जीमेलने नुकताच भारतीय ई-मेल सर्वीसेसमध्ये पहीला क्रमांक पटकावला हे मी मागील एका लेखामध्ये लिहीले होते. जीमेल आता इतकी अंगवळणी पडली आहे की दुसरी कोणतीही ई-मेल सर्वीस वापरावीशीच वाटत नाही. जीमेल मध्ये मिळणार्या अनेक सुविधा, भरपुर स्पेस, ई-मेल मध्येच चॅटींग करण्याची सुविधा अनेक गोष्टींमुळे जीमेल सर्वांचेच आवडते झाले आहे. साहजीकच आपले बरेचसे ईपत्र-व्यवहार (Email communications) जीमेलशिवाय पुर्ण होतच नाहीत. भरपुर ई-मेल्सने भरलेल्या आपल्या जीमेल अकाउंट मध्ये हवी असलेली नेमकीच इ-मेल कशी शोधावी याबद्दल आज आपण माहीती करुन घेउ.
गुगल काकांनी जीमेल मध्ये सर्च करण्यासाठी काही सर्च ऑपरेटर्स देउ केले आहेत. या सर्च ऑपरेटर्सच्या सहाय्याने जीमेल अकाउंट मधील कोणतीही ईमेल अगदी सहजगत्या शोधता येते.
ऑपरेटर - " from:"
व्याख्या - इमेल पाठवणार्या व्यक्तीच्या नावावरुन सर्च करायचे असल्यास from: हा ऑपरेटर वापरावा.
उदाहरण - from:salil
स्पष्टीकरण - सलिल कडुन आलेले सर्व मेसेज शोधा
ऑपरेटर - " to:"
व्याख्या - इमेल ज्या व्यक्तीला पाठवीलेली आहे त्या व्यक्तीच्या नावावरुन सर्च करायचे असल्यास to: हा ऑपरेटर वापरावा
उदाहरण - to:salil
स्पष्टीकरण - सलिलला पाठवीलेले सर्व मेसेज शोधा
ऑपरेटर -"subject:"
व्याख्या - इमेलच्या विषयामधील एखाद्या शब्दावरुन ईमेलचा शोध घ्यायचा असल्यास subject: हा ऑपरेटर वापरावा.
उदाहरण - subject:netbhet
स्पष्टीकरण - ज्या इमेलच्या विषयामध्ये "नेटभेट" हा शब्द आला आहे अशा इमेल्स शोधा
ऑपरेटर -"has:attachment"
व्याख्या - ज्या ईमेल्ससोबत अटॅचमेंट्स असतील अशा फाईल अशा फाईल्स शोधण्यासाठी has:attachment या ऑपरेटरचा वापर करता येतो.
उदाहरण - from:salil has:attachment
स्पष्टीकरण - सलिल कडून आलेल्या आणि फाइल्स अॅटॅचड असलेल्या ईमेल्स शोधा.
या ऑपरेटर्सचा वापर करुन अडगळीत पडलेल्या कोणत्याही जुन्या ई-मेलला शोधुन काढणे सोपे होइल. थँक यु गुगल अंकल !

0 comments:
Post a Comment