300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Tuesday, 8 December 2009

Tagged under: ,

Access Microsoft outlook e-mails anytime, anywhere.

बर्‍याचवेळा असे होते की आपण ऑफीसमध्ये नसताना ऑफीसमधील आपल्या मायक्रोसॉफ्ट आउटलुक अकाउंटवरील इमेलची आवश्यकता भासते. अशा वेळेस एखादे अतीशय महत्वाचे काम अडुन राहते. (अर्थात ब्लॅकबेरी किंवा इतर स्मार्टफोन्समुळे हा प्रश्न आता सुटला आहे). आज मी याच अडचणीवर एक तोडगा सांगणार आहे. मायक्रोसॉफ्ट आउटलुक अकाउंटची हुबेहुब कॉपी जीमेलवर कशी उतरवायची याबद्दल आज मी माहीती देणार आहे.


या युक्तीमुळे दोन फायदे होतात -

१. इंटरनेटवरील Gmail अकाउंटच्या सहाय्याने केव्हाही MS outlook वरील ईमेल्स पाहता येतील.
२. MS outlook चा पुर्णपणे बॅकअप आपोआप घेतला जाइल. त्यामुळे संगणक खराब झाल्या तरीही ईमेल्स हरवायची चिंता नाही.

(नेटभेटवरील इतर लेखांच्या तुलनेत आजचा लेख थोडासा जास्त टेक्निकल आणि मोठा असेल, मात्र काळजी करु नका. वाचकांसाठी जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने विवरण करण्याचा मी येथे प्रयत्न केलेला आहे.)

या लेखाचे दोन मुख्य भाग करुयात. पहीला म्हणजे MS outlook वर आलेल्या ईमेल्स आपोआप Gmail वर वळत्या करण्याचा भाग. आणि दुसरा म्हणजे MS outlook वरुन पाठवीलेल्या सर्व ईमेल्सची एक प्रत आपोआप Gmail वर पाठविण्याचा भाग.

MS outlook वर आलेल्या ईमेल्स आपोआप Gmail वर वळत्या करण्यासाठी -

१. MS outlook अकाउंट उघडून त्यामध्ये Tools > Rules wizard येथे क्लिक करा. (काही ठीकाणी Create Rules and alerts असे दीसेल)

२. खाली चित्रात दाखवील्याप्रमाणे New वर क्लिक करा.

३. Check messages when they arrive हा पर्याय सीलेक्ट करुन पुन्हा Next वर क्लिक करा.

४. where my name is in the To or CC box हा पर्याय निवडा आणि Next वर क्लिक करा.

५. चित्रात दाखवील्याप्रमाणे forward it to people or distribution list हा पर्याय असलेला चेकबॉक्स सीलेक्ट करा. आता खाली people or distribution list ची लिंक दीसेल त्यावर क्लिक करा.


६. काँटॅक्ट लिस्ट मधुन तुमचा जीमेल पत्ता (मी उदाहरणात Netbhet चा पत्ता दीला आहे) निवडा आणि To या बटणावर क्लिक करा.

७. जर तुमचा जीमेल पत्ता काँटॅक्ट लिस्ट मध्ये नसेल तर चित्रात दाखवील्याप्रमाणे New contact वर क्लिक करा.

८. आता नविन उघडलेल्या विंडो मध्ये आवश्यक ती माहीती देउन आधी Add आणि नंतर OK वर क्लिक करा.

९. आता तुम्ही पुन्हा Rules wizard मध्ये वळवले जाल (चित्र पहा). चित्रात दाखवील्याप्रमाणे आता ईमेल्स कोणत्या पत्त्यावर पाठवायच्या हे दीसेल. Next बटणावर क्लिक करा.

१०. Add any exceptions अशी विंडो दीसेल. कुठेही क्लिक न करता Next बटणावर क्लिक करा.

११. तुम्ही नुकताच बनवीलेल्या या रुलला नाव द्या. मी येथे Auto forward to Gmail acct असे नाव दीलेले आहे. यापुर्वी आलेल्या सर्व ईमेल्स देखील तुम्ही Gmail वर फॉरवर्ड करु शकता त्यासाठी Run this rule on messages already in inbox हा चेकबॉक्स निवडु शकता. (शक्यतो हा पर्याय निवडु नका, कारण पुर्ण इनबॉक्स फॉरवर्ड करायसाठी बराच वेळ लागेल.)

१२. Turn on this rule हा चेकबॉक्स सीलेक्ट करुन Finish बटणावर क्लिक करा.

१३. Rules wizard मध्ये Ok बटण क्लिक करा.


आता तुम्ही यशस्वीरीत्या हा नियम बनवला आहे. येथुन पुढे तुमच्या MS Outlook अकाऊंट वरील सर्व ईमेल्सची एक प्रत आपोआप Gmail च्या पत्त्यावर पाठवीली जाइल.

MS outlook वरुन पाठवीलेल्या ईमेलची एक प्रत Gmail वर पाठवीण्यासाठी -

१. Tools > Macro > Visual Basic Editor वर क्लिक करा. (शॉर्टकट - Alt +F11)

२. चित्रात दाखवील्याप्रमाणे This outlook session वर क्लिक करा.

३. खालील कोड चित्रात दाखवीलेल्या ठीकाणी चिकटवा. (Copy and Paste)

Private Sub Application_ItemSend(ByVal Item As Object, _
Cancel As
Boolean)
Dim objRecip As Recipient
Dim strMsg As String
Dim res As
Integer
Dim strBcc As String
On Error Resume Next

' #### USER
OPTIONS ####
' address for Bcc -- must be SMTP address or resolvable
'
to a name in the address book
strBcc = "abc@gmail.com"

Set objRecip
= Item.Recipients.Add(strBcc)
objRecip.Type = olBCC
If Not
objRecip.Resolve Then
strMsg = "Could not resolve the Bcc recipient. " &
_
"Do you want still to send the message?"
res = MsgBox(strMsg, vbYesNo
+ vbDefaultButton1, _
"Could Not Resolve Bcc Recipient")
If res = vbNo
Then
Cancel = True
End If
End If

Set objRecip = Nothing
End Sub


४. या कोड मध्ये abc@gmail.com या पत्त्याच्या जागी तुमचा जीमेल पत्ता द्यायला विसरु नका.
५. आता हा कोड सेव्ह करा.

यापुढे तुम्ही पाठवीलेली प्रत्येक ईमेलची एक प्रत जीमेल अकाउंटवर Bcc मध्ये पाठवीली जाईल. म्हणजेच Gmail पत्त्यावर एक प्रत गेल्याचे कोणालाही कळणार नाही.

वर दील्याप्रमाणे कृती करण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

१. ऑफीस मधील ईमेल्स कोणत्याही पर्सनल ईमेल अकाऊंटवर पाठवणे हे नियमबाह्य आहे.
सदर युक्ती वापरण्यासंबंधी Administrator ची परवानगी घेतलेली चांगली.
२. सदर युक्ती ही मायक्रोसॉफ्ट आउटलुक २००३ साठी देण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्ट आऊटलुक च्या इतर प्रोग्राम्समध्ये ही युक्ती मी Test केलेली नाही.
३. या पद्धतीने ईमेल्स कोणत्याही ईमेल आयडीवर पाठवता येतात. मी फक्त उदाहरणादाखल Gmail वापरले आहे.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment