300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Sunday 6 October 2013

Tagged under: , , ,

सर्वांसाठी सर्वत्र ईंटरनेट - प्रोजेक्ट लून

ईंटरनेट हा शतकातील सर्वात मोठा शोध आहे यात कोणतीही शंका नाही. ईंटरनेट ने माहितीचा प्रचंड साठा आपल्यासमोर आणला.पुर्ण जग खर्‍या अर्थाने जवळ आणलं. परंतु खरच या शोधाचा फायदा पुर्ण जगाला, जगातील प्रत्येकाला घेता आलाय का ?

दुर्दैवाने याचे उत्तर आजही नाहीच आहे. अजुनही ईंटरनेट जगातील असंख्य लोकांपर्यंत पोहोचलेलाच नाही.आतापर्यंत जगातील फक्त ३०% लोक ईंटरनेट वापरु शकले आहेत.याची कारणे बरीच आहेत. पण मुख्य कारणे आहेत ईंटरनेट्ची न परवडणारी किंमत आणि गावागावात, अनेक दुर्गम भागात ईंटरनेट जोडणी पोहोचवण्यात येणार्‍या अडचणी.

या दोनही अडचणींवर मात करण्याच्या उद्देशाने गुगलने एक नविन अतिमहत्वाकांक्षी प्रोजेक्ट हाती घेतला आहे. या प्रोजेक्टचे नाव आहे प्रोजेक्ट लून (Project loon)

प्रोजेक्ट लून म्हणजे खरंतर प्रोजेक्ट बलूनचा अपभ्रंश आहे. गुगलची या प्रोजेक्टची कल्पना तशी सोपी आहे. गुगलतर्फे अवकाशात अनेक फुगे (Baloons) सोडण्यात येतील. हे सर्व फुगे एकमेकांशी सतत संपर्कात असतील आणि इंटरनेट सिग्नलची देवाणघेवाण करत असतील. जमीनीवर असलेल्या मुख्य इंटरनेट कक्षाशी देखील हे बलून्स जोडलेले असतील. त्यामुळे इंटरनेट जोडणीची एक मोठी साखळीच तयार होईल. आणि प्रत्येक बिल्डींग्/घरामध्ये असलेल्या एका विशीष्ट अ‍ॅंटेनाद्वारे या बलून्स मधून येणारे ईंटरनेट सिग्नल मिळविले जातील. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची केबल न वापरता (कोणतेही खोदकाम न करता !) इंटरनेट कोठेही पोहोचवता येण्याची सोय गुगल करु इच्छीत आहे.





कल्पना जरी सोपी असली तरी ती प्रत्यक्षात उतरवणे महाकठीण काम आहे. तरीही गुगलने हे शिवधनुष्य उचलायचे ठरवले. आणि ही  फक्त एक चांगली कल्पना म्हणून ठेवुन न देता ती काही प्रमाणात प्रत्यक्षात आणण्यात त्यांनी यश मिळविले आहे. सध्या गुगलचे असे ३० बलून्स न्युझीलँड मध्ये प्रायोगीक तत्त्वावर कार्यरत आहेत.

फुगे आणि ते सुद्धा ईंटरनेट जोडणीसाठी ? खरंच ?


होय. खरंच.
हे बलून्स polyethylene plastic चे बनलेले आहेत. १५ मीटर व्यास आणि १२ मीटर उंचीचे हे बलून्स सौर उर्जेवर काम करतील. केवळ हवेतील प्रवाहांच्या सहाय्याने हे फुगे अवकाशात मार्गक्रमण करतील. (कसे ते गुगलने अद्याप गुअलदस्त्यात ठेवले आहे !). जमीनीपासून साधारण २० किलोमीटर अंतरावर ( stratosphere) हे बलून्स फिरत असतील. विमाने साधारण १० किलोमीटर इतक्या अंतरावरुन प्रवास करतात. म्हणजे हे फुगे त्यांच्या दुप्पट अंतरावर असतील. मानवी नजरेला बलून्स दिसणार नाहीत. 

असे बलून्स सध्याच्या ३जी किंवा त्याहून अधीक वेगाचे ईंटरनेट कनेक्शन पोहोचवु शकतात असा गुगलचा दावा आहे.

गुगल बलून्सचा नक्की फायदा काय ?


गुगलच्या मते जगातील दर ३ व्यक्तींपैकी केवळ एका माणसाकडेच परवडणारे आणि विश्वासार्ह ईंटरनेट कनेक्शन आहे. ईंटरनेटच्या असंख्य फायद्यांपासून दूर राहिलेल्या असंख्य लोकांना या प्रोजेक्ट मुळे जोडता येईल.

