कला आणि क्रीएटीव्हीटी या दोन गोष्टींचा मी निस्सीम चाहता आहे. सतत या विषयांशी संबंधीत गोष्टी शोधण्यात, वाचण्यात, पाहण्यात मी रममाण होत असतो. आणि रुढ कलाप्रकारांपेक्षा काही नविन हटके काम बघायला मिळाले तर माझा रसग्रहणाचा आनंद दुणावतो. असंच काहीसं आज एका वेबसाईटवर पहायला मिळाले. निक व्हेसी नावाच्या एका आर्टीस्टची ही वेबसाईट आहे.
या पठ्ठ्याने अनेक कलाविष्कार साकारले आहेत पण एका वेगळ्याच माध्यमाद्वारे ! हे माध्यम आहे एक्स-रे चं. होय एक्स्-रे (X-ray).
आपल्या रोजच्या वापरातल्या साध्या साध्या गोष्टींचे त्याने कलात्मक एक्स्-रे काढले आहेत. त्याचे हे काम आपण http://www.nickveasey.com/ या वेबसाईटवर पाहु शकता.
नीक व्हेसीची वेबसाईट आणि त्याचे काम कसे वाटले ते सांगायला विसरु नका.






0 comments:
Post a Comment