वोलफ्रामअल्फा.कॉम या वेबसाईटची माहीती देताना त्याच लेखामध्ये गुगल काका इंटरनेट जगतावर कसे सत्तारुढ झाले आहेत याबद्दलही आपण चर्चा केली होती. त्याच अनुशंगाने गुगल.कॉमच्या भारतीय बाजारपेठेतील परफॉर्मन्सचे काही आकडे येथे देत आहे."मार्केट डॉमीनन्स" किंवा "मार्केट लीडर" म्हणजे काय हे या अकडेवारीवरुन स्पष्ट होते.
कॉमस्कोअर.कॉम (comscore.com) या अमेरीकेतील संशोधन संस्थेने केलेल्या परीक्षणातुन ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
एक सर्च इंजिन म्हणुन गुगलची ख्याती जगविख्यात आहेच. याहु, आस्क्.कॉम, विंडोज लाइव्ह सर्च (आता बिंग) या सर्व सर्च इंजिन्स पेक्षा गुगल सर्च वरचढ आहे. भारतामध्ये एकुण वापरल्या जाणार्या सर्च पेजेसमधील ८८% वाटा गुगलचा आहे. आणि वर उल्लेखीलेली सर्व सर्च इंजिन्स मिळुन फक्त १२%.
सोशल नेटवर्कींग - सोशल नेटवर्कींगच्या क्षेत्रात प्रवेश करण्यास गुगलने तसा थोडा उशिर केला. मात्र तरीही ऑर्कुटने भारतीयांच्या मनावर अशी काही जादु केली की हाय्-फाय, लिंक्ड्-इन, फेसबुक सारख्या दीग्गजांना भारतात स्थिरावायची संधीच मिळाली नाही.
मॅप्स (नकाशा) - गुगल मॅप्सने आधीच संपुर्ण पृथ्वी स्कॅन करुन घेतली आहे. आणि आपल्या जगभर पसरलेल्या ग्राहकांकडुनच रस्त्या-रस्त्याची माहीती घेउन ती पुन्हा सर्वांना उपलब्ध करुन दीली आहे. गुगल मॅप्स वापरणं हा माझा सर्वात आवडता छंद आहे. मी असं ऐकलय की याहु मॅप्स हे गुगल पेक्षा सरस अप्लिकेशन आहे मात्र गुगलची जादु अशी काही पसरलीय की दुसरं काहीही चांगले वाटत नाही.
फोटोज - गुगलचे पिकासा आणि याहुचे फ्लिकर्.कॉम हे दोन ऑनलाइन फोटो स्टोरेज साठीचे दीग्गज अप्लिकेशन्स आहेत. त्याचसोबत इतरही अनेक लहान लहान वेबसाईट्स फोटो क्षेत्रात आहेत. जगभर अजुनही flickr.com सर्वात मोठी आहे पण भारतात मात्र पिकासानेच बाजी मारली आहे.पिकासाचं एक सॉफ्टवेअर डाउनलोड देखील करता येते. संगणकातले सर्व फोटोज, इमेजेस एकाच वेळी एकाच ठीकाणी पाहण्यासाठी पिकसाचं हे सॉफ्टवेअर उत्तम आहे. त्याचप्रमाणे फोटो एडीटींग साठी यात अनेक टूल्स आहेत. (http://www.picasaweb.google.com/)
माझे पिकासा आल्बम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ब्लॉग्जच्या क्षेत्रात अटीतटीची लढाई होती खरी. कारण वर्डप्रेस आणि विंडोज लाइव्ह पेजेस या दोनही ब्लॉग सर्वीसने चांगलेच बस्तान बसवले होते. यांना मात देण्यासाठी गुगलने ब्लॉगर्.कॉम ही ब्लॉगसर्वीस देणारी कंपनी विकत घेतली. मात्र तरीही ब्लॉगरला सुधारण्यात गुगलने दहा वर्षे खर्ची घातली. आता मात्र ब्लॉगर्.कॉम भारतात नंबर वन आहे.
युट्युब.कॉम ही मल्टीमेडीया साइट जेव्हा गुगलने विकत घेतली तेव्हा जाणकारांच्या मते ही एक मोठी चुक होती. ऑनलाइन व्हीडीओ साइट्स एवढ्या प्रगत होतील आणि झाल्या तरी त्यातुन फायदा (Profits) मिळवता येइल याची शाश्वती नव्हती. मात्र गुगलचा परीसस्पर्ष झाला आणि ऑनलाइन मल्टीमेडीया साईट्सची कायाच पालटुन गेली.
Email क्षेत्रातही गुगल तशी नवीनच आहे. केवळ पाच वर्षांपुर्वीच गुगलने इमेल क्षेत्रात पाउल टाकले. गुगलने ई-मेल क्षेत्रात जोरदार मुसंडी मारत हॉटमेल, रेडीफ, इंडीयाटाइम्स या सर्वांना मागे टाकलयं. आता भारतात फक्त याहु मेल जीमेलच्या पुढे आहे. आणि मला खात्री आहे की लवकरचं जीमेल या क्षेत्रातही नंबर वन असेल.
या सर्वेमधुन निष्पन्न झालेली आणखीन एक गोष्ट म्हणजे भारतातील एकुण इंटरनेटच्या वापरापैकी ३०% वेळ हा गुगलच्या विविध साइट्स वर व्यतीत केला जातो.म्हणुनच तर मला गुगल काका इतके आवडतात. :-)
0 comments:
Post a Comment