जगातील अत्यंत दुर्गम भागात कोणतेही खोदकाम न करता कमीत कमी वेळात ईंटरनेट जोडणी पोहोचवणे यामुळे शक्य होणार आहे. लांबच्या लांब Fiber Optics केबल्स आणि त्यासाठीचे खोदकाम आवश्यक नसल्यामुळे अत्यंत कमी खर्चात हे शक्य होणार आहे.

तसेच नैसर्गीक आपतींमध्ये गुगलच्या या सेवेचा खुप फायदा होणार आहे. भुकंप, वादळ, त्सुनामी यांमुळे जेव्हा सर्व उध्वस्त झालेले असेल तेव्हा आकाशातले हे देवदूतच communication चं मुख्य काम करतील.
गुगल बलून्सचा नक्की फायदा काय हे एका जबरदस्त व्हीडीओद्वारे गुगलने दाखविले आहे. मला अत्यंत आवडलेला हा एक अनोखा व्हीडीओ नेटभेटच्या वाचकांसाठी मी येथे देत आहे.



गुगल बलून कसे काम करेल?


प्रत्येक बलूनवर एक सोलार पॅनेल आणि सौर उर्जेवर चालणारे radio transmitters आणि receivers बसविलेले असतील. असे असंख्य बलून्स अवकाशात आपापसात सिग्नलची सतत देवाण घेवाण करतील. तसेच प्रत्येक बलूनवर हवामनाचा अंदाज घेणारी उपकरणे देखिल असतील. यांचा वापर करुन जमिनीवरुनच इच्छीत स्थळी या बलुन्सना हाकता येईल.

प्रत्येक बलून्सवर असलेल्या सोलार पॅनेलमुळे बलून्सना उर्जा मिळेल आणि ते काम करत राहतील. साधारण ६ महिन्यांपर्यंत हे बलून्स काम करतील. त्यानंतर त्यांना जमिनीवर डागडुजीसाठी परत आणण्यात येईल. गुगलने हे सर्व करण्याचे तंत्रज्ञान विकसीत केले आहे असा त्यांचा दावा आहे.

हा व्हीडीओ पाहुन गुगल बलून्स कसे काम करेल याची कल्पना येईल.



गुगल बलून्सच्या अडचणी 


जगासाठी अत्यंत उपकारक असली तरी गुगल बलून्सना अनेक अडचणींना सामोरे जावं लागणार आहे. त्यापैकी पहिली आणि सर्वात मोठी अडचण म्हणजे प्रत्येक देशाचे वेगवेगळे कायदे. गुगलला विविध देशांमधुन त्यांच्या अवकाशात  बलून्स फिरण्यासाठी परवानगी मिळविणे आवश्यक आहे. सर्वच देश ही परवानगी सहजासहजी देणार नाहीत. आणि एका देशाने जरी आडकाठी केली तरी पुर्ण साखळीच तुटण्याची भीती आहे.

सर्व बलुन्सचे नियंत्रीत चलनवलन, त्यांची अवकाशातील टक्कर, तसेच वार्‍यांबरोबर खुप दुर इतस्ततः वाहवत जाण्याची भीती अशा अनेक तांत्रिक अडचणी अजून गुगलला दूर करायच्या आहेतच.

प्रोजेक्ट बलून्सचा गुगलसाठी काय फायदा ?


जास्तीत जास्त लोकांपर्यंत पहिल्यांदा पोहोचणे म्हणजे जास्तीत जास्त कस्टमर्स पहिल्यांदा मिळविणे हा गुगलचा मुख्य हेतु आहेच. जास्तीत जास्त माहिती मिळविणे आणि ती जाहिरातदारांना विकणे हा गुगलचा मुख्य व्यवसायच आहे. अर्थात या प्रोजेक्ट मध्ये गुगलपेक्षा एकुणच मानवजातीचाच जास्त फायदा होईल असे वाटतेय.

सध्या बाल्यावस्थेत असणारा हा प्रोजेक्ट कसा प्रगती करतोय हे पाहणे निश्चीतच मनोरंजक ठरेल. ते पाहण्यासाठी गुगलच्या प्रोजेक्ट लून्स या साईटला इथे भेट द्या. किंवा गुगल प्लस पानाला ईथे भेट द्या.

सतत काहीतरी innovative करत राहणार्‍या कंपन्या आकाशाला गवसणी घालतातच. आणि गुगलने तर शब्दश: अवकाशाला गवसणी घातलीये. म्हणूनच तर मी "गुगल" काकांचा फॅन आहे :-)


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment