[ MARATHI ]....... आज एक वेबसाईट बघीतली आणि एकदम बालपणची आठवण झाली. आपण सर्वांनी कधीतरी लहानपणी 'चांदोबा' वाचले असेलच. ही वेबसाईट चांदोबाचीच आहे. आणि मुख्य म्हणजे नुकताच यात मराठी विभागही चालु करण्यात आला आहे.
चांदोबा, ठकठक, चाचा चौधरी, गोट्या अशी पुस्तके वाचुन आपली एक पुर्ण पीढी घडली आहे. तोच वारसा पुढे चालवण्यासाठी चंदामामा.कॉम ही वेबसाईट आता पुढे सरसावली आहे. चंदामामा.कॉम वर इंग्लीश, हिंदी, तामिळ, कन्नड, मराठी आणि तेलगु या सहा भाषांमधील कॉमीक्स आणि गोष्टी उपलब्ध आहेत.
पौराणिक कथा, सांस्कृतीक, समकालीन, कॉमीक्स, लघुकथा, विज्ञानकथा, महाराष्ट्राची माहीती, महाराष्ट्रातील तसेच जगांतील सणांची माहीती असे अनेक विभाग या वेबसाईट मध्ये पहायला मिळतात.
त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी विविध स्पर्धा(कॉंटेस्टस) येथे घेण्यात येतात. रामायण, महाभारत आणि इतर कथांच्या सीडी आणि पुस्तकांचे संच येथे विकत घेण्याची सोयही केलेली आहे.
मला आवडणारी चांदोबाची खासीयत म्हणजे त्यामधील चित्रे. तशीच बोलकी चित्रे आजही ऑनलाइन चांदोबा मध्ये दीसतात आणि त्यामुळे वाचनाची मजा द्वीगुणीत होते.
लहानपणापासुनच मुलांच्या मनात वाचनसंस्कार रुजवण्यासाठी त्यांना अवश्य चंदामामा.कॉम (candamama.com)ची भेट घालुन द्या.
आणि मित्रहो चंदामामा.कॉम ने आणखी एक छान सोय पुरवीली आहे. प्रत्येकाच्या मनात एक लहान मुल लपलेलं असतं. बालपणात क्षणभर का होइना पण परत जाण्याची संधी आपण सगळेच शोधत असतो. हेच लक्षात घेउन चंदामामाने चांदोबाचे काही जुने अंक (अगदी १९५२ सालापासुनचे) ई-पुस्तकाच्या स्वरुपात उपलब्ध करुन दीले आहेत. जुन्या अंकांतील मजकुरच नव्हे तर चित्रे आणि जाहीराती पाहणे हा देखील एक आगळावेगळा अनुभव आहे.

चांदोमामा.कॉमच्या मराठी आवृत्तीला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच संग्रहीत जुने अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
0 comments:
Post a Comment