जीमेल व्यतीरीक्त इतर सर्व वेब्-मेल सर्वीसेस आणि मायक्रोसॉफ्टच्या आउटलुक एक्स्प्रेस तसेच मायक्रोसॉफ्ट आउटलुक या इ-मेल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर्स मध्ये "ई-मेल फोल्डर्स" बनवीण्याची सुविधा आहे.
ई-मेल फोल्डर्स म्हणजे एखाद्या विषयाशी किंवा व्यक्तीशी संबंधीत ई-मेल्सचे वगवेगळे फोल्डर्स बनवता येतात. उदाहरणार्थ जर "अ" व्यक्तीकडुन आलेल्या सर्व ई-मेल्स एकाच वेळी एकाच ठीकाणी पहायच्या असतील तर "अ" नावाचा एक फोल्डर बनवुन "अ" ने पाठवीलेल्या सर्व ई-मेल्स त्यामध्ये साठवता येतात. (Drag and drop) तसेच "अ" कडुन येणार्या सर्व ई-मेल्स आपोआप "अ" फोल्डरमध्ये पाठवील्या जातील अशी सोयही करता येते.
जीमेल मध्ये मात्र ही सुविधा नाही. पण जीमेलने फोल्डर्सच्या ऐवजी एक "लेबल्स" ची अधिक उपयुक्त सुविधा दीलेली आहे. आज आपण पाहुया जीमेलमध्ये लेबल्सची ही सुविधा कशी वापरावी ते.
जीमेलने अतीशय विचारपुर्वक लेबल्सची सोय पुरवीलेली आहे. असे करताना जीमेल डेव्हलपर्सनी फोल्डर्स वापरण्यातील उणीवांचा चांगला अभ्यास केला आणि त्यावर उत्तर म्हणुन लेबल्सचा पर्याय उपलब्ध करुन दीला.
फोल्डर्स वापरण्यातील मुख्य अडचणी -
एकदा ई-मेल एखाद्या फोल्डर मध्ये टाकली की मग ती ई-मेल Inbox मध्ये पुन्हा दीसत नाही. बर्याच दिवसांनी जेव्हा ई-मेल सोधावी लागते तेव्हा यामुळे खुप त्रास होतो.
एका ई-मेलला एका फोल्डर मध्येच टाकता येते. जर ई-मेल दोन किंवा अधिक फोल्डर्समध्ये टाकणे शक्य होत नाही.
जीमेल ने या अडचणींवर मात करण्यासाठी लेबल्सचा पर्याय शोधला. यामध्ये वरील दोनही अडचणींवर मात करता येते. ईमेलला फक्त लेबल लावण्यात येते मात्र ई-मेल Inbox मध्येच राहते तसेच एका ई-मेलला एकापेक्षा अधिक लेबल्स लावता येतात.
आता आपण पाहुया लेबल्स कसे वापरावे ते.
१. ज्या ईमेलसाठी लेबल बनवायचे आहे त्या ई-मेल समोरील चौकोनात क्लिक करा.

२. आता वर दीलेल्या मेनुमध्ये Label > Create New वर क्लिक करा.


आता तुम्ही ई-मेलला लेबल दीले आहे. Subject line म्हणजेच ईमेलच्या विषयासमोर हीरव्या रंगात लेबलचे नाव दीसेल. आणि डाव्या बाजुला लेबलचे नाव दीसेल. येथे क्लिक केल्यास ते लेबल असलेले सर्व ई-मेल मेसेज दीसतील.

0 comments:
Post a Comment