोलु नका.
६. बोलताना आपल्या विषयाची आवड, व्यासंग आणि उत्साह दीसु द्यात.
७. सराव करा. प्रत्येक स्लाइड बरोबर काय आणि कितीवेळ बोलायचे याचा चांगला सराव करणे आवश्यक आहे. (लक्षात ठेवा - सराव करा, पाठंतर नव्हे !). यामुळे एकुण प्रेझेंटेशनसाठी किती वेळ लागेल याचा देखिल अंदाज येइल.


पॉवरपॉईंट स्लाईड्स -

१. पहील्या स्लाइडवर वक्त्याचे नाव, प्रेझेंटेशनचा विषय आणि तारिख लिहावी.
२. पॉवरपॉइंट प्रेझेम्टेशनसाठी अनेक टेम्प्लेट्स दीलेल्या असतात. त्यांचा वापर करावा. त्यामुळे फाँट, रंग आणि आकार यांमध्ये सुसंगती राहते.
३. मोजक्याच पण प्रभावी रंगांचा वापर करा. दोन पेक्षा जास्त रंगांचा वापर आणि अक्षरांना लाल रंग टाळा.
४. स्लाइड्सची संख्या उगाचच वाढवु नका. दर मिनीटाला १.५ ते २ स्लाईड्स हा नियम लक्षात असुद्या.
५. अ‍ॅनीमेशन आणि इतर इफेक्ट्सचा वापर करा मात्र अतीशयोक्ती नको.
६. मोजकीच पण बोलकी आणि सुसंगत चित्रं , क्लिप आर्टस वापरा. प्रत्येक स्लाईडवर चित्र असलेच पाहीजे असे नाही.


प्रेझेंटेशनमधील मजकुरासंबंधी थोडंसं -

१. शक्यतो एका ओळीवर सात पेक्षा अधिक शब्द नसावेत.
२. एका स्लाईडवर सात पेक्षा अधिक ओळी नसाव्यात.
३. स्लाईडवर पुर्ण वाक्य न लिहिता महत्त्वाचे मुद्दे लिहा.
४. उगाचच लांब वाक्ये लिहु नका.
५. फाँट साइ़ज १८ ते ४८ पाँईंट्सच्या मध्ये असावी. मुख्य मुद्दे इतर मजकुरापेक्षा मोठ्या फाँट मध्ये दाखवावेत.
६. सोपे आणि सहज वाचता येण्यासारखे फॉंट्स वापरावेत. वेगवेगळ्या डीझाइनर फॉंट्सचा वापर करु नये.
७. संक्षीप्त स्वरुपातील शब्द वापरु नका. तसेच पुर्ण वाक्य कॅपीटलमध्ये लिहु नका.
८. स्पेलींगच्या चुका शोधुन त्या सुधारा. प्रुफरीडींग करायला विसरु नका.

प्रेझेंटेशनचा शेवट -
१. शेवटी सर्व स्लाइड्सचे सिहांवलोकन करा. आणि निष्कर्ष मांडा. श्रोते नेहमी अखेरचे शब्द लक्षात ठेवतात.
२. श्रोत्यांना काही प्रश्न आहेत का ते विचारा आणि सर्वतोपरी शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करा.
चांगल्या प्रेझेंटेशनच्या टीप्स देणारे हे काही व्हीडीओ आणि स्लाइडशो येथे वाचकांसाठी देत आहे.









Image Credits


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment