काल आपण जीमेल सर्चसाठी उपयुक्त असे काही सर्च ऑपरेटर्स पाहीले. आज या लेखाच्या दुसर्या भागात आपण आणखी काही सर्च ऑपरेटर्सची ओळख करुन घेउया.
ऑपरेटर - "filename:"
व्याख्या - ईमेल मधील अॅटॅचमेंट्चे नाव किंवा फाईल प्रकाराच्या आधारे ई-मेल शोधण्यासाठी filename: या ऑपरेटरचा वापर केला जातो.
उदाहरण १ - filename:salil.xls
स्पष्टीकरण - "salil.xls" या नावाची अटॅचमेंट फाइल असलेल्या ई-मेल्स शोधा.
उदाहरण २ - label:netbhet filename:pdf
स्पष्टीकरण - netbhet लेबल असलेल्या ई-मेल्स मधील PDF प्रकारची अटॅचमेंट फाइल असलेल्या ई-मेल्स शोधा.
ऑपरेटर - After: , before:
व्याख्या - दीलेल्या तारखेनंतर किंवा आधी आलेल्या ई-मेल्स शोधण्यासाठी After: , before: या ऑपरेटर्सचा वापर करतात (तारीख yyyy/mm/dd या फॉर्मॅटमध्ये असणे आवश्यक)उदाहरण - after:2008/04/15 before:2008/04/21
स्पष्टीकरण - 15 April 2008 ते 21 April 2008 या॑ दरम्यान आलेल्या ई-मेल्स शोधा.
ऑपरेटर - " " (quotes)
व्याख्या - एक विशीष्ट शब्द्समुह किंवा वाक्याशी तंतोतंत्त जुळणारा मजकुर असलेल्या इमेल्सचा शोध करण्याकरीता " " या ऑपरेटरचा वापर करतात.
उदाहरण १ - "Hi, welcome to netbhet"
स्पष्टीकरण - "Hi, welcome to netbhet" असे वाक्य असलेल्या सर्व ई-मेल्स शोधा
ऑपरेटर - in:inbox , in:trash , in:spam
व्याख्या - Inbox, Trash, आणि Spam या फोल्डरमधील ई-मेल्स शोधण्यासाठी in: या ऑपरेटरचा वापर करता येतो.
उदाहरण - in:trash from:salil
स्पष्टीकरण - सलिल कडून आलेल्या आणि Trash फोल्डरमध्ये असलेल्या ईमेल्स शोधा.
या ऑपरेटर्सचा वापर करुन अडगळीत पडलेल्या कोणत्याही जुन्या ई-मेलला शोधुन काढणे सोपे होइल. थँक यु गुगल अंकल !

0 comments:
Post a Comment