काय? लेखाचं नाव वाचुन उत्सुकता चाळवली ना? नाही! नाही! मी काही "ब्रेकींग न्युज" वैगरे नाही देत आहे. मी आपला नेहमी प्रमाणेच एका मजेशीर वेबसाईटची माहीती देत आहे. :-)
याआधी आपण आपल्या फोटोजना वगवेगळे ईफेक्ट्स देणार्या फोटोफुनीया या एका मजेशीर वेबसाईटची माहीती घेतली होती. त्याच सारखी आणखी एक वेबसाईट म्हणजे मॉर्फथिंग (Morph Thing).
नावात लिहिल्याप्रमाणे ही वेबसाइट २ किंवा अधिक चेहर्यांची मॉर्फींग करुन एक तीसराच चेहरा बनवते. मॉर्फथिंग मध्ये स्वतःचा चेहरा एखाद्या सेलीब्रेटीच्या चेहर्यात मिसळुन तीसराच चेहरा बनवता येतो किंवा दोन सेलीब्रेटीजच्या चेहर्यांपासुन एक तीसरा चेहरा बनवता येतो.
एवढेच नव्हे तर तुम्ही बनवीलेला मॉर्फ्ड चेहरा वेबपेजवर, ब्लॉगवर किंवा फोरमवर दाखवण्याची सोयही येथे आहे. त्यासाठी नविन बनवलेल्या चेहरर्याचा embed code आणि URL दीली जाते.
मॉर्फथिंगला फार सीरीयसली घेउ नका. ही साईट म्हणजे केवळ एक गंमत आहे. फोटो अपलोड करा आणि काही क्लिक्समध्येच बघा कशी जादु होते ते !
मॉर्फथींगवर मी केलेल्या या काही करामती पहा :-)
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांचे मुल (मुलगा कि मुलगी ? ते तुम्हीच ठरवा !)
हीटलर आणि अल्बर्ट आईनस्टाईन यांची मॉर्फींग
हॉलीवुडचे सीनेस्टार स्कार्लेट जॉन्सन आणि ब्रॅड पीट यांचे मुल.
Visit - http://www.morphthing.com/
0 comments:
Post a Comment