Youtubesnips च्या सहाय्याने युट्युब वरुन व्हीडीओ डाउनलोड कसे करायचे ते मी आपल्याला मागे एका लेखामध्ये सांगीतले होतेच. ईंटरनेट जगतामधील युट्युब ही सर्वात मोठी व्हीडीओ बेस्ड साईट असली तरी त्या व्यतीरीक्त इतरही अनेक उपयुक्त आणि चांगल्या व्हीडीओ वेबसाईट्स उपलब्ध आहेत. आजच्या या लेखामध्ये आपण अशा एका वेबसाईट बद्दल माहीती करुन घेणार आहोत ज्या साइटच्या मदतीने फक्त युट्युबच नव्हे तर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या कोणत्याही वेबसाईटवरुन व्हीडीओ डाउनलोड करता येतात. आणि ते देखील पुर्णपणे "चकटफु" (मोफत)
Youtube, facebook, metacafe, megavideo अशा एकाहुन एका सरस वेबसाईट वरुन मोफत व्हीडीओ डाउनलोड करुन देणार्या या वेबसाईटचे नाव आहे "क्लिपनॅबर clipnabber".
clipnabber कसे वापरावे?
Youtube, facebook, metacafe, megavideo अशा एकाहुन एका सरस वेबसाईट वरुन मोफत व्हीडीओ डाउनलोड करुन देणार्या या वेबसाईटचे नाव आहे "क्लिपनॅबर clipnabber".
clipnabber कसे वापरावे?
- जो व्हीडीओ डाउनलोड करायचा आहे त्याची URL कॉपी करुन क्लिपनॅबरच्या होमपेजवर (बाण क्रमांक 1) चिकटवा.
- आणि Nab Video या बटणावर क्लिक करा. .
- काही क्षणातच तुम्ही दीलेल्या व्हीडीओची डाउनलोड लिंक प्रकट होइल.
- या लिंकवर (बाण क्रमांक २) राईट क्लिक करुन "Download linked file as" किंवा "Save link as" वर क्लिक करा.
- आता व्हीडीओचे डाउनलोड सुरु होइल.
Clipnabber ला भेट द्या - http://www.clipnabber.com/
क्लिपनॅबर अवश्य वापरुन पहा आणि कसे वाटले ते कळवण्यास विसरु नका.
0 comments:
Post a Comment