300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Wednesday, 16 September 2009

Tagged under:

Real time search in Google

[ MARATHI ].......

सध्या इंटरनेट जगतात एक गोष्ट सर्वाधिक गाजतेय ती म्हणजे ट्वीटर्.कॉम. मायक्रो ब्लॉगींग चा पर्याय उपलब्ध करुन देणारी ट्वीटर्.कॉम अल्पावधीतच फेमस झाली आहे. इतकी फेमस की निवडणुकांच्या काळात बराक ओबामा यांनी ट्वीटर भरपुर वापरल्यानेच त्यांना आपला संदेश सर्वत्र परीणामकारकरीत्या पोहोचवता आला असे जाणकारांचे मत आहे. ट्वीटर इतके फेमस झाले आहे की खुद्द गुगलने देखील ट्वीटर अकाउंट उघडले आहे.

असो, आजचा आपला विषय ट्वीटर बद्दलचा नाही.(ट्वीटर बद्दल अधिक माहीती नंतर एका सविस्तर लेखामध्ये देइन.) आजचा विषय आहे रीअल टाइम सर्चचा. हा प्रकार आधीपासुन अस्तीत्वात होताच पण ट्वीटर मू़ळे प्रकाशात आला. ट्वीटर वर जगभर अनेक माणसे अनेक विषयांच्या चर्चा करत असतात. सहाजिकच यापैकी बरेचसे विषय हे चालु घडामोडी किंवा आजुअबाजुला घडत असलेल्या प्रकरणांबद्दल असतात.!मोबाइल वरुन ट्वीटींग करता येत असल्यामुळे कोणतीही माहीती त्वरीत ट्वीट करणे सहज शक्य होते. (मध्यंतरी झालेल्या एका विमान अपघाताची बातमी म्हणे सर्वात आधी ट्वीटर वर प्रसिद्ध झाली होती!)

त्यामुळेच ट्वीटर वर घेतलेला शोध (सर्च) हा सर्वाधिक "रीअल टाइम" असतो. रीअल टाइम सर्च म्हणजे इंटरनेटवर नुकताच अगदी काही मिनिटांपुर्वी प्रकाशित झालेल्या मजकुराचा शोध. उदाहरणार्थ जर "इंडीया श्रीलंका मॅच" असे टाइप केले तर ट्वीटर वर नुकताच ज्या व्यक्तीने मॅचबद्दल ट्वीट केले असेल ते दीसेल आणि गुगलवर "इंडीया श्रीलंका मॅच" हे शब्द ज्या लेखांमध्ये आले असतील त्यांची यादी समोर येइल. एखाद्या जास्त रेटींग असलेल्या साईट वर "इंडीया श्रीलंका मॅच" हे शब्द आलेला लेख ४-५ वर्षे जुना असला तरी गुगलवर तो लेख पहील्या क्रमांकावर दीसेल.

ट्वीटरने रीअल टाइम सर्चची ताकद दाखवुन दील्यामुळे अचानक ट्वीटर म्हणजे गुगल सर्चला पर्याय असे चित्र रंगवण्यात येउ लागले. पण मागे राहते ती गुगल कसली. गुगलने नुकताच आपल्या सर्चेस मध्ये रीअल टाइम सर्चचा अंतर्भाव केला आहे.

आता आपण पाहुया गुगलवर रीअल टाइम सर्च कसे वापरावे ते?

१. गुगल.कॉमवर नेहमीप्रमाणे आवश्यक तो शब्द सर्च करा.

२. सर्च रीझल्ट्स गुगलच्या पानावर दीसु लागतील. त्याचबरोबर डाव्या बाजुला वर Show options चा पर्याय दीसेल. त्यावर क्लिक करा.


३. येथे वेळेनुसार सर्च करण्याचे सहा पर्याय दीसतील.

  • Anytime - म्हणजे सर्च रीझल्ट्सना कोणतेही वेळेचे बंधन नाही.
  • Recent results - इंटरनेटवर नुकताच प्रकाशित झालेल्या पानांमधुन शोधलेले रीझल्ट्स
  • Past 24 hours - गेल्या २४ तासांतील रीझल्ट्स
  • Past week - गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेले रीझल्ट्स
  • Past year - गेल्या वर्षभरात प्रकाशित झालेले रीझल्ट्स
  • Specific date range - कोणत्याही दोन तारखांच्या मध्ये प्रकाशित झालेल्या मजकुरातील रीझल्ट्स

मग आता गुगलच्या सहाय्याने रीअल टाइम सर्च करा आणि रहा अगदी "रीअल टाइम" अपडेटेड !

Image source


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment